Teeth Whitening Tips: आपल्या सगळ्यांनाच मनमोकळेपणाने हसण्याची इच्छा असते, मात्र अनेकदा पिवळ्या दातांमुळे मनमोकळे हसता येत नाही. पिवळ्या दातांमुळे लाजिरवाणे वाटते. दातांची योग्य काळजी न घेतल्याने दात पिवळे पडतात. दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या टूथपेस्टचा वापर करतात, पण तरीही अपेक्षित परिणाम मिळत नाही.
दातांचा पिवळेपणा अगदी सहजपणे दूर करता येतो. जर तुम्ही देखील यामुळे त्रासले असाल तर या घरगुती उपायांचा अवलंब करून, तुम्ही तूमचे दात मोत्यासारखे चमकवू शकता. (Home Remedies for Teeth Whitening know how can you whiten your teeth naturally)
अधिक वाचा : मुंबईच्या पाणी पुरवठ्यात दोन दिवस कपात
स्ट्रॉबेरी खायला खूप चविष्ट लागते, पण तुम्हाला हे माहीत आहे का? की स्ट्रॉबेरी दातांचा पिवळसरपणा दूर करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. हो, हे खरे आहे. स्ट्रॉबेरीचा वापर करून तुम्ही दातांचा पिवळसरपणा दूर करू शकता. दात चमकदार करण्यासाठी स्ट्रॉबेरी कुस्करून दातांवर चोळा. नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
सफरचंदामध्ये ऐसिडिक घटक असतात, जे दात पॉलिश करण्यासाठी उपयुक्त असतात. सफरचंडचे तुकडे दातांवर चोळल्याने दातांचा पिवळसरपणा दूर होतो.
कोळसाने दात घासले तर चांगला परिणाम दिसून येतो. कोळश्याची बारीक पावडर बनवून त्यांची टुथपेस्ट बनवा. परिणाम लवकरच दिसून येईल.
अधिक वाचा : कोरोनाने पुन्हा पकडला वेग
बेकिंग सोड्याचा वापर करून देखील दातांचा पिवळसरपणा दूर करता येतो.
मिठाने ब्रश केल्याने दातांचा पिवळेपणा तर दूर होतोच, पण यासोबत हिरड्यांच्या संसर्गापासूनही आराम मिळतो.
दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठीही तुळस खूप औषधी आहे. त्याची पाने दातांवर चोळल्याने दात चमकू लागतात.
रोज कडुलिंबाने दात घासल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो. याचा वापर केल्याने आठवडाभरात दात चमकू लागतील.