Home remedy tips : पिवळे दात पांढरे करायचे असतील तर करा हे घरगुती उपाय

प्रत्येक व्यक्तीला आपले दात (teeth) पांढरेशुभ्र असावे असे वाटते.  कारण पांढरे शुभ्र दात आपल्या व्यक्तिमत्वात (personality) भर घालत असतात. परंतु दातांवर पिवळेपणा असेल तर चारचौघांत वावरतानादेखील कमीपणा वाटू शकतो.  दातांचा पिवळेपणा घालवून ते स्वच्छ करण्यासाठी बहुतांश वेळा डेंटिस्टकडे जाऊन भरमसाठ पैसा खर्च केला जातो.

If you want to whiten yellow teeth, try these home remedies
पांढरे आणि चमकदार दातांसाठी करा हे उपाय   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • बेकिंग सोडा दात सुरक्षितपणे पांढरे करतो.
  • संत्र्याची साल दातांवरचे प्लेक,आणि टार्टर साफ करण्यात फार गुणकारी आहे.
  • पिवळ्या दातांपासून तुम्हाला सुटका हवी तर तुम्ही स्ट्रॉबेरी वापरू शकतात.

Oral health : प्रत्येक व्यक्तीला आपले दात (teeth) पांढरेशुभ्र असावे असे वाटते.  कारण पांढरे शुभ्र दात आपल्या व्यक्तिमत्वात (personality) भर घालत असतात. परंतु दातांवर पिवळेपणा असेल तर चारचौघांत वावरतानादेखील कमीपणा वाटू शकतो.  दातांचा पिवळेपणा घालवून ते स्वच्छ करण्यासाठी बहुतांश वेळा डेंटिस्टकडे जाऊन भरमसाठ पैसा खर्च केला जातो. परंतु काही घरगुती उपायांद्वारे ही समस्या दूर केली जाऊ शकते.  (If you want to whiten yellow teeth, try these home remedies)

अधिक वाचा  : तुमच्या या चुका खराब करतील ​लिव्ह-इन-रिलेशनशिप​

दातांना पिवळेपणा येण्यामागचे काय कारण आहेत?

  • बरोबर ब्रश न करणे
  • अधिक गोड़ खाणं खाणे
  • धूम्रपान, तंबाखू, इत्यादी चे सेवन करणे
  • खाऊन झाल्यावर तोंड बरोबर न धुणे
  • दातांच्या स्वच्छतेची चांगली काळजी न घेणे
  • डेंटिस्टकडे दात नियमित तपासून न घेणे

अधिक वाचा  : उन्हाळ्यात पुण्यात फिरता येणारी ठिकाणं

आज आम्ही तुम्हाला दातांचा पिवळेपणा कसा दूर करता येईल किंवा त्याचे घरगुती उपाय काय याची माहिती देणार आहोत.  या उपयाने दातांवरील पिवळेपणा दूर झाला तर तुम्ही आत्मविश्वासाने आणि मोठ्याने हसू शकाल.

बेकिंग सोडा 

अमेरिकन डेंटल असोसिएशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे समोर आले आहे की बेकिंग सोडा दात सुरक्षितपणे पांढरे करतो. इतकेच नाही तर बॅक्टेरियाशी लढण्यासाठी आणि दातांचे पिवळे पडणे कमी करण्यातही हे गुणकारी आहे. जर तुम्हाला दातांचा पिवळेपणा दूर करायचा आहे तर, एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात दोन चमचे हायड्रोजन पेरॉक्साइड मिसळा. ही पेस्ट दातांवर काही वेळ लावून ठेवा आणि नंतर धुवा. बेकिंग सोडा दातांचा पिवळेपणा दूर करेल.   

अधिक वाचा  : पोरं झाल्यानंतर नवरा-बायकोचं नातं कसं घट्ट बनवणार

सफरचंद व्हिनेगर

सिचुआन युनिव्हर्सिटीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की सफरचंद सायडर व्हिनेगरचा दातांवर ब्लीचिंगचा प्रभाव पडतो. सफरचंद सायडर व्हिनेगर वापरण्यासाठी, सुमारे 200 मिली पाण्यात २ चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळून माउथवॉश बनवा. हे माऊथवॉश 30 सेकंद तोंडात ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवा.  परंतु जास्त वेळ व्हिनेगार तोंडात ठेवू नका. 

स्ट्रॉबेरी ठरेल फायद्याची 

पिवळ्या दातांपासून तुम्हाला सुटका हवी तर तुम्ही स्ट्रॉबेरी वापरू शकतात. यासाठी तुम्ही स्ट्रॉबेरी आणि मीठ एकत्र मिसळा. या पेस्टने तुम्ही ब्रश करा त्यानंतर दात पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर दात स्वच्छ होतील. 

अधिक वाचा  : 2023 मधील नववधूंसाठी दागिन्यांचे ट्रेंड

संत्र्याच्या सालांनी दात घासावे

संत्र्याची साल दातांवरचे प्लेक,आणि टार्टर साफ करण्यात फार गुणकारी आहे. संत्र्याची साल दातावर घासल्याने दातांवरचे प्लेक आणि टार्टर चांगले साफ होतात,जे तुमचे दात पांढरे करण्यास उपयुक्त ठरते. तोंडाची दुर्गंधी दूर करायची असेल तर अद्रक आणि मीठाला गरम पाण्यात मिसळा. त्या पाण्याने चूळ भरा. यामुळे तोंडांची दुर्गंधी दूर होईल आणि दातांचा पिवळेपणा कमी होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी