Home Remedies: हिवाळ्यामध्ये आठवड्याभरात मिळवा कोमल टाचा, जाणून घ्या खास उपाय

तब्येत पाणी
Updated Dec 10, 2019 | 16:40 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Cracked heels tips: हिवाळ्यात तुमच्या टाचांना भेगा पडतात? काळजी करू नका. कारण काही खास उपाय केले तर अगदी ८ दिवसांमध्ये आपल्या भेगा भरून टाचा नरम आणि मुलायम होऊ शकतात. तर मग जाणून घ्या हे उपाय...

Cracked heels tips
हिवाळ्यात आठवड्याभरात मिळवा कोमल टाचा,जाणून घ्या हे खास उपाय  |  फोटो सौजन्य: Getty Images

मुंबई: हिवाळा आला की कोरड्या त्वचेसोबतच अनेकांना टाचांना भेगा पडण्याचा त्रास सुरू होतो. कामा-कामामध्ये नेहमी महिला आपल्या चेहरा आणि हाता-पायवर तर लक्ष देतात पण त्यांचं पायाकडे दुर्लक्ष होतं. आपल्या टाचांना होत असलेला त्रास त्या सहन करतात आणि दुर्लक्षित करतात. हिवाळ्यामध्ये टाचेची त्वचा ही खूप कडक होते आणि कोरडी पडल्यामुळे त्याला भेगा पडू लागतात. आपण जर अशा भेगा पडलेल्या टाचांकडे दुर्लक्ष केलं तर सूज आणि दुखणं वाढू शकतं.

पायांच्या टाचांमध्ये तेल ग्रंथी नसतात, त्यामुळे तिथली त्वचा कोरडी होते. थंडीच्या दिवसांमध्ये तर ही त्वचा अधिकच कोरडी होते, म्हणून थंडी असो किंवा गरमी टाचांना मॉइश्चराइज करणं खूप गरजेचं असतं. जर आपल्या टाचांना भेगा पडल्या असतील तर आपण खूप साधे आणि सोपे उपाय करून पाय कोमल बनवू शकता.

जाणून घ्या भेगा असलेल्या टाचा सॉफ्ट बनविण्यासाठी खास घरगुती उपाय

लिंबाचा रस

लिंबाच्या रसामुळे त्वचा कोमल होते. रात्री झोपण्यापूर्वी पाय कोमट पाण्यामध्ये ५-१० मिनिटं बुडवूण ठेवावेत. पाण्यात थोडा लिंबाचा रसही घालावा. यानंतर पाय प्यूमिक स्टोननं स्क्रब करून धुवून टाकावेत. यामुळे आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळेल.

कडुलिंबाची पानं

कडुलिंबाच्या पानांमुळे टाचांमधील इन्फेक्शनही दूर होतं. कडुलिंबाच्या पानांमध्ये हळद आणि थोडं पाणी मिसळून पेस्ट तयार करावी. नंतर पाय चांगल्या पद्धतीनं स्वच्छ करून त्यावर ही पेस्ट लावावी. पेस्ट वाळल्यानंतर पाय पाण्यानं धुवून टाकावेत.

Honey Benefits

मध

कोमट पाण्यामध्ये मध मिसळून पाय त्या पाण्यात बुडवून ठेवावे. जवळपास १५-२० मिनीटांनी पाय प्यूमिक स्टोननं हलक्या हातानं स्क्रब करावे. पाय धुवून कोरडे करून घ्यायचे आणि नंतर लिंबाचा रस, ग्लिसरीन आणि गुलाब जलाचं मिश्रण पायाला लावावं. हे मिश्रण पायाला लावल्यानंतर मोजे अवश्य घालावे.

coconut oil

खोबरेल तेल

रात्री झोपण्यापूर्वी भेगा पडलेल्या टाचांवर खोबरेल तेल लावावं आणि पायात मोजे घालावे. सकाळी उठून पाय धुवून टाकावेत. असं काही दिवस केल्यानं आपल्या पायांमध्ये खूप बदल जाणवेल. पाय कोमल होतील.

या सर्व उपचारांसोबत फक्त रात्रीच नाही तर हिवाळ्यात दिवसासुद्धा पायात मोजे घालावे. यामुळे आपल्या पायाला धूळ लागत नाही आणि प्रदूषणाचा कुठलाही परिणाम पायावर होत नाही. मोजे नेहमी कॉटनचेच घालावे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी