Health Tips viral : नवी दिल्ली: दही हे शरीरासाठी खूप लाभदायक असतं.दही हे प्रोटिन, पॉटेशिअम आणि व्हिटॅमिन्सने भरपूर असतं. दही हे सुपरफूड आहे असं म्हटलं जातं. कारण यामध्ये कॅल्शिअम आणि फॉस्फरस सारखी जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. दह्याच्या नियमित सेवनाने पोटासंबंधी आणि इतर समस्या दूर होण्यास मदत होते. आरोग्याच्या समस्या दूर होत होण्यास दही उपयुक्त आहे, म्हणूनच दररोज दही खाण्यास सांगितले जाते. पण अनेकजण दही खाताना त्यात इतर पदार्थ टाकत असतात. पण ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते.चला तर कोणत्या गोष्टी दहीमध्ये मिश्रित करू नये, याची माहिती घेऊया.
सहसा लोक दह्यात कांदा घालून रायता बनवतात. तुम्हीही जर या लोकांपैकी असाल तर दही आणि कांदा एकत्र खाणं हानिकारक ठरू शकतं.
आयुर्वेदानुसार प्रथिने एकाच वेळी जास्त प्रमाणात घेणे टाळावे. दही आणि माशांमध्ये प्रोटिन खूप प्रमाणात असते. जर तुम्ही यांना एकत्र खाले तर अपचन आणि त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.
दूध आणि दही एकत्र कधीच खाऊ नये. जर तुम्ही या दोन गोष्टी एकत्र खात असाल तर अॅसिडिटी, छातीत जळजळ, पोट फुगणं अशा समस्या होऊ शकतात.
उन्हाळ्यात लोकं आंब्याच्या लस्सीला पसंती देतात, पण या दोघांना एकत्र मिळून खाणं शरीराला घातक ठरू शकतं. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स वाढतात. त्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो.
उडीद डाळसोबत दह्याचे सेवन केल्यानेही अॅसिडिटी,गॅस, जुलाबसारख्या समस्या निर्माण होतात.