White hair remedy: पांढरे केस आणि दाढी पुन्हा होईल काळी, वापरून पाहा हे जादुई उपाय

अनेकांचे केस अकाली पांढरे व्हायला सुरुवात होते. ते काळे करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मात्र त्यातील बऱ्याच उपायांमध्ये केमिकलचा वापर करण्यात आलेला असतो. त्यामुळे केस पांढरे होण्याची प्रक्रिया अधिकच वेगाने सुरु होते. हे टाळण्यासाठी काही घरगुती उपायांची मदत घेता येऊ शकते.

White hair remedy
पांढरे केस आणि दाढी पुन्हा होईल काळी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कमी वयात अनेकांचे केस होऊ लागतात पांढरे
  • सोप्या उपायांनी केस आणि दाढी होऊ शकते काळी
  • तुरटी, कांदा आणि कडिपत्त्याचा योग्य वापर करून घडू शकते कमाल

White hair remedy: गेल्या काही वर्षांमध्ये कमी वयात केस पांढरे  (White Hairs) होण्याचे प्रकार वाढले आहेत. चुकीची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, अपुरी झोप, वाढते ताणतणाव आणि त्यातून निर्माण होणारी व्यसनाधीनता अशा अनेक कारणांमुळे अनेकांचे केस अकाली पांढरे व्हायला सुरुवात होते. ते काळे करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मात्र त्यातील बऱ्याच उपायांमध्ये केमिकलचा (Chemicals) वापर करण्यात आलेला असतो. त्यामुळे केस पांढरे होण्याची प्रक्रिया अधिकच वेगाने सुरु होते. हे टाळण्यासाठी काही घरगुती उपायांची मदत घेता येऊ शकते. काही उपायांनी पांढरे झालेले केस आणि दाढी पुन्हा काळी करता येणं शक्य असल्याचं दिसून आलं आहे. जाणून घेऊया, असेच काही उपाय. 

कांद्याचा रस

केसांच्या नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी कांद्याच्या रसाचा उपयोग करता येऊ शकतो. त्यासाठी दोन चमचे कांद्याचा रस घ्या. त्यात थोडा पुदिना, तुरीच्या डाळीचं पीठ आणि बटाटा घाला. हे मिश्रण दाढीवर आणि केसांवर लावा. काही दिवसांतच तुमची दाढी पुन्हा काळी व्हायला सुरुवात होऊ शकते. 

गायीचं लोणी

गायीच्या दुधापासून तयार कऱण्यात आलेलं लोणी हा केस काळे करण्यासाठीचा उत्तम उपाय मानला जातो. गायीच्या दुधापासून बनवलेलं लोणी रोज दाढीवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. मसाज करताना तो हलक्या हाताने करणं आवश्यक आहे. कुठलाही मसाज हा हलक्या हाताने केला, तरच त्याचा योग्य तो परिणाम साधता येतो. 

अधिक वाचा - Green Light Therapy: रामबाण आहे ग्रीन लाईट थेरपी, जुन्यात जुनं दुखणंही होतं बरं

तुरटीचा करा वापर

दाढी काळी करण्यासाठी तुरटीचाही उत्तम उपयोग होऊ शकतो. तुरटीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. आयुर्वेदातही तुरटीचं महत्त्व अनन्यासाधारण असल्याचं सांगण्यात आलं असून अनेक औषधांमध्येही तुरटीचा वापर कऱण्यात येतो. तुरटी घेऊन त्याचे चूर्ण बनवा. त्यात गुलाबजल मिक्स करा आणि हे मिश्रण दाढीवर लावा. त्यामुळे दाढी पांढरी होण्याची प्रकिया थांबेल आणि ती काळी व्हायला सुरुवात होईल. 

अधिक वाचा - Hot Water Bath Effects: सावधान! थंडीमध्ये गरम पाण्याने आंघोळीचे क्षणिक सुख, तुमच्या शरीराचे करते इतके मोठे नुकसान...

कडिपत्ता

कडीपत्ता केस काळे आणि सुंदर ठेवण्यासाठी उपयोग असतो. त्यासाठी नारळाच्या तेलात कडीपत्ता घालून उकळून घ्या. या तेलाने केस आणि दाढीला मसाज करा. तुम्हाला आवडत असेल, तर 100 मिली पाण्यात कडिपत्ता घाला आणि पाणी अर्धं होईपर्यंत उकळा. त्यानंतर हे पाणी कोमट करुन पिऊन टाका. यामुळेदेखील तुमचे केस काळे होण्यासाठी फायदा होईल. कडिपत्त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे स्वयंपाकातील अनेक पदार्थांमध्ये याचा वापर करण्यात येतो. कडिपत्ता हा केसांसाठी वरदायक असतो. 

डिस्क्लेमर - पांढरे होऊ लागलेले केस काळे करण्यासाठीचे सामान्यज्ञानावर आधारित हे काही साधे उपाय आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर प्रश्न अथवा समस्या असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी