Home remedies for pimples: थंडी असो वा उन्हाळा, प्रत्येक ऋतुत चेहऱ्याचं सौंदर्य बिघडवणारा घटक म्हणजे पिंपल्स. आता दिवाळी संपून लग्नसराई (Marriage Season) सुरु होत असताना अनेक महिला आणि पुरुषांना चेहऱ्यावर उठणारे हे पिंपल्स (Pimples) त्रास देत असतात. सार्वजनिक कार्यक्रमांना जाताना किंवा कौटुंबिक सोहळ्यात जाताना आपला चेहरा चांगला दिसावा आणि चेहऱ्याचं सौंदर्य टिकून राहावं, असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र चेहऱ्यावर पिंपल्स उठले तर त्यावर मेकअपही नीट करता येत नाही आणि मेकअपविना पिंपल्स उठलेला चेहरा तर अधिकच वाईट दिसतो. पिंपल्स घालवण्यासाठी बाजारात अनेक प्रॉडक्ट्स उपलब्ध असतात. मात्र घरगुती उपाय करून पिंपल्स घालवणं सर्वोत्तम मानलं जातं. जाणून घेऊया, असेच काही घरगुती उपाय.
नैसर्गिक मुलतानी मातीत अनेक उपयुक्त नैसर्गिक घटक असतात. मुलतानी माती त्वचेतील तेलकट घटकांना अलगद आणि प्रभावीपणे शोषून घेण्याचं काम करते. त्यामुळे चेहऱ्यावरची चमक परत येते. तेलकट त्वचेसाठी हा रामबाण उपाय मानला जातो.
मुलतानी माती घेऊन त्यात एक चमचा गुलाबजल मिसळा आणि काही वेळ भिजत ठेवा. त्यानंतर ही पेस्ट पिंपल्सवर लावा आणि काही वेळ सुकू द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्या. दिवसातून दोनवेळा तुम्ही हा उपाय करू शकता. तीन ते चार दिवसांत चेहऱ्यावरील पिंपल्स निघून जातील.
अनेक औषधी गुणांनी संपन्न असणारा मध हा अँटिसेप्टिकसारखं काम करतो. त्यामुळेच आजकाल प्रत्येक ब्युटी प्रॉडक्टमध्ये त्याचा उपयोग केला जातो. त्वचेसोबत आपल्या आरोग्यासाठीही तो गुणकारी मानला जातो. पिंपल्स घालवण्यासाठी त्याचा फायदा होतो.
नैसर्गिक मध थेट पिंपल्सवर लावा. थोडंस मध लावून काही वेळ तसेच ठेवा. त्यानंतर ओल्या कापडाने पुसून टाका.
अधिक वाचा - Reasons of Pimples : चेहऱ्यावर मुरुम येण्यामागची ही कारणे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या
कोरफडीचे फायदे आपण सर्वजण जाणतोच. त्वचा असो वा केस, कोरफडीतील औषधी गुण त्यासाठी फायदेशीरच ठरत असतात. घरी कोरफड लावून त्याचा उपयोग तु्म्ही करू शकता.
ॲलोविरा जेलमध्ये मध, मुलतानी माती, हळद मिसळा आणि त्याची पेस्ट पिंपल्सवर लावा. काही दिवसांतच पिंपल्स निघून जातील.
नारळाच्या तेलात अँटि इन्फ्लमेटरी आणि अँटि बॅक्टेरियल गुणधर्म असतात. चेहऱ्यावर पिंपल्स येण्यापासून या तेलामुळे बचाव होतो.
नारळाचं तेल कापसाच्या बोळ्याचा वापर करून पिंपल्सवर लावा. दररोज रात्री तुम्ही हा उपाय केलात, तर तीन ते चार दिवसात पिंपल्स निघून जातील.
अधिक वाचा - One diet a day: रोज फक्त एकदाच जेवण, चाळीशीतील श्वेता तिवारीच्या फिटनेसचं रहस्य
बर्फ आपल्या चेहऱ्यासाठी फायदेशीर असतो. ओपन पोअर्स बंद करून चेहरा चमकदार करण्यासाठी याचा उपयोग होतो.
बर्फाचा तुकडा एखाद्या स्वच्छ कापडात गुंडाळून त्याने पिंपल्सला शेक द्यावा. दिवसातून दोन ते तीन वेळा हा उपाय तुम्ही करू शकता.
डिस्क्लेमर - चेहऱ्यावरील पिंपल्सवरील हे काही घरगुती स्वरुपाचे उपाय आणि टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर प्रश्न अथवा समस्या असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेण्याची गरज आहे.