Skin Dryness: रुक्ष त्वचेवर करा घरगुती उपाय, असं बनवा मॉइश्चुरायझर

बाजारात मिळणारी क्रीम चेहऱ्याला लावल्यानंतर तात्पुरता दिलासा मिळतो. मात्र काही वेळाने चेहरा धुतल्यानंतर त्वचा पुन्हा पूर्वीसारखीच ड्राय होते. यावर उपाय म्हणजे घरगुती मॉइश्युरायझर्स तयार करणे आणि ते वापरणे.

Skin Dryness
रुक्ष त्वचेवर करा घरगुती उपाय  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हिवाळ्यात त्वचा पडते कोरडी
  • घरच्या घरी तयार करता येतात वेगवेगळी मॉइश्चुरायझर्स
  • सोप्या उपायांनी ठेवा त्वचा तुकतुकीत आणि टवटवीत

Skin Dryness: देशभर आता पावसाळा संपून थंडीला (Winter) सुरुवात झाली आहे. कुठे हलकी थंडी तर कुठे कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली आहे. या काळात त्वचा ड्राय होणे आणि त्वचेशी संबंधित अनेक विकार (Skin Problems) सुरू होणे, हा अनुभव बहुतांशजणांना येत असतो. त्यासाठी बाजारात वेगवेगळी मॉइश्चुरायझर्स (Moisturizers) आणि क्रीमही (Cream) मिळतात. हे क्रीम चेहऱ्याला लावल्यानंतर तात्पुरता दिलासा मिळतो. मात्र काही वेळाने चेहरा धुतल्यानंतर त्वचा पुन्हा पूर्वीसारखीच ड्राय होते. यावर उपाय म्हणजे घरगुती मॉइश्युरायझर्स तयार करणे आणि ते वापरणे. आपल्या घरी असणाऱ्या काही पदार्थांचा वापर करून उत्तम प्रतीचे मॉइश्चुरायझर्स बनवता येऊ शकतात. जाणून घेऊया, मॉइश्चुरायझर्स बनवण्याच्या अशाच काही सोप्या पद्धती.

कोरफड आणि बदामाच्या तेलाचं मॉइश्चुरायझर

हे मॉइश्चुरायझर तयार करण्यासाठी तुम्हाला ॲलोविरा जेल, इसेन्शिअल ऑईल आणि बदामाच्या तेलाची गरज लागेल. हे तयार करण्यासाठी तुम्ही एका भांड्यात ॲलोविरा जेल घ्या. त्यात इसेन्शिअल ऑईल आणि बदामाचं तेल मिक्स करा. हे मिश्रण एकजीव करून घ्या.हे मिश्रण ब्लेंड करताना एक क्रिमी टेक्सचर तयार होईल. दररोज अंघोळीपूर्वी हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. तुम्हाला शक्य असेल, तर अंघोळ झाल्यावरही हे क्रीम तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. हवाबंद डब्यात 8 दिवसांपर्यंत हे क्रीम व्यवस्थित टिकू शकतं. 

अधिक वाचा - Sitting Job Side Effects: तुमचे काम बैठे आहे का? ऑफिस किंवा घरी तासनतास बसून काम केल्यास लागतील हे आजार...

हनी ग्लिसरीन मॉइश्चुरायझर

हे मॉइश्चुरायझर तयार करण्यासाठी मध, ग्रीन टी, ग्लिसरीन, लिंबाचा रस यांचा वापर करा. सर्वप्रथम एका बाऊलमध्ये मध, ग्लिसरीन, ग्रीन टी आणि लिंबाचा रस घ्या. या सर्व गोष्टी एकमकेांत नीट मिक्स करा. हे मिश्रण 20 ते 30 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर धुवून टाका. रात्रीच्या वेळी हे मिश्रण चेहऱ्यावर लावून तुम्ही झोपू शकता आणि सकाळी उठल्यावर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवू शकता. 

साय आणि केळी

हे मॉइश्चुरायझर तयार करण्यासाठी तुम्हाला दुधाची साय आणि केळ यांची गरज पडेल. हे मॉइश्चुरायझर तयार करण्यासाठी एका भांड्यात थोडंसं केळ घ्या आणि ते कुस्करा. त्यावर साय ओता आणि एकजीव करा. त्यातून एक पेस्ट तयार होईल. ही पेस्ट तुम्ही 20 ते 25 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवू शकता. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्या. 

अधिक वाचा - जगातील 10 पैकी एकाला होता वर्टिगो आजार, काय आहे हा आजार जाणून घ्या याचे परिणाम

लाईफस्टाईलमध्ये सुधारण

आपल्या लाईफस्टाईलचाही आपल्या त्वचेवर परिणाम होत असतो. त्वचेचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी ताजं आणि सकस अन्न खाणे, भरपूर पाणी पिणे, पुरेसा आणि नियमित व्यायाम करणे आणि रात्री किमान 7 ते 9 तासांची सलग झोप घेणे आवश्यक असते. 

डिस्क्लेमर - हिवाळ्यात त्वचा मॉइश्चुराइज करण्यासाठीच्या या काही टिप्स असून त्या सामान्यज्ञानावर आधारित आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर प्रश्न किंवा समस्या असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी