Dumbbell Exercises: सिक्स पॅक ॲब्स बनवण्यासाठी डंबेलच्या मदतीने करा हे ५ व्यायाम, संपूर्ण शरीराला मिळेल फायदा

Dumbbell Exercises | आपलेही सिक्स पॅक ॲब्स व्हावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी लोक अनेकदा जिममध्ये वर्कआउट करण्यासोबतच त्यांच्या आहारातही बदल करतात. मात्र एवढी मेहनत करून देखील काही वेळा सिक्स पॅक ॲब्स बनवण्यात त्यांना यश मिळत नाही.

 Here are 5 exercises to do with the help of dumbbells to make six pack abs
सिक्स पॅक ॲब्स बनवण्यासाठी डंबेलच्या मदतीने करा हे ५ व्यायाम  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ट्विस्ट व्यायामासह रिव्हर्स लंज करण्यासाठी दोन्ही पायांमध्ये खांद्याप्रमाणेच अंतर ठेवा. 
  • सिंगल-लेग रिव्हर्स फ्लाय व्यायामाचा सराव केल्याने तुमच्या टाचा मजबूत होतात.
  • नियमितपणे डंबेलचा व्यायाम केल्याने देखील ॲब्स तयार करण्यासाठी मदत होते.

Dumbbell Exercises | मुंबई : आपलेही सिक्स पॅक ॲब्स व्हावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी लोक अनेकदा जिममध्ये वर्कआउट करण्यासोबतच त्यांच्या आहारातही बदल करतात. मात्र एवढी मेहनत करून देखील काही वेळा सिक्स पॅक ॲब्स बनवण्यात त्यांना यश मिळत नाही. आज आपण अशाच काही व्यायामांबद्दल भाष्य करणार आहोत जे तुम्ही डंबेलच्या मदतीने सहजरित्या करू शकता. हे व्यायाम केल्याने ताकद वाढण्यासही मदत होते. (Here are 5 exercises to do with the help of dumbbells to make six pack abs). 

दरम्यान, नियमितपणे डंबेलचा व्यायाम केल्याने देखील ॲब्स तयार करण्यासाठी मदत होते. हे व्यायाम केल्याने पाठीच्या खालच्या भागातल्या दुखण्यापासून मुक्त होण्यासही मदत होते. 

अधिक वाचा : जाणून घ्या परशुराम जयंतीचा शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत

१) रिवर्स लंज विथ ट्विस्ट (Reverse Lunge With Twist)

हा व्यायाम केल्याने सिक्य पॅक ॲब्स बनण्यास मदत होते. असे केल्याने शरीरातील ताकद वाढते. ट्विस्ट व्यायामासह रिव्हर्स लंज देखील स्नायूंसाठी फायदेशीर आहे. 

* ट्विस्ट व्यायामासह रिव्हर्स लंज करण्यासाठी दोन्ही पायांमध्ये खांद्याप्रमाणेच अंतर ठेवा. 
* आता एका हाताने डंबेल घ्या आणि ते छातीजवळ आणा.
* असे केल्यानंतर उजवा पाय मागे सरकवा. 
* आता गुडघ्यांमध्ये ९० अंशाचा कोन तयार होईल. 
* त्यानंतर स्वत:ला पुढे थोडे झुकवा.
* आता शरीर डावीकडे आणि उजवीकडे वळवा.
* तुम्हाला तुमच्या पाठीच्या मध्यभागी ताण जाणवेल.
* दुसऱ्या पायानेही अशीच क्रिया करा. 

२) सिंगल-लेग रिव्हर्स फ्लाय (Single-Leg Reverse Fly)

सिंगल-लेग रिव्हर्स फ्लाय व्यायामाचा सराव केल्याने तुमच्या टाचा, पाय आणि मांड्या मजबूत होतात. हा व्यायाम करणे अतिशय सोपा आहे.

* हा व्यायाम करताना तुमची पाठ सरळ ठेवा आणि हातात डंबेल घ्या. 
* हवेत एक पाय मागे वळवा आणि पुढे ९० अंश वाकवा.
* हालचाल न करता संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न करा. 
* आता कोपर वाकवून वजन वर आणा.
* त्यानंतर हात खाली घ्या.

अधिक वाचा : Basweshwar Jayanti 2022: बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा द्या

३) रशियन ट्विस्ट (Russian Twist) 

ही एक्सरसाइज रोज केल्याने कोर टोन होण्यास मदत होते. अशाप्रकारे हे ॲब्स बनवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. ज्यांना ॲब्स बनवायचे आहेत ते हा व्यायाम रोज करू शकतात. 

* गुडघे टेकून जमिनीवर झोपा.
* छाती फुगवा आणि छातीसमोर डंबेल आणा.
* आता शरीर थोडे मागच्या बाजूला वाकवा.
* आता मोकळा श्वास घेताना, शरीर उजवीकडे आणि डावीकडे वळवा. 
* काही काळ असेच राहा आणि नंतर पहिल्या अवस्थेत या. 

अधिक वाचा : ओळख करत शिक्षकाने शिक्षिकेवर केला बलात्कार

४) रेनगेड रो विथ पुश अप (Renegade Row With Push Up)

हा व्यायाम पुश अप सारखाच आहे. असे केल्याने संपूर्ण शरीराला फायदा होतो. असे केल्याने अॅब्स बनण्यास मदत होते.

* सर्वप्रथम आपल्या हातात डंबेल घ्या. 
* डंबेल धरून आपले हात जमिनीवर ठेवा.
* कोर आणि ग्लूट्स घट्ट ठेवा आणि पुश अप करा.
* वर येताना उजवी कोपर वर खेचा.
* डंबेल खाली ठेवा आणि डाव्या हाताने देखील हीच क्रिया करा. 

५) वुड चॉप (Wood-Chop)

वुड चॉपचा व्यायाम पोटाच्या वरच्या भागासाठी फायदेशीर आहे. यामुळे स्नायूंना फायदा होतो. या व्यायामाचा रोज सराव केल्यास जास्त फायदा होतो.

* डंबेल धरून सरळ उभे रहा. एक पाय मागे घ्या.
* दोन्ही हात डाव्या बाजूला वर करा.
* यानंतर, डंबेल खाली आणा आणि त्याला सरळ पायांनी स्पर्श करा.
* ही क्रिया १० ते १२ वेळा करा. 

सिक्स पॅक ॲब्स बनवण्यासाठी तुम्ही हे व्यायाम डंबेलच्या मदतीने करू शकता. असे केल्याने तुमच्या संपूर्ण शरीराला फायदा होतो.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी