Herbs for Diabetes: मधुमेहासाठी सापडली औषधी वनस्पती; या वनस्पतीची 4 पाने चघळल्याने कमी होते रक्तातील साखर

मधुमेह हा एक गंभीर आजार आहे, जो जगभरात झपाट्याने वाढत आहे. IDF मधुमेहाच्या अहवालानुसार, 2021 मध्ये सुमारे 537 दशलक्ष प्रौढ (20-79 वर्षे) मधुमेहासह जगत आहेत. या रोगाचा झपाट्याने होणारा प्रसार पाहता, 2030 पर्यंत मधुमेह असलेल्या लोकांची एकूण संख्या 643 दशलक्ष आणि 2045 पर्यंत 783 दशलक्षांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

Chewing 4 leaves of this plant lowers blood sugar
या वनस्पतीची 4 पाने चघळल्याने कमी होते रक्तातील साखर  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • मानवी स्वादुपिंड शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करणार्‍या इन्सुलिन हार्मोनचे उत्पादन कमी करते.
  • 2030 पर्यंत मधुमेह असलेल्या लोकांची एकूण संख्या 643 दशलक्ष आणि 2045 पर्यंत 783 दशलक्षांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
  • अरुगुला वनस्पतीला रॉकेट किंवा एरुका वेसिकारिया असेही म्हणतात.

नवी दिल्ली : मधुमेह हा एक गंभीर आजार आहे, जो जगभरात झपाट्याने वाढत आहे. IDF मधुमेहाच्या अहवालानुसार, 2021 मध्ये सुमारे 537 दशलक्ष प्रौढ (20-79 वर्षे) मधुमेहासह जगत आहेत. या रोगाचा झपाट्याने होणारा प्रसार पाहता, 2030 पर्यंत मधुमेह असलेल्या लोकांची एकूण संख्या 643 दशलक्ष आणि 2045 पर्यंत 783 दशलक्षांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. मधुमेह हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये मानवी स्वादुपिंड शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करणार्‍या इन्सुलिन हार्मोनचे उत्पादन कमी करते किंवा थांबवते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, ज्यामुळे अनेक गंभीर समस्यांचा धोका वाढतो. यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक औषधे उपलब्ध असली, तरी सकस आहार घेऊन आणि सक्रिय जीवनशैलीने ती नियंत्रणात ठेवता येते. काही औषधी वनस्पती आहेत रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त असल्याचं सिद्ध झाल्या आहेत. या वनस्पतींच्या सेवनाने साखरेच्या रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. या वनस्पतींमधील अशीच एक औषधी वनस्पती म्हणजे अरुगुला. चला जाणून घेऊया साखरेच्या रुग्णांसाठी ते कसे फायदेशीर आहे. 

अरुगुला म्हणजे काय?

अरुगुला वनस्पतीला रॉकेट किंवा एरुका वेसिकारिया असेही म्हणतात. त्यांची चव किंचित तिखट असते आणि ती दिसायला काटेरी पानेदार दिसते. ही पाने भाज्या बनवण्यासाठी आणि सॅलडमध्ये हिरव्या भाज्या म्हणून वापरतात. मुळात, ही क्रूसीफेरस कुटुंबातील एक भाजी आहे, ज्यामध्ये कोबीसारख्या विविध प्रकारच्या हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आहे. या भाजीमध्ये नायट्रेट्स आणि पॉलिफेनॉल जास्त प्रमाणात आढळतात. 2014 च्या अभ्यासात असे आढळून आले की, नायट्रेट्सचे सेवन केल्याने रक्तदाब कमी होतो.

अरुगुलाचे पोषक

जर आपण त्याच्या पोषक तत्वांबद्दल सांगायचं म्हटलं तर या हिरव्या पानांमध्ये सर्व आवश्यक अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि फायटोकेमिकल्स आढळतात. याशिवाय, हे लोह, कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे. हे जीवनसत्त्वे सी, ई आणि केचे भांडार आहे.

आरुगुलामुळे कसा नियंत्रित होतो मधुमेह

अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की भाज्या खाल्ल्याने टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. 2016 च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, हिरव्या पालेभाज्या मधुमेह रोखण्यासाठी विशेषतः फायदेशीर आहेत. 

अरुगुलाचं रसदेखील आहे प्रभावी

चाचणी ट्यूब अभ्यासात असे दिसून आले आहे की उंदरांच्या पेशींमध्ये अरुगुलाच्या रसामध्ये मधुमेहविरोधी काम करण्याचा प्रभाव दिसून आला आहे. संशोधकांनी उंदराच्या पेशींमध्ये ग्लुकोजचे सेवन उत्तेजित करून त्याच्या रसाच्या परिणामाचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 

 फायबरच्या गुणधर्मामुळे नियंत्रित होते  रक्तातील साखर

अरुगुलाच्या पानांमध्ये भरपूर फायबर असते. फायबर रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते आणि इन्सुलिन प्रतिरोध कमी करू शकते.  उच्च फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते, याचा अर्थ ते जास्त खाणे टाळण्यास मदत करते.

अरुगुला कसे वापरावे

तुम्ही ते सॅलडच्या स्वरूपात घेऊ शकता. याशिवाय भाजी म्हणूनही खाऊ शकता. याच्या चवीमुळे लोकांना ते इतर अनेक गोष्टींमध्ये मिसळून खायला आवडते. तुम्ही रोज त्याची काही पाने चावू शकता किंवा त्याचा रस पिऊ शकता.

डिस्क्लेमर:  हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी