Kidney Damage Habits: 'या' 5 चुका सुधारा, कधीच फेल होणार नाही Kidney

व्यक्तीची किडनी खराब का होते?, किडनी खराब होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. या कारणांमध्ये काही तुमच्या वाईट सवयीही (bad habits) असू शकतात.

kidney damage habits
किडनी 
थोडं पण कामाचं
  • मानवी शरीरात दोन किडनी असतात आणि त्या दोन्ही निरोगी असणं आवश्यक आहे.
  • आपल्या शरीरातील दोन्ही किडनी निरोगी असल्यास शरीर देखील निरोगी राहते.
  • आजारांची लागण झाल्यास याचा परिणाम किडनीवर होतो आणि यामुळे किडनी आपल्या शरीरातील द्रव फिल्टर करू शकत नाही.

मुंबई: Kidney Damage Habits: किडनी (Kidney)  हा शरीरातील सर्वांत महत्त्वाच्या अवयवांपैकी (most important organs) एक आहे. मानवी शरीरात दोन किडनी असतात आणि त्या दोन्ही निरोगी असणं आवश्यक आहे. आपल्या शरीरातील दोन्ही किडनी निरोगी असल्यास शरीर देखील निरोगी राहते. एखाद्या व्यक्तीची एक किडनी निकामी झाल्यास दुसरी किडनी कार्यरत राहते. पण तुम्हाला माहिती आहे का व्यक्तीची किडनी खराब का होते?, किडनी खराब होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. या कारणांमध्ये काही तुमच्या वाईट सवयीही (bad habits) असू शकतात. या वाईट सवयींमुळे तुम्हाला मधुमेह, हृदयरोग आणि उच्च रक्तदाब यासारख्या आजारांना बळी पडता. या आजारांमुळे किडनीला खूप नुकसान होतं. व्यक्तीला जर या आजारांची लागण झाल्यास याचा परिणाम किडनीवर होतो आणि यामुळे किडनी आपल्या शरीरातील द्रव फिल्टर करू शकत नाही. त्यानंतर किडन हळूहळू खराब होण्यास सुरूवात होते. 

चला जाणून घेऊया दैनंदिन जीवनातील अशा 5 सवयींबद्दल, ज्या तुमच्या किडनीला नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. 

Active न राहणं 

स्वतःला निरोगी राहण्यासाठी Active ठेवणं खूप आवश्यक आहे. मात्र जेव्हा लोकं शारीरिकदृष्ट्या Active राहत नाही तेव्हा त्याचा परिणाम आपल्या सर्व अवयवांवर होण्यास सुरूवात होते. जेव्हा व्यक्ती सक्रिय राहत नाही तेव्हा शरीरात विषारी पदार्थ तयार होतात आणि ते विषारी पदार्थ शरीरातून काढून टाकण्याची तुमच्या किडनीची क्षमता ही कमी होते. त्यामुळे तुमच्या सक्रिय न राहण्याची सवय तुमच्या किडनीवर परिणाम करू शकते. 

अधिक वाचा-  चिंता वाढवणारी बातमी; देशात वाढला मंकीपॉक्स रूग्णाचा आकडा, 'या' राज्यात आढळला नवा रूग्ण

इतर रोगांमुळे किडनीला होऊ शकतो त्रास 

व्यक्तीला त्यांच्या ब्लड प्रेशरसोबत ब्लड शुगर मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. कारण या दोन्ही परिस्थिती किडनीचं आरोग्य बिघडवण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल आहे. अनेकजा डायबिटीज असलेल्या रूग्णांना किडनीचे आजार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्याची गरज आहे. 

खाण्याच्या सवयींवर लक्ष द्यावे 

तुम्हाला तुमच्या आहारात हेल्दी डाएटचा समावेश करणं आवश्यक आहे. हेल्दी डाएट  तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. हेल्दी डाएट शरीरातील आरोग्य व्यवस्थित राखण्याचं काम करतो. याव्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या पाण्याचं सेवन म्हणजेच पाण्याचे प्रमाणी याची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. खूप कमी किंवा जास्त पाणी शरीरातील द्रव फिल्टर करण्यासाठी किडनीला अडथळा निर्माण करतो. त्यामुळे खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी.

वजनावर कंट्रोल करावं 

तुम्हाला तुमची बिघडलेली जीवनशैली सुधारावी लागेल. यासाठी तुम्हाला योग्य असं डेली रूटीन फॉलो करावं लागेल. याव्यतिरिक्त योग्य वजन ठेवावं लागेल. पोट आणि कंबरेची चरबी वाढल्यानं तुमच्या आजारांचा धोका वाढण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे योग्य ते वजन राखण्याचा प्रयत्न करा. 

या गोष्टी ठेवा लक्षात 

  • ताजे अन्न खा, कारण शिळं अन्न खाल्ल्यानं किडनी खराब होण्याची शक्यता जास्त असते. 
  • सिगारेट, बिडी यासारख्या तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन टाळा. 
  • डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्या. कारण औषधामुळे किडनी खराब होऊ शकते. 
  • मद्यपानाची सवय सोडून द्या. 
     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी