आयुष्यात कधीच वाढणार नाही Cholesterol, 'या' 4 गोष्टी खाणं फक्त टाळा

कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढणं ही एक गंभीर समस्या बनली आहे. या समस्येमुळे अनेकांना त्रास होतो.

 High cholesterol
High cholesterol avoid foods  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • जर कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये (Blood Vessels)अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
  • शरीरातील रक्तप्रवाह मंदावल्यानं किंवा थांबल्यानं हृदयविकार (Heart Attack) आणि पक्षाघाताचा (stroke)धोका वाढू शकतो.
  • शरीर आवश्यक असलेलं कोलेस्ट्रॉल तयार करतं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

नवी दिल्ली: कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढणं ही एक गंभीर समस्या बनली आहे. या समस्येमुळे अनेकांना त्रास होतो. कोलेस्ट्रॉल हा एक मेणासारखा पदार्थ असतो. जो रक्तवाहिन्यांमध्ये जमा होत असतो. जर कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये (Blood Vessels)अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे शरीरातील रक्त परिसंचरण थांबण्याची शक्यता असते. साहजिकच, शरीरातील रक्तप्रवाह मंदावल्यानं किंवा थांबल्यानं हृदयविकार (Heart Attack) आणि पक्षाघाताचा  (stroke)धोका वाढू शकतो. 

कोलेस्ट्रॉल कसा वाढतो? 

शरीर आवश्यक असलेलं कोलेस्ट्रॉल तयार करतं हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तुमच्या शरीरात चुकीच्या खाण्यापिण्यानं जमा होणारे कोलेस्ट्रॉल धोकादायक असते. निरोगी जीवनशैली आणि निरोगी खाण्याच्या सवयींमुळे तुम्ही तुमचे कोलेस्ट्रॉल निरोगी ठेवू शकता. ते नियंत्रणात ठेवल्यास हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका कमी होऊ शकतो.

कसं कमी कराल कोलेस्ट्रॉल? 

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या मते, कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी सॅच्युरेटेड चरबी आणि ट्रान्स फॅटमध्ये जास्त प्रमाणात आढळते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्त जमा होण्यास अडथळा येतो आणि नंतर हृदयविकारासारखे जीवघेणं रोग होण्याची शक्यता असते.

कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा उपाय 

CDC च्या मते, जर तुम्हाला उच्च कोलेस्ट्रॉल टाळायचं असेल तर तुम्ही सॅच्युरेटेड फॅटचं सेवन अजिबात करु नये. सॅच्युरेटेड फॅट हे चीज, मांस, दुधाचे पदार्थ आणि पाम तेल यासारख्या उत्पादनांमध्ये आढळून येते. या पदार्थांचं सेवन करणं टाळावं. ज्या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त असते त्यात कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असते.

जास्त मीठ आणि साखर टाळा, अन् कमी करा कोलेस्ट्रॉल

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय करावं?, यावर अगदी सोपे उपाय आहेत. तुम्ही तुमच्या दैनंदिन खाण्याच्या पदार्थांमध्ये सोडियम म्हणजे मीठ आणि साखर कमी असलेल्या पदार्थांची निवड करा. या पदार्थांमध्ये दुबळे मांस, सीफूड, कमी चरबीयुक्त दूध, चीज आणि दही, संपूर्ण धान्य, फळे आणि भाज्या यांचा समावेश होतो. 

तंबाखूचे सेवन टाळा

धूम्रपानामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होत असते. हे रक्तवाहिन्यांच्या कडकपणाला गती देत असते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढवते. तुम्ही धूम्रपान करत असाल तर आजच सोडा. ते वगळल्याने हृदयविकाराचा धोका कमी होईल.

मद्यपान करणं टाळा

जास्त अल्कोहोल कोलेस्टेरॉलची पातळी आणि ट्रायग्लिसराइड्स वाढवू शकते, असं सीडीसीचं मत आहे. जे रक्तातील चरबीचा एक प्रकार आहे. जास्त मद्यपान करणं टाळा. पुरुषांनी दररोज दोन पेक्षा जास्त आणि महिलांनी एकापेक्षा जास्त ड्रिंक करु नये. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी