Hair Care Tips: डोक्याच्या खाजीमुळे झालाय त्रस्त? हे प्रभावी उपाय देतील आराम

तब्येत पाणी
Updated May 21, 2022 | 16:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Home Remedies for Itchy Scalp । प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे डोक्याला खाज सुटते, ज्याचा प्रत्येकाला कधी ना कधी सामना करावा लागतो. दरम्यान केसांना खाज येण्याच्या समस्येने अनेकांना त्रास होतो.

Here are some home remedies for hair care
डोक्याच्या खाजीमुळे झालाय त्रस्त? हे प्रभावी उपाय देतील आराम  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे डोक्याला खाज सुटते.
  • उन्हाळ्यात केसांच्या स्थितीनुसार दिवसाआड शाम्पूचा वापर करा.
  • शाम्पू लावल्यानंतर केस बांधण्यापूर्वी ते चांगले कोरडे करा.

Home Remedies for Itchy Scalp । मुंबई : प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे डोक्याला खाज सुटते, ज्याचा प्रत्येकाला कधी ना कधी सामना करावा लागतो. दरम्यान केसांना खाज येण्याच्या समस्येने अनेकांना त्रास होतो. केसांचे तज्ञ सांगतात की, यामागील कारण असे की केसांमध्ये धूळ आणि कोंड्याची समस्या उद्भवल्याने खाज सुटते. याशिवाय केसांचा रंग, बुरशीजन्य संसर्ग, चिंता किंवा उवा हे देखील कोंडा होण्याचे कारण असू शकतात.(Here are some home remedies for hair care). 

अधिक वाचा : पीव्ही सिंधूचा थायलंड ओपनच्या सेमीफायनलमध्ये पराभव

उन्हाळ्यात केसांच्या स्थितीनुसार दिवसाआड शाम्पूचा वापर करा. मात्र शाम्पूचा जास्त वापर आपल्या डोक्यातील टाळूचा ओलावा गायब करू शकतो. त्यामुळे शाम्पू निवडताना तुमच्या केसांसाठी कोणता शाम्पू योग्य आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 
 
शाम्पू लावल्यानंतर केस बांधण्यापूर्वी ते चांगले कोरडे करा. केसांमधील ओलेपणामुळे बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत शक्य तितके आपले डोके कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा.

केस खूप घट्ट बांधू नका. असे केल्याने केस कमकुवत होतात आणि गळू लागतात. त्यामुळे केसांची मुळे ओढून बांधण्याऐवजी हलकेच बांधा.

- टॉवेल किंवा कंगवा कधीही एकमेकांचा वापरू नका. खासकरून जेव्हा कोंड्याची समस्या असते. त्यामुळे कोंडा, बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्ग एकमेकांच्या त्वचेपर्यंत पोहोचू शकतात. इतकेच नाही तर या गोष्टी एकमेकांना शेअर करण्याची सवय देखील नव्या समस्येचे कारण बनू शकते, जे डोक्यात खाज येण्याचे सर्वात मोठे कारण आहे.

स्विमिंग पुलमधील क्लोरीनयुक्त पाणी केसांना इजा करू शकते. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा तुम्ही पोहायला जाल तेव्हा शॉवर कॅप घाला. किंवा केसांना कंडिशनर लावा. स्विमिंग पुलमधून बाहेर आल्यानंतर लगेच केस स्वच्छ पाण्याने धुवा.

-  उन्हाळ्यात डोक्याला संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो, त्यामुळे कडुलिंबाच्या झाडाचे तेल, टी ट्री ऑइल इत्यादी अँटी-बॅक्टेरियल घटकांनी डोक्याला मसाज करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी