History and significance of 24 March World TB Day, History and significance of 24 March World Tuberculosis Day : टीबी अर्थात क्षय या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 24 मार्च या दिवशी जागतिक टीबी डे अर्थात जागतिक क्षय दिन पाळला जातो. यंदा शुक्रवार 24 मार्च 2023 रोजी जागतिक टीबी डे अर्थात जागतिक क्षय दिन आहे.
टीबी हा एक संसर्गजन्य आजार आहे. हा आजार मायकोबॅक्टीरियम ट्युबरक्लोसिस जीवाणुच्या संसर्गामुळे होतो. मायकोबॅक्टीरियम ट्युबरक्लोसिस जीवाणू श्वसनसंस्थेवर हल्ला करतात. फुफ्फुसांना निकामी करण्यास सुरू करतात. फुफ्फुसे निकामी झाल्यानंतर हळू हळू शरीरातील इतर अवयव पण निकामी होत जातात.
हवेतून पसरणाऱ्या जीवाणूमुळे टीबी होण्याचा मोठा धोका असतो. याच कारणामुळे टीबीच्या रुग्णाला स्वतंत्र खोलीत ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देतात. या रुग्णाने वापरलेले कपडे आणि वस्तू डेटॉल मिश्रीत गरम पाण्यातून धुवाव्या असेही डॉक्टर सांगतात. टीबीच्या रुग्णाला सतत मास्कद्वारे नाक आणि तोंड झाकण्याचा तसेच स्वतःसोबत एक मोठा हातरुमाल अथवा टॉवेल बाळगण्याचा सल्ला दिला जातो. खोकताना, शिंकताना, बोलताना टीबीच्या रुग्णाच्या नाकातोंडातून कळत नकळत पडलेल्या ड्रॉपलेटमधून संसर्ग पसरण्याचा धोका असतो. याच कारणामुळे रुग्णाला मास्क वापरण्याचा तसेच सोबत हातरुमाल अथवा टॉवेल बाळगण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
उन्हाळ्यात माठातले पाणी पिण्याचे अद्भूत फायदे
Coconut Water : नारळ पाणी पिण्याचे फायदे
टीबी हा सुप्तावस्थेत तसेच सक्रीय अवस्थेत अशा दोन प्रकारात असतो. सुप्तावस्थेत असताना टीबीचा जीवाणू निष्क्रीय असतो. या काळात व्यक्तीला काही त्रास नसतो. पण टीबीचा जीवाणू सक्रीय झाला तर रुग्णाला धोका असतो.
Coconut Water : नारळ पाणी पिण्याचे फायदे
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अंदाजानुसार जगात 2 अब्जपेक्षा जास्त टीबी रुग्ण आहेत. बहुसंख्य टीबी रुग्णांच्या शरीरातील टीबी हा सुप्तावस्थेत असल्यामुळे त्यांना संसर्ग झाल्याचे लवकर कळत नाही. याउलट ज्यांच्या शरीरात टीबीचे जीवाणू सक्रीय असतात त्यांची तब्येत हळू हळू ढासळू लागते.
उन्हाळ्यात हेल्दी आणि फिट राहण्यासाठी खा ही 7 फळे
हिरड्या सुजल्या दातांतून रक्त आले तर करा हे उपाय
सलग एक ते तीन आठवडे खोकला न थांबता सुरू राहणे
खोकताना तोंडातून रक्त बाहेर येणे
छातीत दुखणे आणि दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे
वजन वेगाने कमी होणे, सतत थकल्यासारखे वाटत राहणे
भूक न लागणे, जिभेची चव जाणे
संध्याकाळी ताप येणे आणि थंडी वाजणे
रात्री खूप घाम येणे
March 2023 Marathi Calendar : मार्च 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस
Important Days in March 2023 : मार्च महिन्यात साजरे करतात हे महत्त्वाचे दिवस
टीबी आणि फुफ्फुसांशी संबंधित आजारांविषयी जनजागृती करणे तसेच अशा आजारांनी पीडित असलेल्या वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न करणे या हेतूने एका आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना करण्यात आली. इंटरनॅशनल युनियन अगेन्स्ट ट्युबरक्लोसिस अँड लंग्स डिसीज असे या संस्थेचे नाव आहे. ही संस्था 20 ऑक्टोबर 1920 रोजी स्थापन झाली. संस्थेने 1982 पासून 24 मार्च रोजी जागतिक टीबी डे पाळण्यास सुरुवात केली. ही संस्था जागतिक आरोग्य संघटनेशी अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची संलग्न आहे. यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे सदस्य असलेले सर्व देश 24 मार्च रोजी जागतिक टीबी डे पाळतात. टीबी डे च्या निमित्ताने जनजागृती तसेच टीबी रुग्णांच्या उपचारांसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
उपलब्ध आकडेवारीनुसार दरवर्षी किमान 16 लाख नागरिकांचा टीबी मुळे मृत्यू होतो. या मृत्यू टाळण्यासाठी आजारी पडलेल्या प्रत्येकाने वेळेत डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून घेणे आवश्यक आहे. टीबीचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला वेळेत उपचार मिळाल्यास ती व्यक्ती बरी होऊ शकते. पण उपचार सुरू करण्यास दिरंगाई झाल्यास टीबी प्राणघातक ठरू शकतो. ही बाब ठेवून लक्षात आजारी व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळेत उपचार करून घेणे आवश्यक आहे.