Health News: ऊसाचा रस पिण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी; नाहीतर अनेक समस्यांचे व्हाल शिकार

तब्येत पाणी
Updated Jun 16, 2022 | 11:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

Disadvantages Of Sugarcane Juice । उन्हाळ्याच्या दिवसात लोकांची उष्णतेपासून सुटका होण्यासाठी लोक अनेक थंडपेय पित असतात. अशा परिस्थितीत उसाचा रस पिणे ही लोकांची सर्वात पहिली पसंती आहे.

 health tips Know these things before drinking sugarcane juice
ऊसाचा रस पिण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, नाहीतर ...  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उन्हाळ्याच्या दिवसात लोकांची उष्णतेपासून सुटका होण्यासाठी लोक अनेक थंडपेय पित असतात.
  • उसाचा रस पिण्याचे अनेक फायदे आहेत तसेच त्याचे काही तोटे देखील आहेत.
  • २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहिलेला रस पिणे टाळा.

Disadvantages Of Sugarcane Juice । मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात लोकांची उष्णतेपासून सुटका होण्यासाठी लोक अनेक थंडपेय पित असतात. अशा परिस्थितीत उसाचा रस पिणे ही लोकांची सर्वात पहिली पसंती आहे. ऊसाचा रस, उत्तम चवींनी भरलेला, लोकांच्या गळ्याला शांत करतो तसेच पोटाला खूप आराम देतो. त्याची चव थंड असते. त्यात कार्बोहायड्रेट, मिनरल्स, कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळतात. यामध्ये फायबरचे प्रमाणही भरपूर असते. (health tips Know these things before drinking sugarcane juice). 

दरम्यान, उसाचा रस प्यायल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. लक्षणीय बाब म्हणजे या फायद्यांसोबतच उसाचा रस पिण्याचे काही तोटेही आहेत. तज्ज्ञांच्या मते जर तुम्हाला अन्नातून विषबाधा (Food Poisoning), लठ्ठपणा आणि सर्दी होत असेल तर उसाचा रस पिणे टाळा, उसाचा रस या समस्या वाढवू शकतो.

अधिक वाचा : आषाढ महिन्यातील 'ही' अमावस्या शेतकऱ्यांसाठीही आहे महत्त्वाची

जास्त काळ ठेवलेला रस पिऊ नका

उसाचा रस पिण्याचे अनेक फायदे आहेत. तसेच त्याचे काही तोटे देखील आहेत. याचे सेवन करताना नेहमी लक्षात ठेवा की रस पूर्णपणे ताजा असणे गरजेचे आहे. २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहिलेला रस पिणे टाळा, कारण ते प्यायल्याने तुमचे पोट खराब होऊ शकते. तसेच उलट्या आणि चक्कर येऊ शकते. जास्त काळ ठेवलेल्या उसाचा रस प्यायल्याने त्याचा ऑक्सिडायझेशन होतो, जो आरोग्यासाठी हानिकारक आहे.

निद्रानाशची समस्या

उसाचा रस प्यायल्याने तुमच्या शरीरातील पॉलिकोसॅनॉलचे प्रमाण वाढू शकते. यामुळे झोप येण्यास त्रास होऊ शकतो. निद्रानाशाची समस्या एकदा ग्रासली की मग त्यातून इतर अनेक आजार उद्भवू शकतात. या समस्येपासून दूर राहायचे असेल तर उसाचा रस जास्त पिऊ नका.

रक्ताला पातळ करते

ऊसामध्ये आढळणारे पॉलिकोसॅनॉल रक्ताला पातळ करण्याचे काम करते. हे शरीरात रक्त गोठण्यास अडथळा निर्माण करते. काहीवेळा ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. कारण दुखापतीमुळे रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो.

ऊसाच्या रसाने वजन वाढते

ऊसाच्या रसात साखर आणि कॅलरीज मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे शरीराचे वजन झपाट्याने वाढते. अशा परिस्थितीत वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर ऊसाचा रस जास्त पिऊ नका. जर तुम्हाला ऊसाचा रस जास्त आवडत असेल तर तुम्ही रोज एक ग्लास रस पिऊ शकता.

डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी