नॉर्मल डिलिव्हरी हवी असेल, तर या उपायांनी होईल फायदा

अनेकवेळा लेबर पेन सुरू झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावरही गर्भाशयाचे तोंड उघडलेले नसते. नॉर्मल डिलिव्हरीसाठी महिलांनी अंमलात आणावयाच्या टिप्स.

Home remedies for normal delivery
नॉर्मल डिलिव्हरीसाठी घरगुती उपाय 

थोडं पण कामाचं

  • गर्भवती महिलांसाठी टिप्स
  • नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठीचे घरगुती उपाय
  • जीवनशैलीतील बदल

नवी दिल्ली : अनेक वेळा गर्भवती महिलांच्या डिलिव्हरीसंदर्भात अनेक अडचणी येत असतात. काही गर्भवती महिलांची डिलिव्हरी (Delivery of Pregnant woman)अपेक्षित तारखेच्या काही दिवस आधीच होते. तर काही महिलांना अपेक्षित तारीख उलटून गेल्यानंतरही लेबर पेन (Labor Pain) येण्यास सुरूवात होत नाही. या सर्व अडचणींमुळे अनेकवेळा महिलांची नॉर्मल किंवा नैसर्गिक डिलिव्हरी (Normal Delivery) होणे अवघड होऊन बसते. गर्भाशयाचे तोंड उघडणे यासाठी महत्त्वाचे असते. या सर्व बाबींसाठी वैद्यकीय सल्ल्याबरोबरच (Doctor's Advice)काही घरगुती आणि दैनंदिन उपाय आहेत जे केल्यामुळे गर्भवती महिलांची नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत होते. अर्थात अनेकवेळा लेबर पेन सुरू झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावरही गर्भाशयाचे तोंड उघडलेले नसते. यामुळे जास्त वेळ लेबर पेन सहन करावे लागतात. या त्रासाला टाळण्यासाठी महिलांनी काय उपाय करावेत? (Tips & Home remedies for normal delivery of pregnant woman)

हळद -

हळदीमध्ये वेदनाशामक गुण असतात. नवव्या महिन्यात औषधी गुणांचे महत्त्व असलेली हळद वेदनेला कमी करण्याचे काम करते. आठवा महिना संपल्यावर आणि नववा महिना सुरू झाल्यावर पोटात कॉन्ट्रॅक्शन होणे सुरू होते. अचानक पोटात वेदना होतात. अशा वेळी महिलांना अचानक पोट, गुडघे आणि पायांमध्ये वेदना होणे, दुखणे यासारखे त्रास होतात. एक ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्यावे. रोज रात्री झोपण्याआधी दूध प्यावे. नववा महिना सुरू झाल्याबरोबर ही क्रिया सुरू करावी.

आले आणि लसूण -

या दोन औषधी वनस्पतींचा मुळचा गुणधर्म हा गरम असतो. नववा महिना लागल्याबरोबर आले आणि लसणाचे सेवन सुरू करावे. गर्भवती महिला आल्याचा चहा पिऊ शकतात किंवा पाण्यामध्ये आले उकळून ते पाणी पिऊ शकतात. रोज सकाळी उपाशी पोटी लसणाच्या दोन कळ्या खाव्यात. या उपायामुळे नॉर्मल डिलिव्हरीबरोबरच अनेक आजारही टाळता येतात.

कोमट पाणी -

डिलिव्हरीची वेळ जवळ येऊ लागताच मांसपेशींमध्ये किंवा स्नायूंमध्ये ताण निर्माण होण्यास सुरूवात होते. कोमट पाणी ही अडचण दूर करते. त्यामुळे स्नायू मोकळे होतात आणि ताण निर्माण होत नाही. गर्भारपणात थंड पदार्थ खाल्ल्याने आणि प्यायल्याने स्नायू आकसतात. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यास अडचण येते. त्यामुळेच जितके शक्य असेल तितके गर्भवती महिलांनी कोमट पाणी प्यावे.

खजूर -

नवव्या महिन्यात खजूर खाण्याचेदेखील मोठे फायदे आहेत. यामुळे गर्भाशयाचे तोंड उघडण्यास मदत होते. यासाठी एक ग्लास गरम दूध गरम करण्यास ठेवावे आणि तीन ते चार खजूर त्यात टाकावे. दूध चांगले उकळून घ्यावे आणि त्यानंतर ते गाळून प्यावे. याशिवाय नवव्या महिन्यात दूधात तुप टाकून प्यायल्यानेदेखील डिलिव्हरीच्या वेळेस खूप मदत होते. एक ग्लास कोमट दूधात अर्धा चमचा तूप टाकून प्यावे.

या सर्व उपायांबरोबर डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली नियमित व्यायामाचेही मोठे महत्त्व असते. शिवाय योग्य आणि वेळेवर घेतला जाणारा आहारदेखील गर्भारपणातील अनेक अडचणी सोडवण्यास उपयुक्त असतो. गर्भारपणात महिलांनी आपल्या जीवनशैलीकडे नीट लक्ष देऊन त्यात आवश्यक ते बदल करणे गरजेचे असते.

(सूचना : वर सुचवलेले हे सर्व घरगुती उपाय आहेत. तसेच ते सर्वसाधारण उपाय म्हणून सुचवलेले आहेत. प्रत्येक गर्भवती महिलेचे आरोग्य वेगवेगळे असते. त्यामुळेच कोणत्याही उपायाचा अवलंब करण्याआधी आपल्या गायनोकोलॉजिस्टशी चर्चा करावी आणि मगच तो उपाय अंमलात आणावा. काही महिलांना गर्भारपणात गुंतागुंतीला सामोरे जावे लागते किंवा गर्भारपणात मोठी जोखीम असते. अशा स्थितीत आपल्या डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक असते.)
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी