नवी दिल्ली: Home remedies for remove wart: सुंदर (Beautiful) दिसावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. प्रत्येक व्यक्ती सुंदर शरीराचं स्वप्न पाहत असतात. पण एखादा डाग किंवा चामखीळ हे शरीरावरील सौदर्यावर अडथळा निर्माण करतात. डोळ्यांवर किंवा शरीराच्या अन्य भागावर चामखीळ दिसू लागतात. त्यामुळे व्यक्तीच्या चेहऱ्याच्या सौंदर्याला ग्रहण लागल्यासारखं दिसतं. चेहऱ्यावर चामखीळ दिसताच एकप्रकारची चिंता वाढते. आजकाल अनेक प्रकारच्या लेझर थेरपीचा (laser therapy) वापर चामखीळ (warts) काढण्यासाठी केला जातो. मात्र आज आम्ही तुम्हाला यापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय (home remedies) सांगणार आहोत.
लसूण
लसूण हे अनेक रोगांवर उपयुक्त आहे, हे सर्वांना माहीत आहे. लसूण चामखीळ दूर करण्यास देखील मदत करते. चामखीळ काढण्यासाठी लसणाची पेस्ट बनवा आणि चामखीळांवर त्याचा थर लावा. लसूण पेस्ट चामखीळ वर सुमारे 15 मिनिटे सोडा. आठवड्यातून दोनदा असं केल्यानं काही दिवसातच चामखीळ निघून जाऊ शकते.
अधिक वाचा- आज आषाढ दीप अमावस्या; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा, तिथी आणि वेळ
कांद्याचा रस
कांद्याचा रस खूप फायदेशीर मानला जातो. हे केवळ चेहऱ्याचे आणि केसांचे सौंदर्य वाढवण्याचे काम करत नाही तर चामखीळ दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. यासाठी चामखीळ वर कांद्याचा रस लावा आणि अर्धा तास तसाच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने धुवा. कांद्याचा रस रोज चामखीळावर लावल्याने काही दिवसातच हा त्रास दूर होतो.
दूध आणि दही
दूध आणि दही दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. रोज 1 ग्लास दूध प्यायल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात. डोळ्याजवळील चामखीळापासून सुटका मिळवण्यासाठी कापूस दुधात भिजवून त्या भागावर लावा. रात्रभर चामखीळांवर दूध असेच राहू द्या. सकाळी उठल्यावर पाण्याने चेहरा धुवा.
दह्याचा वापर चामखीळापासून मुक्त होण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड आणि ब्लीचिंग घटक असतात. चामखीळापासून सुटका मिळवण्यासाठी लिंबाच्या रसाचे काही थेंब दह्यात मिसळून चामखीळांवर लावा. तुम्हाला 1 ते 2 आठवड्यांत फरक दिसण्यास सुरूवात होईल.
ऍप्पल सायडर व्हिनेगर
ऍप्पल सायडर व्हिनेगरमध्ये मॅलिक आणि टार्टारीक नावाचे ऍसिड आढळतात. हे ऍसिड चामखीळ काढण्यासाठी उपयुक्त ठरतात. चामखीळांपासून मुक्ती मिळण्यासाठी कापसाच्या पॅडमध्ये थोडेसे ऍप्पल सायडर व्हिनेगर लावा आणि चामखीळांवर ठेवा. साधारण 1 ते दीड तास ते चामखीळांवर राहू द्या. चामखीळ काढण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोनदा ऍप्पल सायडर व्हिनेगर वापरू शकता.