Homemade Remedies for Stomach Gas : पोटात सारखा गॅस होत असेल तर घरातच तयार करा ही पावडर, फक्त अर्धा चमचा खाल्ल्याने होईल समस्या दूर

तब्येत पाणी
Updated Apr 12, 2023 | 22:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

Homemade Powder For Gas : जेव्हा गॅस तयार होतो, तेव्हा उठणे असो वा बसणे असो सारे काही कठीण होऊन जाते. अशावेळी ही घरगुती पावडर या समस्येपासून त्वरित आराम मिळवून देईल. ही पावडर घरी कशी तयार करायची ते जाणून घ्या.

पोटातील गॅससाठी घरगुती पावडरची रेसिपी
Homemade Remedies for Stomach Gas   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जास्त जेवल्यामुळे किंवा तेलकट आणि मसालेदार अन्न खाल्ल्यामुळे पोटात गॅस तयार होतो
  • पोटातील गॅससाठी घरगुती पावडरची रेसिपी नक्की करून पहा
  • ही पावडर बनवायला अतिशय सोपी आहे

Stomach Gas : जास्त जेवल्यामुळे किंवा तेलकट आणि मसालेदार अन्न खाल्ल्यामुळे पोटात गॅस तयार होतो. पोटात गॅस तयार झाला की पोट फुगलेले दिसू लागते आणि आंबट ढेकर येणे, मळमळणे, पोटातून दुर्गंधीयुक्त हवा येणे यासारख्या समस्या उद्भवतात. मात्र, अनेकदा पोटाचा गॅस हा पोटदुखीचे कारण देखील बनतो. पोटात गॅस झाल्याने काय खावे आणि काय नाही हेच समजत नाही. येथे तुम्हाला आम्ही एका पावडरविषयी सांगणार आहोत.  जी पोटातील गॅस लवकर दूर करण्यासाठी सहाय्य करू शकेल. ही पावडर बनवायला अतिशय सोपी आहे. (Homemade Powder for Stomach Gas, how to make article)  

अधिक वाचा : ​अंडी खाल्ल्याने खरंच कॅन्सरचा धोका वाढतो? जाणून घ्या सत्य...

पोटातील गॅससाठी घरगुती पावडरची रेसिपी

पोटातील गॅस बाहेर काढण्यासाठी ही पावडर अतिशय गुणकारी आहे. घरी ही पावडर सहजरित्या तयार करता येते. यासाठी तुम्हाला दोन चमचे ओवा, पाऊण चमचा हिंग आणि एक चमचा काळे मीठ घ्यावे लागेल. पावडर तयार करण्यासाठी सर्वप्रथम गॅस पेटवा, त्यावर तवा ठेवून त्यात ओवा चांगल्याप्रकारे भाजून घ्या. त्यानंतर ओवा थंड होण्यासाठी ठेवा. 

पुढे हिंग आणि काळे मीठ एकत्र करून ओवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. ही पावडर एक भरणीमध्ये काढून घ्या. जेव्हाही पोटात गॅस तयार होईल तेव्हा ही पावडर अर्धा चमचा पाण्यासोबत घ्या.

अधिक वाचा : ​कालाष्टमीला काळभैरवाला प्रसन्न करण्यासाठी म्हणा ही आरती

एंटीमाइक्रोबियल आणि एंटीसेप्टिक गुणधर्मांनी समृद्ध, अशी ही पावडर पोटातील गॅस झटक्यात दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. 

पोटातील गॅसपासून बचाव करण्यासाठी तुम्ही जिरे पावडर देखील घेऊ शकता. यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही, जेव्हाही पोटात गॅस बनू लागतो तेव्हा अर्धा चमचा जिरे पावडर पाण्यासोबत खा. जिरे चांगले भाजून ते दळून घ्या, म्हणजे त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, सी आणि ई तसेच अमीनो अॅसिड आणि मिनरल्स असतात, जे पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी प्रभावी कार्य करतात.

*टीप- (सदर माहिती तुमच्या सामान्य ज्ञानासाठी देण्यात आली आहे. वरील कोणत्याही प्रकारचा उपचारात अवलंब करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला विचारात घ्या. )

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी