winter season मध्ये लहान मुलांना घेरतात हे 10 आजार, या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचं baby राहीलं फिट

Children care in winter : हिवाळ्याच्या मोसमात, सर्दी आणि खोकल्याचा प्रभाव अनेक मुलांमध्ये दीर्घकाळ टिकू शकतो. अशा परिस्थितीत त्यांना वाढत्या थंडीपासून सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.

Here are 10 illnesses that plague babies in winter, and if you take care of these things, your baby will not get sick
winter season मध्ये लहान मुलांना घेरतात हे 10 आजार, या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचं baby राहीलं फिट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • हिवाळ्यात अनेक संसर्गजन्य आजारात वाढत होते
 • तुमच्या लहान मुलाची विशेष काळजी घेतली पाहिजे
 • मुलांच्या आहारात गरम पदार्थांचा समावेश करा.

Children care in winter : सद्या थंडीने (Cold) सर्वत्र हुडहुडी भरली आहे. अशा थंडीच्या वातावरणात काही आजारांचा (Illness) धोका जास्त असतो, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. यातील काही आजार असे देखील आहेत, जे तुम्हाला थेट रुग्णालयात नेऊ शकतात. या हिवाळ्याच्या ऋतूमध्ये विशेषतः लहान मुलांच्या (Little kids) आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण जसजसा हिवाळा वाढत जातो तसतशी लहान मुलांना फ्लू आणि न्यूमोनियाची (Flu and pneumonia) तक्रार होऊ लागली आहे. (Here are 10 illnesses that plague babies in winter, and if you take care of these things, your baby will not get sick)

हिवाळ्याच्या मोसमात, सर्दी आणि खोकल्याचा प्रभाव अनेक मुलांमध्ये दीर्घकाळ टिकू शकतो. अशा परिस्थितीत त्यांना वाढत्या थंडीपासून सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. या ऋतूत मुलांना ताप, खोकला, सर्दी यांची तक्रार असेल तर हलके न घेता लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवावे.  

हिवाळ्यात मुलांचे सामान्य आजार

 1. सांधे दुखी
 2. सर्दी आणी ताप
 3. सर्दी आणि खोकला
 4. नाक बंद
 5. शिंका येणे
 6. डोकेदुखी
 7. शरीर वेदना
 8. विषाणूजन्य ताप
 9. घसा खवखवणे
 10. कान संसर्ग

हिवाळ्यात मुलांची अशी काळजी घ्या

 1. मुलांना व्यवस्थित कपडे घाला.
 2. मुलाचे डोके आणि कान नेहमी झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा.
 3. झोपताना, मुलांना ब्लँकेटने अशा प्रकारे झाकून टाका की ते संपूर्ण रात्र झाकलेले राहील.
 4. ज्या भागात थंडी जास्त आहे, तिथे मुलांना अजिबात घेऊ नका.
 5. खिडकी किंवा दरवाजाजवळच्या खोलीत मुलाला कधीही ठेवू नका.
 6. खूप थंडी असताना घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा.
 7. मुलांच्या आहारात गरम पदार्थांचा समावेश करा.
 8. बाळांना दररोज 1 अंडे द्या
 9. मुलांना रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध द्यावे
 10. मुलांचे थंडीपासून संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे

बालरोगतज्ञांचा असा विश्वास आहे की कमी तापमान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते, कारण त्यांच्या शरीरासाठी तापमान राखणे कठीण आहे. अशा परिस्थितीत मुलांना थंडीपासून वाचवणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी