Weight Loss Tips: गरमीमध्ये अशा प्रकारे सहज कमी करा वजन; फॉलो करा या टिप्स

तब्येत पाणी
Updated Jun 09, 2022 | 10:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Lose Weight Like This In Summer | उन्हाळ्याच्या दिवसात लोकांचे वजन अधिक वाढते. मात्र आता याबाबतीत एक दिलासादायक बाब समोर आली आहे. कारण उन्हाळ्यात देखील सहज वजन सहज कमी करता येते. आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येकजण लठ्ठपणाने त्रस्त आहे.

Here's how to lose weight on a summer day
गरमीमध्ये अशा प्रकारे सहज कमी करा वजन, फॉलो करा या टिप्स   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गरमीमध्ये सहजपणे वजन कमी करण्यासाठी टिप्स.
  • उन्हाळ्याच्या दिवसात लोकांचे वजन अधिक वाढते.
  • उन्हाळ्यात फायबरयुक्त आहार घ्यावा.

Lose Weight Like This In Summer । मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात लोकांचे वजन अधिक वाढते. मात्र आता याबाबतीत एक दिलासादायक बाब समोर आली आहे. कारण उन्हाळ्यात देखील सहज वजन सहज कमी करता येते. आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येकजण लठ्ठपणाने त्रस्त आहे. लठ्ठपणा केवळ तुमचा लूकच खराब करत नाही तर लठ्ठपणामुळे तुम्हाला अनेक आजारही होतात. त्यामुळे नेहमी फिट असणे गरजेचे आहे. चला तर म जाणून घेऊया स्वत:ला फिट ठेवण्याचे उपाय. (Here's how to lose weight on a summer day). 

अधिक वाचा : बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे तयार होतोय राजयोग, वाचा सविस्तर

या पद्धतीने करा वजन कमी

  1. आहारात फायबरचा समावेश करा - उन्हाळ्यात फायबरयुक्त आहार घ्यावा. लक्षणीय बाब म्हणजे फायबरचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. म्हणून तुम्ही तुमच्या आहारात स्ट्रॉबेरी, प्लम्स, कलिंगड इत्यादींचा समावेश करू शकता. तसेच जर तुम्हाला तंदुरुस्त राहायचे असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात ६० टक्के फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा. असे केल्याने तुम्ही उन्हाळ्यातही तुमचे वजन कमी करू शकता.
  2. दररोज चालत जा - उन्हाळ्यात व्यायाम अथवा एक्सरसाइज कमी होते, त्यामुळे वजन झपाट्याने वाढू लागते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही उन्हाळ्यातही रोज व्यायाम केला पाहिजे आणि व्यायाम करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे चालणे. तुम्ही सकाळच्या वेळेचा वापर करून रोज ३० ते ४० मिनिटे चालू शकता. याशिवाय तुम्ही रात्री जेवल्यानंतर देखील चालू शकता असे केल्याने पोटातील चरबी कमी होण्यास मदत होते. 
  3. ग्रीन टीचे सेवन करा - ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. कॅलरीज कमी करण्यासाठी तुम्ही ग्रीन टीचे सेवन करू शकता. यासाठी तुम्ही दिवसातून २ ते ३ वेळा ग्रीन टीचे सेवन करू शकता. तर उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी लोक थंड पेय किंवा अनहेल्दी पेयांचे सेवन करतात. पण त्याऐवजी तुम्ही नारळपाणी आणि ग्रीन टीचे सेवन करू शकता.

डिस्क्लेमर : सल्ल्यासह ही सामग्री केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Timesnow मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी