Healthy tea: हेल्दी चहा तयार करण्यासाठी तुम्हाला या 5 टिप्स माहित आहेत का?

Healthy tea: जर तुम्हाला आरोग्यदायी चहा बनवायचा असेल तर या टिप्स त्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. जाणून घ्या कसे...

Do you know these 5 tips for making healthy tea?
आरोग्यदायी चहासाठी उपयुक्त टिप्स.. जाणून घ्या या खास टिप्स..  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आरोग्यदायी चहासाठी खास टिप्स...
  • चहात साखर टाळा... गूळ उपयुक्त..
  • कमी चरबीयुक्त दूध चहासाठी फायदेशीर

Healthy tea: नवी दिल्ली:  भारतात चहा हे पेय नसून भावना आहे. तो कधीही आणि कोणत्याही प्रसंगी प्यायला जाऊ शकतो, चहाशिवाय तर चर्चा करण्यातदेखील मजा येत नाही. चहाला ज्याप्रकारे चवदार मानले जाते, त्याच प्रकारे एक गोष्ट देखील खरी आहे की चहा आपल्या आरोग्यासाठी चांगला मानला जात नाही. चहा आपण कधीही वापरत असलो. तरी त्यात असलेली कम्पाऊंड आपल्या पचन आणि निरोगी शरीरासाठी योग्य नाहीत. चहामध्ये कॅलरीज नसतील आणि केमिकलचं प्रमाण थोडं कमी केलं तर ते आपले पौष्टिक अन्न होऊ शकते. पण जर गरम गरम चहा नीट केला नाही तर तो कॅलरी बॉम्बही ठरू शकतो.


या पाच गोष्टी काढून टाकल्या तर चहा आपल्यासाठी खूप आरोग्यदायी होईल.


1. साखर टाळा-

Indian traders sign sugar export deals in advance as frost hits Brazil - Times  of India
प्रत्येक चमचा साखर आपल्या चहामध्ये 20 कॅलरीज जोडते. चहा हा खूप गोड बनतो म्हणून हे आरोग्यदायी नसण्याचे सर्वात मोठे कारण आहे. 
जर तुम्हाला चहा हेल्दी बनवायचा असेल तर त्यातील साखर काढून टाका. यामुळे तुमचा चहा तुमच्यासाठी परिपूर्ण होईल. जर तुम्ही ते पूर्णपणे काढून टाकू शकत नसाल तर प्रमाण थोडे कमी करा. जसे की तुम्ही आधी 2 चमचे साखर घेत होता,  तर आता 1 चमच साखर घ्या, त्याने फायदा होईल. 


2. नैसर्गिक चहा वापरा


साखर पूर्णपणे कमी करणे शक्य नाही हे मान्य आहे, पण साखरेच्या जागी तुम्ही काही नैसर्गिक गोष्टी वापरू शकता ज्यामुळे चहाला वेगळी चव येईल. 
उदा. आले, दालचिनी, लिंबू, गूळ इ. याशिवाय तुम्ही पुदिन्यासारखी चव वाढवणारी औषधी वनस्पती देखील वापरू शकता. गोड चहा आवडत असेल तर साखरेऐवजी गूळ घ्या. गुळाचा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत.

3. व्हिटॅमिन-सी नेहमी मदत करेल

Why you should put a lemon next to your bed every night | The Times of India


चहाबद्दल सांगायचे तर, व्हिटॅमिन-सी तुम्हाला नेहमीच मदत करेल. लिंबू तुमच्या चहाला जी चव देईल, ती वेगळीही असेल आणि त्याचवेळी त्या चवीत पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन-सीसु्द्धा शरीराला मिळेल. व्हिटॅमिन-सीमध्ये असलेली कम्पाऊंड लोह शोषण्यास खूप मदत करतात. आपण व्हिटॅमिन-सीचा समावेश वाढवल्यास आणि अधूनमधून लिंबू चहा प्यायल्यास लोहाची कमतरता भरुन निघेल.. लक्षात ठेवा लिंबू चहामध्ये चहाची पाने कमी असतात आणि दूध अजिबात नसते.


4. कमी चरबीयुक्त दूध फायदेशीर


आपण हे देखील गृहीत धरू की आपण चहामध्ये साखर कमी करू शकत नाही, परंतु चहामध्ये दूधाचे प्रमाण कमी करण्याचे अनेक मार्ग असू शकतात. 
तुम्ही सोया मिल्क, बदामाचे दूध, स्किम मिल्क किंवा लो फॅट दूध वापरू शकता. या सर्व पद्धतींमुळे तुमचा चहा खूप चविष्ट बनतो आणि त्याच वेळी चहा आरोग्यदायी बनतो.फुल फॅट दूध चहासाठी चांगले नाही, कारण कॅलरी काउंट वाढण्यासोबतच चहा पचायला जड जातो. त्यामुळे हेवी क्रीम किंवा फुल फॅट दूध वापरू नये. हे दूध तुमच्या दैनंदिन कॅल्शियम, प्रथिने आणि व्हिटॅमिन डीच्या गरजा पूर्ण करेल, तसंच तुमच्या चहामधील अतिरिक्त कॅलरीचं प्रमाणही कमी करेल.

5. इंस्टंट चहापासून दूर राहा


चहा नेहमी उकळूनच तयार करा. तुम्हाला असे वाटेल गरम पाण्यात इंस्टंट चहाचे मिश्रण बनवून तयार करणं सोपं आहे. पण हा पर्याय अपायकारक ठरू शकतो. इंस्टंट चहामुळे कॅलरीजचं प्रमाण वाढतं. एका इंस्टंट चहाच्या मिश्रणात सुमारे 13 ग्रॅम साखर असते, जी तीन साखर पॅकेट्सच्या प्रमाणाएवढी असते. जर तुम्हालाही चहा आवडत असेल आणि तुम्हीही चहा प्यायला खूप उत्सुक असाल, तर थोडा हेल्दी चहा बनवण्याचा प्रयत्न करा. 
चहामुळे होणारे नुकसान खूप जास्त असू शकते आणि म्हणून तुम्ही आवश्यक तेवढ्याच प्रमाणात चहा प्यावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी