Digestive Problem: पोटात गॅसचा त्रास होत असेल तर हे आहेत सोपे उपाय, लगेच मिळेल आराम

Health Tips : अनेकांना पोटात गॅस (Gas) होण्याचा त्रास असतो. जवळपास प्रत्येकच घरात ही समस्या दिसून येते. यामागचे कारण खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि तणाव असू शकतात. जर वारंवार गॅसचा त्रास होत असेल तर या समस्या गंभीर बनू शकतात. काही सोप्या घरगुती उपयांनी गॅसची समस्या दूर होऊ शकते.

Health Tips
हेल्थ टिप्स 
थोडं पण कामाचं
  • चुकीच्या आहारामुळे आणि जीवनशैलीमुळे गॅसचा त्रास
  • पोटातील गॅसची समस्या सर्वत्र आढळते
  • पोटातील गॅसवर सोप्पे घरगुती उपाय

How To Get Relief From Gas: नवी दिल्ली : जीवनशैलीतील (Lifestyle) बदल आणि अयोग्य आहार यामुळे अलीकडच्या काळात पचनाच्या समस्या (Digestion Problem)मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यामुळेच अनेकांना पोटात गॅस (Gas) होण्याचा त्रास असतो. जवळपास प्रत्येकच घरात ही समस्या दिसून येते.यामागचे कारण खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि तणाव असू शकतात. जर वारंवार गॅसचा त्रास होत असेल तर या समस्या गंभीर बनू शकतात. शिवाय अनेकजण पोटात गॅस तयार झाल्यावर औषधांचे सेवन करतात. मात्र त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. तुम्ही नैसर्गिकरित्यादेखील गॅस बाहेर काढू शकता. गॅसच्या समस्येपासून मुक्त होण्याचे उपाय पाहूया. (Home remedies for gas generation in stomach)

अधिक वाचा : बिपाशा बासूचा बेधडक डान्स

पोटातील गॅसच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठीचे उपाय - 

मसाज किंवा मालिश
मालिश करणे आरोग्यासाठी योग्य असते. मालिश केल्याने पोटात जे वायू किंवा गॅस तयार झालेले असतात त्यातून सुटका मिळते. कोणतेही योग्य तेल तळ हातावर घ्या आणि ते पोटावर लावा. त्यानंतर हळूहळू मालिश करा. यामुळे पोटातील स्नायूंना आराम मिळतो. शिवाय पेशींचे रक्ताभिसरण चांगले होते आणि पोटात गॅस तयार होण्यापासून आराम मिळतो. 

अधिक वाचा : ... अब्दू रोजिक-शिव ठाकरेची धमाल कॉमेडी

योगासने
योगासने ही तंदुरुस्त राहण्यासाठी केलीच पाहिजेत. मात्र अनेक रोगांवर योगासनांमुळे सकारात्मक परिणाम होत आरोग्य लाभते. पोटात गॅसची समस्या असल्यास तुम्ही ठराविक योगासने करू शकता. त्यामुळे त्वरित आराम मिळू शकतो. पोटातील गॅस दूर करण्यासाठी तुम्ही पवनमुक्तासन, प्राणायाम सारखी योगासने नियमितपणे करून त्याचा लाभ घेऊ शकता.

सोडा
अनेकदा पोटात गॅस झाल्यावर सोडा प्यायला जातो. सोड्यामुळे पोटातील गॅस दूर होतात. यासाठी एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा सोडा टाकून प्या. सोडाचे प्रमाण जास्त होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते.

अधिक वाचा  : भारतीय हवाई दलात अग्नीवीर वायूची भरती

खास बडीशेप 
जेवण झाल्यावर बडीशेप खाण्याची पद्धत आप्लयाकडे आहे. पोटात गॅस निर्माण झाल्यास तुम्ही एका विशिष्ट जातीची बडीशेप देखील चावू शकता. एका बडीशेपमध्ये असलेले घटक पोटातील गॅस दूर करण्यास मदत करतात. तुम्हाला जर नेहमीच गॅसचा त्रास होत असेल तर जेवणानंतर तुम्हीही विशिष्ट बडीशेप खाऊ शकता.

जीवनशैलीतील बदल, ताणतणाव, जागरण करणे, अयोग्य आहार यासारख्या अनेक कारणांमुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात. यातूनच गॅसची समस्या निर्माण होते.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी