स्किन टाइट जीन्स घातल्याने आरोग्याचे होते नुकसान

health tips, skin tight jeans can cause serious diseases : स्किनी जीन्स, स्किन टाइट जीन्स अशा त्वचेला घट्ट चिकटून राहणाऱ्या जीन्स घालण्याची फॅशन अलिकडे वाढू लागली आहे. अशा प्रकारच्या जीन्स घालणे आरोग्यासाठी हानीकारक आहे. दीर्घकाळ स्किनी जीन्स, स्किन टाइट जीन्स घातल्यामुळे नकळत अनेक आजारांना आमंत्रण दिले जाऊ शकते.

health tips, skin tight jeans can cause serious diseases
स्किन टाइट जीन्स घातल्याने आरोग्याचे होते नुकसान  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • स्किन टाइट जीन्स घातल्याने आरोग्याचे होते नुकसान
  • स्किन टाइट जीन्समुळे आजारांना आमंत्रण दिले जाऊ शकते
  • स्किन टाइट जीन्समुळे शरीराचा एखादा भाग दुखावण्याचा धोका वाढतो

health tips, skin tight jeans can cause serious diseases : स्किनी जीन्स, स्किन टाइट जीन्स अशा त्वचेला घट्ट चिकटून राहणाऱ्या जीन्स घालण्याची फॅशन अलिकडे वाढू लागली आहे. प्रामुख्याने मुलींमध्ये अशा जीन्स घालण्याचे प्रमाण वाढत आहे. सौंदर्यवृद्धीसाठी या जीन्स घातल्या जातात. पण अशा प्रकारच्या जीन्स घालणे आरोग्यासाठी हानीकारक आहे. दीर्घकाळ स्किनी जीन्स, स्किन टाइट जीन्स घातल्यामुळे नकळत अनेक आजारांना आमंत्रण दिले जाऊ शकते.

आरोग्य - वेबस्टोरी । तब्येत पाणी

  1. रक्ताभिसरण : दीर्घकाळ स्किनी जीन्स, स्किन टाइट जीन्स घातल्यामुळे कंबरेखालच्या भागातील रक्ताभिसरणाचा वेग मंदावतो. स्नायू दुखावतात. हळू हळू कंबरेखालील भागात सांध्यांपाशी सूज येणे, दुखणे हे प्रकार सुरू होण्याचा धोका असतो. काहींना व्हेरिकोज व्हेन्स सारखे आजार होण्याचा धोका असतो.
  2. कंबरदुखी : दीर्घकाळ स्किनी जीन्स, स्किन टाइट जीन्स घातल्यामुळे कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. माकडहाड तसेच पाठीच्या कण्याचा कंबरेजवळील भाग यावर ताण पडण्याचा आणि हा भाग दुखावण्याचा धोका वाढतो. उठताबसताना त्रास होऊ शकतो. 
  3. डीपव्हेन थ्रोम्बोसिस : दीर्घकाळ स्किनी जीन्स, स्किन टाइट जीन्स घातल्यामुळे हृदय ते पाय या दरम्यान थेट रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. पायांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याचा धोका वाढतो.
  4. फर्टिलिटी : दीर्घकाळ स्किनी जीन्स, स्किन टाइट जीन्स घातल्यामुळे मूत्रपिंड, मूत्रमार्ग या ठिकाणी संसर्ग होण्याचा धोका वाढतो. प्रजनन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका निर्माण होतो. पुरुषांनी / मुलांनी दीर्घकाळ स्किनी जीन्स, स्किन टाइट जीन्स घातल्यास त्यांच्या स्पर्म काउंटवर प्रतिकूल परिणाम होण्याचा धोका वाढतो.
  5. पोटदुखी : दीर्घकाळ स्किनी जीन्स, स्किन टाइट जीन्स घातल्यामुळे पोटाच्या खालच्या भागावर ताण पडून पोटदुखी होण्याचा धोका वाढतो. 
  6. कँडिडा यीस्ट इन्फेक्शन : दीर्घकाळ स्किनी जीन्स, स्किन टाइट जीन्स घातल्यामुळे गुप्तांगाजवळ शरीराला बुरशी (फंगी / फंगस) येण्याचा धोका निर्माण होतो. गुप्तांगाजवळ संसर्गाचा धोका वाढतो.
  7. बेशुद्ध पडणे : काही जणांना टाइट कपडे घातल्यावर श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळे संबंधित व्यक्ती बेशुद्ध पडण्याचा धोका वाढतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी