हे आहेत विराट कोहलीचे आवडते ५ व्यायाम प्रकार, ३० मिनिटांत बॉडी येईल शेपमध्ये

विराट कोहली कायम उत्साही आणि ऊर्जेने भरलेला असतो. यामागचे कारण तुम्हाला माहित आहे का? विराट कोहली करत असलेले व्यायाम आणि ज्यामुळे तुम्हीदेखील एकदम फिट होऊ शकेल असे व्यायाम प्रकार कोणते ते जाणून घेऊया.

Virat Kohli fitness Programme
विराट कोहलीला आवडणारे व्यायाम प्रकार 

थोडं पण कामाचं

  • विराट कोहली आपल्या फिटनेसविषयी (Fitness) कमालीचा जागरुक असतो
  • विराट जगातील सर्वात फिट खेळाडू आणि अॅथलिटपैकी एक
  • विराट कोहली फिटनेसविषयी आधीपेक्षा जास्त जागरुक झाला आहे

नवी दिल्ली: विराट कोहली (Viral Kohli)सध्या टी-२० चे कर्णधारपद सोडण्यावरून चर्चेत आहे. मात्र कसोटी सामने, एकदिवसीय सामने आणि टी-२० मध्ये दमदार कामगिरी करणारा विराट कोहली आपल्या फिटनेसविषयी (Fitness) कमालीचा जागरुक असतो. सध्या तो जगातील सर्वात फिट खेळाडू आणि अॅथलिटपैकी एक आहे. त्यामुळेच मैदानावर फलंदाजी असो की क्षेत्ररक्षण विराट कोहली नेहमी चपळाईने हालचाली करत असतो. विराट कोहली कायम उत्साही आणि ऊर्जेने भरलेला असतो. यामागचे कारण तुम्हाला माहित आहे का? विराट कोहली करत असलेले व्यायाम आणि ज्यामुळे तुम्हीदेखील एकदम फिट होऊ शकेल असे व्यायाम प्रकार कोणते ते जाणून घेऊया. (Health Tips: Virat Kohli likes these 5 exercises to be Fit, know the details)

फिटनेस आयकॉन विराट कोहली

३२ वर्षांचा विराट कोहली जगभरात फिटनेस आयकॉन बनला आहे. करियरच्या सुरूवातीला विराट कोहली जिकता फिटनेसविषयी जागरुक नव्हता तितका तो आता झाला आहे. विराटच्या फिटनेसमधील हा बदल एका रात्रीत झालेला नाही. त्याने लो कार्ब डाएट, गुड फॅट, हाय इंटेन्स कार्डिओ आणि इतर काही प्रकारांची जोरदार प्रॅक्टिस आणि अंमलबजावणी केली आहे. तो आपल्या आहाराविहाराविषयी अत्यंत जागरूक असतो. 

१. रनिंगमुळे वापरल्या जातात सर्वाधिक कॅलरी

जर तुम्हालादेखील विराट कोहलीप्रमाणे शेपमध्ये राहायचे असेल तर मूलभूत गोष्टींपासूनच सुरूवात केली पाहिजे. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला रनिंग करणे आवश्यक आहे. रनिंगमुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर हा व्यायाम प्रकारदेखील सोपा आहे. रनिंग केल्यामुळे तुमच्या मांसपेशी बळकट होतात आणि स्टॅमिना वाढतो. ट्रेडमिलवर धावल्यावर एका तासात सरासरी ७०५ ते ८६५ कॅलरी खर्च होतात.

२. एका हाताचे पुशअप्स

विराट कोहली एका हाताच्या पुशअप्सवर भर देतो. एका हाताच्या पुशअप्समुळे तुमचे दंड, खांदे आणि छाती यांना उत्तम आकार येतो आणि ते अधिक बळकट होतात. आत्मविश्वास वाढवण्याबरोबरच या व्यायाम प्रकारामुळे तुमच्या शरीराला पिळदारपणा येतो. तुमच्या पाठीचे स्नायूदेखील मजबूत होतात. 

३. आपल्या क्रंचेसचा दर्जा उंचवावा

विराट कोहलीप्रमाणे तुम्हीदेखील सिक्स पॅक अॅब्स मिळवू शकता. क्रंचेस किंवा सिट अप्स करण्यासाठी जिममधील कोणत्याही उपकरणाची गरज नसते. तुम्ही जर योग्य पद्धतीने क्रंचेस किंवा सिट अप्स केले तर त्याचा फिटनेसला जबरदस्त उपयोग होतो.

४. पोहण्याच्या व्यायामामुळे घटते पोटावरील चरबी

शरीरातील चरबी आणि विशेषत: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी पोहण्याचा व्यायाम अतिशय उपयुक्त असतो. पोटाचा घेर कमी करण्याचा हा सर्वात चांगला व्यायाम आहे. कारण पोहण्यासाठी अत्यंत ताकद लागते आणि तुमच्या मांसपेशी बळकट व्हाव्या लागतात. पोहण्याचे ब्रेस्टस्ट्रोक आणि फ्रीस्टाइल हे दोन्ही व्यायाम प्रकार चरबी कमी करतात. आलटून पालटून तुम्ही दोन्ही प्रकारांचा वापर करू शकता.

५. हेवी वेट लिफ्टिंग

वेट लिफ्टिंग हा एक महत्त्वाचा व्यायाम आहे. जितके वजन उचलण्याची तुम्ही क्षमता आहे तितके वजन मार्गदर्शनाखाली तुम्ही उचलले पाहिजे. यामुळे तुमचे स्नायू बळकट होतात. शरीर पिळदार बनवण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी कोणताही शॉर्ट कट नसतो. वेट लिफ्टिंगसाठी ट्रेनिंगची आवश्यकता असते आणि त्याचबरोबर संयमाचीही गरज असते. एकदम वेटलिफ्टिंग सुरू करू नका, त्यामुळे तुम्हाला  अपाय होण्याची शक्यता असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी