नवी दिल्ली : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बदलेली जीवनशैली, तणाव आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे वजन वाढू शकते. लठ्ठपणा वाढल्याने पोटाची चरबी वाढते आणि त्यामुळे पोट दिसू लागते. या पोटावरील चरबी अनेक आजारांचा धोकाही वाढवतो, त्यामुळे आपण पोटाची चरबी (Belly Fat) कमी करणे गरजेचे आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी विविध व्यायाम प्रकार करणं गरजेचं आहेच, सकस आहार घ्यावा, ज्यामुळे चरबी कमी होण्यास आणखी मदत होते. पण तुम्हाला माहिती आहे, तुमच्या घरातील स्वयंपाक घरातील काही भाज्या ह्या तुमच्या पोटावरील चरबी करण्यास उपयुक्त आहेत. याविषयी आपण यात जाणून घेणार आहोत...
उन्हाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाणे गरजेचे आहे. विशेषतः पालकचा आहारात समावेश करावाच. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. पालेभाज्यांमधून कमी फॅट मिळतात.
पेरूमध्ये भरपूर फायबर असते. यामुळे तुमची पचनक्रिया मजबूत राहते आणि चरबी कमी होण्यास मदत मिळते. बद्धकोष्ठता आणि पोटांच्या विकारांवरही पेरू खाणं फायदेशीर ठरतं.
कोणत्याही ऋतुमध्ये गाजराचा आहारात समावेश केल्यास तुम्हाला फायदा होईल. गाजरात भरपूर पोषक घटक असतात आणि त्यात फायबरही भरपूर असते. गाजर खाल्ल्याने बराच काळ पोट भरलेले राहते आणि पुन्हा पुन्हा खाण्याची गरज पडत नाही. पोटाची चरबी कमी करण्यासाठी गाजराचा रस किंवा सूपचे देखील सेवन केले जाऊ शकते.
दालचिनीमध्ये सिनसामाल्डिहाइड घटक असतो, जे फॅटी व्हिसरल टिश्यूचे चयापचय उत्तेजित करते. त्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे दालचिनीचाही आहारात समावेश करावा.
(सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ त्याची हमी देत नाही.)