मुंबई: Shilpa Shetty Diet Plan: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Bollywood actress Shilpa Shetty) तिच्या लूकसोबतच तिच्या फिटनेससाठी (fitness) ओळखली जाते. शिल्पा शेट्टी 47 वर्षांची आहे. या वयात ही शिल्पा तिची फिगर इतकी फिट ठेवते की तिच्याकडे पाहून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही. शिल्पाला दोन मुलं आहे. शिल्पा दोन मुलांची आई असूनही तिने स्वत:ला इतकं मेटेंन ठेवलं आहे की या वयात क्वचितच कोणी स्वत:ला तसं फिट ठेवू शकेल. सगळेच जण शिल्पा शेट्टीच्या योगावर (yoga) प्रेरित आहेत, पण फिट राहण्यासाठी ती केवळ योगाच नाही तर तिच्या डाएट प्लॅनवरही लक्ष देतं असते. ती तिच्या डाएट प्लॅनपासून (diet plan) व्यायामापर्यंत (exercise) सर्व काही तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि तिच्या फिटनेसचे रहस्यही लोकांसोबत शेअर करते. हल्लीच शिल्पानं तिच्या डाएट प्लॅनबद्दल लोकांना सांगितलं, चला तर मग जाणून घेऊया शिल्पा शेट्टीचे फिट राहण्याचे रहस्य...
शिल्पा शेट्टी तिच्या योगाव्यतिरिक्त डाएटची ही विशेष काळजी घेत असते. तिला संतुलित आहार घेणे पसंत आहे. परफेक्ट फिगर येण्यासाठी अभिनेत्रीला पौष्टिक पदार्थ खायला आवडतात. काही काळापूर्वी तिने तिच्या इंस्टाग्रामवर एका थाळीच्या जेवणाचा फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये शिल्पा शेट्टी साध्या आणि हेल्दी फूडवर विश्वास ठेवत असल्याचं दिसून येते. शिल्पा शेट्टी गाजर, बीटरूट, छोले आणि चपाती घेते.
अधिक वाचा- घरीच्या घरी बनवा हॉटेलसारखं स्मोक्ड फ्लोर Chicken विंग्स
गाजर
आरोग्यासाठी गाजर हे अतिशय फायदेशीर आहे. हे कच्चे आणि शिजवून दोन प्रकारे खाता येऊ शकतं. गाजराचा ज्यूस देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गाजर भाजीत मिक्स करून बनवता येते. गाजरात जीवनसत्त्वे आणि इतर अनेक पोषक घटक असतात. सॅलडसाठी गाजरचा मुख्यत्वे वापर करण्यात येतो. फिट राहण्यासाठी याचा डाएटमध्ये नक्कीच समावेश करा.
बीटरूट
आरोग्यासाठी बीटरूट देखील खूप फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन बी, फॉस्फरस, कॅल्शियम, प्रोटीन, अँटीऑक्सिडंट यांसारखे घटक असतात. बीटरूटमध्ये असलेले फायबर शरीराचे वजन कमी करण्यासाठी काम करते. जेवणात सॅलड म्हणून ही तुम्ही बीटरूट खाऊ शकता.
चपाती
भातापेक्षा चपाती खाणं नेहमीच चांगलं. चपातीमध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. जे वजन कमी करण्यासोबतच शरीराला अनेक प्रकारे फायदे देतात. चपाती बनवताना त्यात बाजरीचे पीठ घाला. तसं केल्यास वजन कमी करण्यात खूप मदत होते.
(अस्वीकरण: या लेखातील टिपा आणि सल्ले केवळ सामान्य माहितीसाठी आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून त्याचा अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. )