केसांचा क्षणात कायापाटल करतं 'हे' लाल फूल, जाणून घ्या नेमकं कसं..

तब्येत पाणी
Updated Apr 07, 2023 | 15:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hibiscus Flower For Hair: मऊ, दाट आणि मजबूत केस असावे, अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. केसांची (Hair Care tips) वाढ होण्यासाठी बाजारात अनेक ऑईल, जेल उपलब्ध आहेत. परंतु त्यात असलेल्या केमिकलमुळे केसांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी एक आयुर्वेदिक उपाय (Ayurvedic Upay) घेऊन आलो आहे. 

Hibiscus Flower For Hair
केसांचा क्षणात कायापाटल करतं 'हे' लाल फूल, जाणून घ्या नेमकं कसं..  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • जास्वंदाचं फूलमध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात आढळते. विशेष म्हणजे यात आवश्यक अमीनो एसिड्स देखील असते.
  • केस दाट आणि मजबूत करण्यासाठी तुम्ही जास्वंदाच्या फुलाचा हेअर पॅक लावू शकतात.
  • तुम्हाला कदाचित माहित नसेल जास्वंदाच्या फुलात एंटीमायक्रोबियल गुणधर्म असतो.

Hair Care tips: आयुर्वेदात प्रत्येक आजारावर औषध आहे. तसेच केसांशी संबंधित समस्येवर देखील उपाय सांगण्यात आले आहेत. असाच एक उपाय आहे, तो म्हणजे लाल फुलाचा उपाय. जास्वंद फूल (Hibiscus Flower) हे केसांसाठी खूप फायदेशीर आहे. जास्वंदाच्या फुलाचा उपाय (Hibiscus Flower Benefits) केल्याने केस मऊ, दाट आणि मजबूत होतात. चला तर मग जास्वंदाच्या फुलाचा केसांवर कसा वापर करायचा जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप...

केसांसाठी रामबाण जास्वंदाचं फूल... Hibiscus Flower For Hair 

जास्वंदाचं फूलमध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात आढळते. विशेष म्हणजे यात आवश्यक अमीनो एसिड्स देखील असते. त्यामुळे केसांवर नॅच्युरल कंडीशनरसारखा परिणाम दिसून येतो. जास्वंदाच्या फुलामुळे केस वाढीस मदत होते. तसेच हेअर फॉलिकल्ससाठी देखील फायदा होतो. केस कमी (Hair Fall) गळतात. 

तुम्हाला कदाचित माहित नसेल जास्वंदाच्या फुलात एंटीमायक्रोबियल गुणधर्म असतो. त्यामुळे डँड्रफची (Dandruff) देखील समस्या दूर होते. डँड्रफ वाढवणारे फंगस देखील यामुळे दूर होतात. अकाली केस पांढरे होत असतील तर, त्यावर देखील जास्वंदाच्या फुलाचा उपाय रामबाण ठरतो. केस नैसर्गिक पद्धतीने काळे करण्यासाठी जास्वंदाचं फूक परिणामकारक ठरू शकते. 

जास्वंदाच्या फुलांचा हेअर पॅक..

केस दाट आणि मजबूत करण्यासाठी तुम्ही जास्वंदाच्या फुलाचा हेअर पॅक लावू शकतात. हेअर पॅक तयार करण्यासाठी एक जास्वंदाचं फूल, 3 ते 4 जास्वंदाच्या झाडाची पानं. 4 चमचे दही घ्या. सर्व सामग्री एकत्र करून ते मिक्सरमध्ये फिरवून घ्या. तयार झालेलं मिक्षिण (Hibiscus Hair Mask) केसांवर लावले. हेअर पॅक जवळपास एक तास ठेवून नंतर तो धुवून टाकावा. आठवड्यातून एकदा उपाय केल्यास केस अधिक दाट आणि मजबूत होतात.

केसांमधील कोंडा असा करा दूर...(Dandruff)

तुमच्या केसांत कोंडा (Dandruff) झाला असेल तर तुम्ही जास्वंदाच्या फुलाचा हेअर पॅक लावू शकतात. मास्क तयार करण्यासाठी 4-5 जास्वंदाचे फूल घ्या. एक चमचा मेथीचे दाणे आणि अर्धा कप ताक घ्या. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. नंतर त्यात जास्वंदाच्या फुलाच्या पाकळ्या, पानं आणि ताक टाकून आणिक बारीक करून घ्या. हेअर पॅक साधारण एक तास केसांवर ठेवून नंतर तो धुवून टाकावा. केसांची चांगली वाढ होण्यासाठी हेअर पॅक आठवड्यातून एक-दोनदा तुम्ही केसांवर लावू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी