डेंग्यू झाल्यास डाएटमध्ये घ्या हे पदार्थ

तब्येत पाणी
Updated Aug 13, 2019 | 20:46 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

डेंग्यू-मलेरियासारखे आजार आपल्या इम्युनिटी सिस्टीम आणि प्लेटलेट्सवर अधिक प्रभाव टाकतात. प्लेट्लेट्स कमी होण्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

dengue
डेंग्यू 

थोडं पण कामाचं

  • डेंग्यूचा आजार झाल्यास स्वत:ला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा.
  • पाणी, फळांचा रस आणि नारळपाणी भरपूर प्या.
  • डेंग्यूच्या रुग्णांनी आराम करणे खूप गरजेचे असते.

मुंबई: पावसाळ्यात डेंग्यूच्या मच्छरांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. ऊन आणि दमटपणा या मच्छरांसाठी चांगले वातावरण निर्माण करते. याच कारणामुळे जुलै ते ऑक्टोबरदरम्यान डेंग्यूचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. समस्या म्हणजे स्वच्छ पाण्यातही डेंग्यूचे डास निर्माण होतात आणि दिवसा चावतात. यातच स्वत:ला या डासांपासून वाचवणे कठीण होते. घरात तुम्ही स्वत:ला डास चावण्यापासून वाचवू शकता मात्र घराबाहेर हे शक्य होत नाही. यासाठी डास चावण्यापासून वाचवणाऱ्या क्रीम्सचा वापर करा. 

आराम आणि योग्य खाणेपिणे हेच - डेंग्यू झाल्यास घरी आराम करण्यास सुरूवात करा. डेंग्यूमध्ये तुम्हाला भरपूर आरामाची गरज असते. दुसरी गोष्ट म्हणजे डेंग्यूचा आजार झाल्यास शरीरात पाण्याची कमतरता सतत जाणवते यामुळे तुम्ही लिक्विड डाएटचा समावेश करा. प्रत्येक एक ते दीड तासाला एक लीटर अथवा त्याहून अधिक लिक्विड डाएट घ्या. तसेच औषधेही घ्या. तसेच प्लेटलेट्स वाढतील असे भोजन घ्या.

पपईच्या पानांचा रस - हा डेंग्यूवर रामबाण उपाय आहे. पपईच्या पानांचा ताजा रस काढून प्यायल्यास शरीरात पांढऱ्या पेढी वाढण्यास सुरूवात होते. यामुळे प्लेट्लेट्स वाढतात तसेच इम्युनिटी सिस्टीमही मजबूत होते. 

व्हिटामिन सी युक्त फळांचा रस - डेंग्यूमध्ये प्लेट्लेट्स वाढवण्यासाठी व्हिटामिन सी युक्त फळांचा रस घेण्यास सुरूवात करा. संत्रे, लिंबू,आवळा, मोसंबी, डाळिंब अशा फळांचा डाएटमध्ये समावेश करा. या ज्युसमुळे इम्युनिटी वाढेल मात्र त्यासोबतच प्लेट्लेट्सही वाढतील. 

हळदीचे प्रमाण वाढवा - डेंग्यूचा आजार झाला खाण्यामध्ये हळदीचे प्रमाण वाढवा. कारण हळदीमध्ये अँटीसेप्टीक गुण असतात. त्याशिवाय यात कर्क्युमिन नावाचे तत्व असते. ज्यामुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते. हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इनफ्लामेशनसारखे गुण असतात यामुळे डेंग्यूमध्ये हळदीचा आहारात समावेश वाढवावा. 

पालकही फायदेशीर - पालकमध्ये केवळ लोहच नव्हे तर ओमेगा ३ फॅटी अॅसिड अशते. याच कारणामुळे डेंग्यूमध्ये पालक खाल्ल्यास इम्युन तसेच प्लेटलेट्स वाढवण्यास मदत होते. 

नारळपाणी भरपूर प्या - डेंग्यूमध्ये नारळपाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे असते. दिवसांतून कमीत कमी तीन ते चार वेळा नारळपाणी घेतले पाहिजे. शरीरात पाण्याची कमतरता भरून काढण्यासोबतच मिनरल्स आणि व्हिटामिनची कमतरता दूर करण्याचे काम नारळपाणी करते. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत करते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
डेंग्यू झाल्यास डाएटमध्ये घ्या हे पदार्थ Description: डेंग्यू-मलेरियासारखे आजार आपल्या इम्युनिटी सिस्टीम आणि प्लेटलेट्सवर अधिक प्रभाव टाकतात. प्लेट्लेट्स कमी होण्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...