Water Weight Loss: 'या' पाच पद्धतीने कमी करा आपल्या शरिरातील पाण्याचे वजन, काय असतं पाण्याचं वजन?

जर आपल्या शरिरात वॉटर रिटेंशन होत असेल तर काळजी करु नका. कारण ही स्थिती तात्पुरती असते, ही स्थिती काही दिवसात सामान्य देखील होईल.

Here are five ways to reduce your body water weight
'या' पाच पद्धतीने कमी करा आपल्या शरिरातील पाण्याचे वजन  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • अधिक पाणी न पिल्याने शरीर पाणी साठवते
  • आहारात टोमॉटो आणि टरबूजचा समावेश करा
  • केळी, बटाटे आणि पालकमधून शरिराला पोटॅशियम मिळतं

नवी दिल्ली : जर आपल्या शरिरात वॉटर रिटेंशन होत असेल तर काळजी करु नका. कारण ही स्थिती तात्पुरती असते, ही स्थिती काही दिवसात सामान्य देखील होईल. पण जेव्हा तुमच्या शरिरात पाणी जमा होण्यास सुरुवात झाल्यास तेव्हा वॉटर रिटेंशन ही एक समस्य़ा होत असते. विशेषत: जेव्हा वजन कमी - जास्त होत असते तेव्हा तुम्ही तणावात येत असतात. जेव्हा शरिरात पाणी जमा होत असतो तेव्हा एक व्यक्तींचं वजन वाढत जातं. ज्याला पाणीचं वजन म्हटलं जातं. जर तुम्हालाही शरिरात पाणी जमा होण्याची समस्या असेल तर काळजी करु नका  आजच्या लेखात आपण यावरील उपयाविषयी जाणून घेणार आहोत (Here are five ways to reduce your body water weight )

काय आहे पाणीचं वजन 

माणसाच्या शरीर ६० टक्के पाण्याचं असतं. जे बहुतेक पेशींमध्ये आढळत असते. एखाद्या व्यक्तीमध्ये जेव्हा वजन वाढू लागतं तेव्हा उतींमध्ये द्रव गोळा होण्यास सुरुवात होऊ लागते आणि अंगाला सूज येऊ लागते. हे असं तेव्हा होतं जेव्हा तुम्ही कमी पाण्याच कमी सेवन करत असतात. शरिरात पुरेसे पाणी नसल्याने शरिर अतिरिक्त पाणी बाहेर विसर्जित करण्याऐवजी ते जमा करत असते. 
पाणीचं वजन कमी करण्यासाठी काय करावं

 कार्बचे सेवन कमी करा

कार्बोहायड्रेट हे आपल्या शरीरात आवश्यक असलेल्या तीन आवश्यक पोषक घटकांपैकी एक आहे. ज्याला आपल्या शरीराची मुबलक गरज आहे. जेव्हा आपण जास्त प्रमाणात वापर करता तेव्हा यामुळे पाण्याचे प्रतिधारण होते.जेव्हा आपण बर्‍याच कार्बचे सेवन करता, ज्याचा उपयोग शरीर उर्जा तयार करण्यासाठी होत नाही, तेव्हा ते ग्लायकोजेनमध्ये रूपांतरित होते आणि उर्जेसाठी स्नायूंमध्ये साठवले जाते. म्हणूनच, पाण्याचे वजन कमी करण्यासाठी, कार्बचे सेवन कमी करा.

सोडियमचे प्रमाण कमी करा

मीठ पाण्याचा आकर्षित करत असतं, यामुळे तुमचं शरीर अधिक पाणी साठवत असते. याच कारणामुळे सूज आणि वजन वाढत असते. जर आपण काही काळासाठी खारट(नमकीन) स्नॅक्स घेत असाल तर ही वेळ थांबविण्याची वेळ आली आहे. अनेक प्रकारच्या भाज्याही पोटाच्या सूजेचं कारण बनत असते. परंतु पाणी भरणे ही एक वेगळी गोष्ट आहे. आपल्या शरिरात एका दिवसात फक्त २,३०० मिलीग्राम मीठाची गरज असते. तसेच काही खाण्याच्या वस्तूंमध्ये मीठ प्राकृतिक रुपाने असतेच त्यामुळे मीठाचे सेवन करताना काळजी घ्यावी.

निरोगी रहा

पाण्याचं वजन कमी करण्यासाठी अधिक पाणी पिण्याची गरज असते. आपलं शरिर हे अधिकत्तर पाण्याने बनलेले आहे. बऱ्याचवेळा आपण पुरेसे पाणी पित नसल्याने आपले शरीर पाणी जमा करण्यास सुरुवात करत असते. यामुळे बद्धकोष्ठता (कब्ज) ची समस्या सुरू होत असते. जेव्हा तुम्ही दररोज दोन ते तीन लिटर पाणी प्यायाल तेव्हा तुमचं शरीर पाणी जमा करणं बंद करू देईल, आणी अतिरिक्त पाणी मुत्राद्वारे विसर्जित करत असते. तुमच्या आहारात टरबूज आणि टोमॉटोचा समावेश करु घ्या.

आहारात अधिक पोटॅशियम समाविष्ट करा

पोटॅशियम हे एक महत्त्वपूर्ण पोषक तत्व आहे, जे आपल्या मज्जासंस्था आणि स्नायूंना संकुचित करण्यास मदत करते. हे सोडियमच्या विरूध्द कार्य करते, पेशींना पोषक पाठवते आणि खराब घटकांना पेशींच्या बाहेर काढत असते. जर शरीरातील पाण्याचे वजन वाढविले गेले तर आहारात पोटॅशियमयुक्त आहार घेतल्यास रक्तदाब आणि पाण्याचे प्रमाण कमी होते. केळी, बटाटे आणि पालक हे पोटॅशियमचे चांगले स्रोत आहेत.

 व्यायाम करा

शरिरातील पाण्याच वजन कमी करण्याचा सर्वात चांगाल मार्ग म्हणजे व्यायाम. दररोज व्यायाम केल्याने घाम निघत असतो, यातून शरिरात पाणी कमी होत जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी