Long Hair Tips:टक्कल पडण्याची वाट बघू नका, केस लवकर वाढवण्यासाठी करा घरगुती उपाय

तब्येत पाणी
Updated Mar 26, 2023 | 15:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tips For Long Hair: पूर्वीच्या काळी लोकांचे पांढरे केस आणि डोक्यावरचे कमी झालेले केस पाहून त्यांचे वय ठरवले जात असे. वाढत्या वयात केस जास्त गळायचे त्यामुळे लोकांचे टक्कल पडायचे. पण आजच्या काळात पांढरे केस आणि कमी केस पाहून एखाद्याचे वय ठरवणे चुकीचे ठरेल.

Home Remedies For Hair Growth
Long Hair Tips:टक्कल पडण्याची वाट बघू नका, केस लवकर वाढवण्यासाठी करा घरगुती उपाय  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जीवनशैलीमुळे लोकांचे केस वेळेआधी पांढरे होत आहेत
  • वेळेआधी टक्कलही पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
  • केसांच्या वाढीवर परिणाम करणारे घटक

Home Remedies for Long Hair: पूर्वीच्या काळी लोकांचे पांढरे केस आणि डोक्यावरचे कमी झालेले केस पाहून त्यांचे वय ठरवले जात असे. वाढत्या वयात केस जास्त गळायचे त्यामुळे लोकांचे टक्कल पडायचे. पण आजच्या काळात पांढरे केस आणि कमी केस पाहून एखाद्याचे वय ठरवणे चुकीचे ठरेल. आजकालच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आणि जीवनशैलीमुळे लोकांचे केस वेळेआधी पांढरे होत आहेत आणि लोकांचे वेळेआधी टक्कलही पडण्याचे प्रमाण वाढले आहे. (Home Remedies For Hair Growth )

अधिक वाचा: टक्कल आणि केस गळण्याची समस्या टाळण्यासाठी पुरुषांसाठी नैसर्गिक तेल

केस गळण्याची अनेक कारणे असू शकतात जसे की तणाव, हार्मोनल असंतुलन, असंतुलित आहार, जास्त रसायनांचा वापर. पण यावर असे अनेक उपाय आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही या समस्येपासून काही प्रमाणात सुटका मिळवू शकता. अनेक घरगुती उपाय केवळ तुमचे केस गळणे थांबवण्यास मदत करत नाहीत तर नवीन केस वाढण्यास देखील मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया ते घरगुती उपाय जे तुमचे केस लांब आणि दाट होण्यास मदत करतील.

अधिक वाचा: Mulethi Benefits: ज्येष्ठमध खाण्याची योग्य पद्धत कोणती? ज्येष्ठमध पावडरचे सेवन केल्यास 'हे '8 आजार होतात बरे

केसांच्या वाढीवर परिणाम करणारे घटक

तुमचे वय, ताणतणाव, आनुवंशिकता, रसायनांचा अतिवापर आणि उष्णता, अ‍ॅलोपेसिया इत्यादींमुळे केसांच्या वाढीवर कधी कधी परिणाम होतो. केसांना सुंदर बनवण्यासाठी हीट स्टाइलिंग, केमिकल्स, हेअर कलर इत्यादींचा अतिरेकी वापर केल्याने केसांची वाढ थांबते. जर पालकांमध्ये टक्कल पडण्याची समस्या असेल तर मोठ्या प्रमाणात ही समस्या मुलांमध्येही दिसून येते. तुमच्या केसांची लांबी आणि प्रकार ठरवण्यात जीन्सची मोठी भूमिका असते. 

अधिक वाचा: Almonds For Diabetes: Blood Sugar कंट्रोल करण्यासाठी जेवणापूर्वी खा 7-8 बदाम

खोबरेल तेल

खोबरेल तेल किंचित कोमट करा आणि नंतर आपल्या टाळू आणि केसांना मसाज करा. केसांना तेल लावा आणि सुमारे 1-2 तास राहू द्या आणि नंतर केस शॅम्पू करा. हे आठवड्यातून 2 वेळा करा.

मेहंदी आणि अंडी लावा

तुम्ही 1 अंडे मेहंदीमध्ये मिसळा आणि आठवड्यातून 1-2 वेळा केसांना लावू शकता. अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते जे केसांच्या वाढीसाठी खूप महत्वाचे असते. दुसरीकडे, केसांना नैसर्गिक रंग देण्यासाठी आणि केसांची वाढ करण्यासाठी मेहंदी खूप फायदेशीर आहे. तुम्ही त्यात लिंबाचा रस देखील घालू शकता, यामुळे केस वाढण्यास मदत होईल.

अधिक वाचा:  Foods to avoid in pregnancy: गरोदरपणात हे पदार्थ खाऊ नका, बाळाला होऊ शकते नुकसान

कोरफड

कोरफड तुमच्या केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कोरफड केसांच्या मुळांना पोषण देते. परिणामी केसांची जलद वाढ होते. यामध्ये अनेक प्रकारचे एन्झाइम असतात, जे टाळूच्या पेशींना पोषण देते. तसेच सूर्याच्या अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून केसांचे संरक्षण होते.
वापरण्याची पद्धत- एक कप कोरफडीचे जेल घ्या. त्यात दोन चमचे शुद्ध मध घालून चांगले मिसळा. ही पेस्ट केसांवर आणि टाळूवर नीट लावा. आता 20-30 मिनिटे असेच राहू द्या. पाण्याने केस पूर्णपणे स्वच्छ करा. तुम्ही ते आठवड्यातून एकदा ते दोनदा लावा.

टिप- या लेखात दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. ही स्वीकारण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांता सल्ला घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी