Morning Tips: सकाळी उठल्यावर हे करायला तर निरोगी राहाल, कोणताही आजार होणार नाही

healthy routine, best daily morning routine for healthy life and disease free body : सोप्या पद्धतीने आरोग्याची काळजी घेण्यासाठी निवडक टिप्स जाणकार देत आहेत. जाणकारांच्या म्हणण्यानुसार दररोज या तंत्रांचा अवलंब केला तर तब्येत सांभाळणे आणि फिटनेस राखणे सहज शक्य आहे.

healthy routine, best daily morning routine for healthy life and disease free body
Morning Tips: सकाळी उठल्यावर हे करायला तर निरोगी राहाल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Morning Tips: सकाळी उठल्यावर हे करायला तर निरोगी राहाल
  • कोणताही आजार होणार नाही
  • तब्येत सांभाळणे आणि फिटनेस राखणे सहज शक्य

healthy routine, best daily morning routine for healthy life and disease free body : कामाच्या धबडग्यात, दगदगीत आरोग्याची काळजी घेणे कठीण झाले आहे. तब्येत सांभाळण्यासाठी काही सोपं असेल तर करायची तयारी अनेकजण दाखवतात. पण हे सोपं काय हेच कळत नाही आणि सांगणारं पण कोणी नसतं. आता हा प्रश्न उरणार नाही. कारण सोप्या पद्धतीने आरोग्याची काळजी घेण्यासाठी निवडक टिप्स जाणकार देत आहेत. जाणकारांच्या म्हणण्यानुसार दररोज या तंत्रांचा अवलंब केला तर तब्येत सांभाळणे आणि फिटनेस राखणे सहज शक्य आहे.

सकाळी उठा

दररोज रात्री किमान सहा ते आठ तास झोपावे. सकाळी सूर्योदयाआधी उठावे. यानंतर ध्यान, योगासने करणे लाभाचे आहे. विद्यार्थ्यांनी सकाळी उठून अभ्यास करावा. सकाळी वातावरण शांत असते. या वातावरणात केलेला अभ्यास लक्षात राहतो. 

तोंड धुवा, पाणी प्या

सकाळी झोपून उठल्यावर सामान्य तापमान असलेल्या पाण्याने तोंड धुवा. चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारा. कोमट किंवा सहन होईल एवढे एक ग्लास गरम पाणी प्या. 

व्यायाम

किमान एक तास पळायला जा. सलग एक तास पळणे शक्य नसल्यास वेगाने धावणे नंतर वेगाने चालणे पुन्हा धावणे असा प्रयो करा. अथवा तासभर वेगाने चालावे. दररोज किमान चार ते पाच किमी वेगाने चालणे अथवा पळणे असा व्यायाम करावा. व्यायाम झाल्यावर प्राणायाम करा. शवासन करा. 

व्यायामानंतर...

व्यायाम करून थोडी विश्रांती घ्या नंतर आंघोळ करा. फ्रेश झाल्यावर नव्या उत्साहाने पोटभर नाश्ता करा. नाश्ता म्हणून ताजी फळे खा. पोहे, उपमा, दलिया असे एक किंवा दोन पदार्थ पोटभर खाऊ शकता.

मैदा खाणे टाळा

तेलकट पदार्थ, फास्टफूड, जंकफूड, साखर, मैदा खाणे टाळा. साखरेपासून तयार केलेले पदार्थ तसेच मैद्यापासून तयार केलेले पदार्थ खाणे टाळा. 

आरोग्य जपण्यासाठी आणि फिटनेस राखण्यासाठी हे डेली रुटिन पाळा. यामुळे तब्येत उत्तम राहील; असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. प्रयोग करण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे आहे. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी