Health Tips | तंदुरुस्त राहण्यासाठी व्हिटामिन ई असणारे हे ५ पदार्थ...

Health Tips | मानवी शरीराची यंत्रणा मजबूत करण्यात याचा मोठा रोल असतो. जर फ्री रॅडिकल्सचा तुम्हाला त्रास होत असले तर तुम्हाला व्हिटामिन ईचे पोषण देण्यासाठी आणि तुमच्या त्वचेला यूव्ही डॅमेजपासून वाचवण्यासाठी काही पदार्थांचा समावेश तुमच्या रोजच्या आहारात केला पाहिजे. नियमितपणे या पदार्थांचे सेवन केल्याने तुमची शारीरिक तंदुरुस्त चांगली राहील.

Health Tips
व्हिटामिन ई चे पोषण देणारे पदार्थ 
थोडं पण कामाचं
  • आरोग्य राखण्यासाठी व्हिटामिनचे महत्त्व मोठे
  • व्हिटामिन ई हे त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त
  • व्हिटामिन ई युक्त असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश

Health Tips | नवी दिल्ली : शरीराच्या विविध गरजांमध्ये व्हिटामिनचे (Vitamin) महत्त्व मोठे असते. शरीराला विविध प्रकारच्या व्हिटामिनची आवश्यकता असते. व्हिटामिन ई (Vitamin E)हे त्यापैकीच एक. व्हिटामिन ई हे त्वचा (Skin)आणि डोळ्यांच्या (Eyes) आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. मानवी शरीराची यंत्रणा मजबूत (Fitness) करण्यात याचा मोठा रोल असतो. जर फ्री रॅडिकल्सचा तुम्हाला त्रास होत असले तर तुम्हाला व्हिटामिन ईचे पोषण देण्यासाठी आणि तुमच्या त्वचेला यूव्ही डॅमेजपासून वाचवण्यासाठी काही पदार्थांचा समावेश तुमच्या रोजच्या आहारात केला पाहिजे. नियमितपणे या पदार्थांचे सेवन केल्याने तुमची शारीरिक तंदुरुस्त चांगली राहील. (Health Tips : Take these 5 vitamin E food source for healthy life)

जास्त प्रमाणात व्हिटामिन ई पोटात जाण्यासाठी तुम्ही या पदार्थांचे सेवन केले पाहिजे

१. बदाम -

बदाम एरवीदेखील आरोग्यसाठी चांगला असतोच मात्र अॅक्टिव्ह लाइफस्टाइलसाठीदेखील उपयुक्त असतात. यामध्ये व्हिटामिन इ ची पातळी खूप जास्त असते. तुमच्या त्वचेला कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी त्वेची सुरक्षा करणारे सर्व प्रकारचे अॅंटीऑक्सिडेंट गुण बदामामध्ये असतात. त्याचबरोबर बदामात प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, कॉपर आणि मॅग्नेशियमचे प्रमाण खूप असते.

२. हेजल नट्स

हेजल नट्स हा एक असा अक्रोड आहे जो पेशींना डॅमेज होण्यापासून पूर्ण सुरक्षा देतो. व्हिटामिन ई आणि दुसऱ्या अॅंटिऑक्सिडेंटचे प्रमाण यात भरपूर असते. शिवाय आरोग्यासाठीही चांगला असतो.

३. सुर्यफुलाचे तेल

तांदळाचा भूसा, गव्हाचे बीज, सुर्यफूल, सोयाबीन, मक्क्याचे तेल इत्यादी वनस्पति तेल व्हिटामिन ई युक्त असतात. सर्व वनस्पति तेल आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्त्वांनी युक्त असतात. मात्र सुर्यफूलाच्या तेलात व्हिटामिन ईचे प्रमाण चांगले असते. हे सर्वात चांगले वनस्पति तेल असते.

४. एव्होकाडो

एव्होकाडो हे एक असे फळ आहे ज्यात अनेक पोषक द्रव्ये असतात. यामध्ये व्हिटामिन, फायबर, प्रोटीन सर्वकाही असते.

५. सुर्यफूलाच्या बिया

सुर्यफूलाच्या बी मध्ये व्हिटामिन ई प्रचंड मात्रेत असते. भाजलेल्या बियांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त व्हिटामिन ई असते. हे आरोग्यसाठी अतिशय लाभकारी असते. 

व्हिटामिन ई हे मानवी शरीराला तंदुरुस्त करण्यासाठी आवश्यक असते. या सर्व गोष्टींचा आहारात समावेश करा. दुर्दैवाने बहुतांश लोक आजारी पडल्यावर किंवा शारीरिक व्याधींनी ग्रस्त झाल्यावर याकडे लक्ष देऊ लागतात.

एक वाटी दही हे भारतीय स्वयंपाकघरातील मुख्य अन्न आहे. हे केवळ जेवणाची चवच वाढवत नाही, दही डाइजेशन योग्य राखण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉलची पातळी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास देखील खूप मदत करते. याशिवाय दात आणि हाडे मजबूत ठेवण्यासोबतच वजन झपाट्याने कमी करण्यासही दही उपयुक्त आहे. दह्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 2, व्हिटॅमिन बी 12 भरपूर प्रमाणात असते, जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. तुम्ही त्याचा आहारात अनेक प्रकारे समावेश करू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी