Home remedies: उन्हाळ्याच्या दिवसांत सर्दी-खोकला, जाणून घ्या घरगुती उपाय

तब्येत पाणी
Updated Apr 29, 2021 | 13:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

उन्हाळ्याच्या दिवसांत सर्दी-खोकला रायनोव्हायरसमुळे होतो. यादरम्यान, औषधे घेण्यापेक्षा घरगुती उपाय केलेले चांगले. या उपायांनी काही तासांत आराम मिळेल.

garlic-ginger
उन्हाळ्याच्या दिवसांत सर्दी-खोकला, जाणून घ्या घरगुती उपाय 

थोडं पण कामाचं

 • तुम्हालाही असा त्रास झाला असेल तर आधी औषधे-गोळ्या घेण्यापेक्षा घरगुती उपाय करा. 
 • उन्हाळ्यात जर तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास झाल्यास लसूण हा चांगला उपाय आहे.
 • दालचिनी सर्दी-खोकल्यावरील रामबाण उपाय आहे.

मुंबई: भर उन्हाळ्यात घाम गळणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र सर्दी-खोकला होणे हे सामान्य नाही. अनेकांना बऱ्याचदा उन्हाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवतो. तुम्हालाही असा त्रास झाला असेल तर आधी औषधे-गोळ्या घेण्यापेक्षा घरगुती उपाय करा. 

लसूण 

उन्हाळ्यात जर तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास झाल्यास लसूण हा चांगला उपाय आहे. लसूण एक प्रकारचे रक्त शुद्ध करण्याचे काम करते. लसूण, लिंबू, मिरची पावडर आणि मध यांच्या मिश्रणात अँटी इन्फ्लामेंट्री तसेच अँटीमायक्रोबियल गुण असतात.  एकीकडे मिरची पावडरचा नाकावर थर्मोजेनिक इफेक्ट होतो तर लिंबामध्ये आढळणारे व्हिटामिन सी प्रतिकारक्षमता वाढवण्याचे काम करतात. 

 1. लसणाच्या पाकळ्या सोलून कुस्करून घ्या.
 2. यात थोडा लिंबाचा रस, एक चिमूट तिखट आणि मध मिसळा.
 3. सर्दी-खोकल्यासाठी या मिश्रणाचे सेवन करा. 

आले

आल्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात जे गरमीच्या दिवसांत होणाऱ्या सर्दीपासून लढण्यासाठी मदत करतात. आल्यासोबत लिंबू आणि मधाचे सेवन केल्यास सर्दी-खोकल्यामध्ये फायदेशीर ठरते. 

 1. आल्याचे हे मिश्रण बनवण्यासाठी आल्याच्या पातळ स्लाईस करून घ्या
 2. या स्लाईस एक कप पाण्यात उकळवा. 
 3. हे पाणी गाळून घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळा. 
 4. स्वाद वाढवण्यासाठी तुम्ही यात मधही मिसळू शकता. 

दालचिनी

दालचिनी सर्दी-खोकल्यावरील रामबाण उपाय आहे. हे व्हायरल त्रास आणि अन्य आजार बरे करण्यास मदत करतात. 

 1. दालचिनी थोड्या पाण्यात उकळा.
 2. हे पाणी गाळून घ्या. त्यात एक चमचे मध मिसळा. 
 3. दालचिनीचा हा चहा दिवसांतून एकदा प्यायल्यास सर्दी काही तासांत दूर होईल. 

कांदा

सर्दी-खोकल्यापासून बचावासाठी कांदा हा चांगला उपाय आहे. यामुळे केवळ शरीरातील विषारीच पदार्थ बाहेर टाकले जात नाहीत श्वासनलिका आणि त्यातील बॅक्टेरियाही नष्ट होतात. 

 1. एका वाटीत कांद्याच्या काही फोडी आणि मध मिक्स करा. 
 2. ही वाटी रात्रभर झाकून ठेवा.
 3. यावरील पाणी सकाळी उठून रिकाम्या पोटी प्या. सर्दी लवकर बरी होण्यासाठी तुम्हाला हे सलग सात दिवस करावे लागेल. 

तुळस

तुळशीमध्ये अँटीमायक्रोबियल गुण असतात. थंडीतच नव्हे तर उन्हाळ्याच्या दिवसातही नाक बंद झाल्यास तुळशीचे सेवन केल्याने फायदा होतो. 

 1. तुळशीची पाने आल्यासोबत वाटून घ्या
 2. हे मिश्रण गरम पाण्यात मिसळा
 3. आले-तुळशीच्या या मिश्रणात मधाचे काही थेंब मिसळा
 4. जास्त सर्दी झाल्यास हे मिश्रण दिवसातून दोनदा घ्या. 

हळद

हळदीमध्ये करक्युमिन नावाचे रसायन असते. ज्यामुळे ते अँटीसेप्टिक म्हणून काम करते.याशिवाय यात इन्फ्लामेंट्री आणि अंटीसेप्टिक गुण असतात. ज्यामुळे सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. 

 1. पाण्यात हळद पावडर टाकून उकळा.
 2. हे पाणी गाळून घ्या. यात लिंबूचा रस आणि मध मिसळा, 
 3. हळदीचे हे मिश्रण दिवसातून दोनदा प्यायल्यास सर्दी-खोकल्यामध्ये आराम मिळतो. 

काळी मिरी

काळी मिरी आणि हळदीचे मिश्रण हे उन्हाळ्यात होणाऱ्या सर्दीसाठी चमत्कारिक उपाय आहे. काळ्या मिरीमध्ये पेपरिन आणि हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुण असतात जे कफ होण्यापासून रोखतात. 

 1. काळी मिरी बारीक वाटून घ्या.
 2. एक ग्लास दुधात ही मिरी टाका. त्यात चिमूटभर हळद टाका. 
 3. दूध गरम करण्यास ठेवा ज्यामुळे काळ्या मिरीचा स्वाद त्यात उतरेल. 
 4. गरम दुधात एक चमचा मध टाका. झोपण्याआधी हे दूध प्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी