Winter Hand Care Tips: थंडीत हात फुटायला लागले की करा हे घरगुती उपाय, त्वचा होईल तजेलदार

Skin care tips : तापमान कमी झाल्यामुळे आर्द्रता कमी होऊ लागते. यामुळे त्वचेवर सर्वाधिक परिणाम होतो. हातापायाची त्वचा कोरडी (Dry Skin)पडू लागते. हाताची त्वचा फाटायला लागते. त्वचेचे मॉइश्चरायझर कमी झाल्यामुळे असे होते. हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घेणे आवश्यक असते. यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहेत.

Skin care tips
हाताच्या त्वचेची निगा 
थोडं पण कामाचं
  • हिवाळ्यात त्वचेच्या समस्या उद्भवतात
  • हात फुटायला लागतात
  • हात फुटण्यावर घरगुती उपाय

Dry skin home remedies:नवी दिल्ली : हिवाळा (Winter)आला वातावरणात बदल होऊ लागतात. तापमान कमी झाल्यामुळे आर्द्रता कमी होऊ लागते. यामुळे त्वचेवर सर्वाधिक परिणाम होतो. हातापायाची त्वचा कोरडी (Dry Skin)पडू लागते. हाताची त्वचा फाटायला लागते. त्वचेचे मॉइश्चरायझर कमी झाल्यामुळे असे होते. ही समस्या हाताच्या त्वचेला (Skin problems) जास्त प्रमाणात येते कारण हात पाण्याच्या संपर्कात पुन्हा पुन्हा येतात. म्हणूनच तुलनेने हाताची त्वचा लवकर आणि जास्त फाटते. हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घेणे आवश्यक असते. त्वचा इतकी कोरडी होते की त्यातून अनेक वेळा कवच बाहेर पडू लागते. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. (Home remedies for hand skin care in winter)

अधिक वाचा - कधी आहे आहे दर्श अमावस्या 'या' दिवशी काय केल्याने होईल फायदा

अशा प्रकारे हात फुटणे थांबेल (Home remedies for dry hands)

साबणापासून सावध 
अनेकवेळा वारंवार हात धुवावे लागतात. अशावेळी तुम्ही हात व्यवस्थित धुतले पाहिजेत. अनेकजण हात धुताना साबण नीट धूत नाहीत. परिणामी हाताच्या त्वचेवरील कोरडेपणा वाढतो. साबणामुळे त्वचेवर कोरडेपणा येतो आणि खाजदेखील सुटते.

कोमट पाणी 
अनेकजण थंड पाणी वापरतात किंवा एकदम गरम पाणी वापरतात. मात्र या दोन्हींचा वापर केल्यास त्वचेवर परिणाम होतो. कोरडेपणाची समस्या उद्भवते. हे दोन्ही प्रकारचे पाणी त्वचेचे मॉइश्चरायझर कमी करते. म्हणून नेहमी कोमट पाण्याचा वापर करा आणि हात धुतल्यानंतर नरम टॉवेलने व्यवस्थित पुसून घ्या. 

अधिक वाचा - ट्विटरची पेड ब्ल्यू टिक सर्व्हिस स्थगित

रात्री त्वचेवर मॉइश्चरायझर लावा
रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर चांगले मॉइश्चरायझर लावल्याने  सकाळी तुमचे हात मऊ होतील. थंडीच्या मोसमात हात आणि पायांना तडे जाण्यापासून वाचवण्यासाठी रात्रीची त्वचेची काळजी घेणे खूप फायदेशीर ठरते.

अधिक वाचा - 277 धावा करत या फलंदाजाने क्रिकेट जगतात आणले वादळ, ठोकले 15 सिक्स

लक्षात ठेवायच्या बाबी
थंडीच्या दिवसात हात धुताना अंगठी किंवा इतर कोणतीही वस्तू घालू नका. याशिवाय बाहेर जाताना हातमोज्यांचा वापर करावा. यामुळे त्वचा कोरडी पडण्यापासून आणि त्वचेला तडे जाण्यापासून तुम्ही वाचवू शकाल. 

ऋतु बदलला की त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. आता हिवाळा सुरू झाला आहे. हिवाळ्यात तंदुरुस्त (Health) राहण्यासाठी आणि आजारपणं टाळण्यासाठी आहार-विहाराची काळजी घेणे आवश्यक असते. बाहेरील खाद्यपदार्थ टाळले पाहिजेत. हिवाळ्यात अनेक संसर्ग पसरतात त्यापासून सावध राहिले पाहिजे. थंड पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे. त्वचेची निगा नियमितपणे राखली पाहिजे. विशेष म्हणजे त्वचा कोरडी होण्यापूर्वी किंवा त्वचेची समस्या येण्यापूर्वीच जर काळजी घेतली तर पुढचा त्रास वाचतो आणि आपली त्वचा नेहमी सुंदर दिसते. त्वचेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी