Spectacle Marks : चष्मा वापरल्यामुळे पडणारे डाग सहज जातात, करा हे घरगुती उपाय

सतत चष्मा वापरणाऱ्यांच्या नाकावर त्यामुळे काही डाग पडतात. मात्र काही सोपे आणि घरगुती उपाय करून हे डाग घालवता येतात.

Spectacle Marks
चष्मा वापरल्यामुळे पडणारे डाग सहज जातात  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • चष्मा वापरल्यामुळे पडतात नाकांवर डाग
  • सोप्या उपायांनी निघून जातात डाग
  • मध, दूध आणि बदामाचा होतो फायदा

Spectacle Marks : डोळ्यांची दृष्टी (Eye vision) कमी झाली की डॉक्टर चष्मा (Spectacle) वापरण्याचा सल्ला देतात. हल्ली अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकजण चष्मा वापरतात. डोळ्यांना जर नंबर असेल तर चष्मा वापरणं गरजेचं असल्याचं नेहमीच नेत्रतज्ज्ञ सांगत असतात. पेपर वाचताना, पुस्तक वाचताना, टीव्ही पाहताना किंवा रोजचं काम करताना चष्मा वापरल्यामुळे डोळ्यांवर येणारा ताण कमी होतो आणि होणारं संभाव्य नुकसान टळण्याची शक्यता आहे. अनेकांना चष्मा असूनही तो न वापरल्यामुळे डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्याशिवाय डोळ्यांवर अतिरिक्त ताण आल्याचे इतरही अनेक साईड इफेक्ट्स (Side Effects) जाणवू शकतात. मात्र चष्मा वापरणाऱ्या सर्वांना एक समस्या भेडसावत असते. ही समस्या म्हणजे चष्म्यामुळे नाकाच्या वरच्या भागात पडणारे डाग. जिथे हा चष्मा टेकतो, त्या भागात चष्मा वापरल्याचे काही डाग (Spots on nose skin) पडतात आणि त्यामुळे व्यक्तीच्या सौंदर्यावर त्याचा दुष्परिणाम होतो. हे काळे डाग कसे घालवायचे, याचं उत्तर अनेकांना माहित नसतं. जाणून घेऊया असे डाग घालवण्याचे काही साधेसोपे आणि घरगुती उपाय.

बटाटा

बटाट्याच्या रसामुळे डेड स्कीन निघून जाते आणि त्या ठिकाणी नवी आणि तुकतुकीत त्वचा तयार व्हायला मदत होते. बटाट्यात असणाऱ्या अँझाईम्समुळे त्वचा हायड्रेट होते आणि त्यामुळे त्वचेची चमकही वाढते. त्यामुळे ज्या ठिकाणी चष्म्याचे डाग उठले आहेत, तिथे रोज एका बटाट्याचा रस काढून लावण्याचा सल्ला दिला जातो. 

गुलाबपाणी

त्वचा चमकदार बनवण्यासाठी गुलाबपाण्याचा उपयोग केला जातो. त्वचेच्या संगोपनातील हा एक महत्त्वाचा घटक असून चष्म्यामुळे पडलेले डाग काढून टाकण्यासाठीही त्याचा उपयोग होत असतो. दररोज रात्री कापसाच्या साहाय्याने गुलाबपाणी डोळ्यांखाली पडलेल्या डागांवर लावावे. नाक आणि डोळ्यांखाली हे पाणी लावून सकाळी त्वचा स्वच्छ धुवावी. काही दिवसांतच नाकावर पडलेले डाग निघून जातात. 

अधिक वाचा - International Beer Day 2022 : बिअर पिण्याचे फायदे आणि तोटे, वाचून व्हाल चकित

मध

त्वचेच्या आरोग्यासाठी शेकडो वर्षांपासून मधाचा वापर केला जातो. मध आरोग्यपूर्ण टिश्यूच्या निर्मितीसाठी फायद्याचा ठरतो आणि त्वचेला मॉयश्चराईजही करतो. मधात थोडसं दूध मिसळून ते डाग पडलेल्या ठिकाणी लावावं. कापसाच्या साहाय्यानं डागांवर हे मिश्रण लावून 20 मिनिटं ठेवावं. त्यानंतर चेहरा धुऊन टाकावा. 

अधिक वाचा - Neck Fat Exercise: मानेवरची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर व्यायाम, बसल्या बसल्या होईल टोनिंग

बदाम तेलानं मसाज

बदामाच्या तेलानं त्वचेवर मसाज केल्यामुळे तिथले डाग निघून जातात. स्क्लेरोटेन्स या बदामात असणाऱ्या घटकामुळे पिगमेंटेशन कमी करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. नाकावर बदामाचं तेल लावून तिथे मसाज करावा. रात्रभर ते तेल तसंच राहू द्यावं. सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा. 

डिस्क्लेमर - त्वचेवरचे डाग घालवण्याबतच्या या साध्या आणि घरगुती टिप्स आहेत. तुम्हाला याबाबतीत काही गंभीर समस्या असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी