कॉफी आणि मधाने घटवा आपले वजन, पाहा या टिप्स

तब्येत पाणी
Updated Jan 26, 2021 | 13:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

वजन कमी करण्यासाठी लोक हरतऱ्हेचे प्रयत्न करत असतात. अनेकजणांना सध्या वजन वाढण्याच्या समस्येने ग्रासले आहे. अशातच दररोज कॉफी आणि मधाच्या सेवनाने तुम्ही वजन कमी करू शकता. 

coffee and honey
कॉफी आणि मधाने घटवा आपले वजन, पाहा या टिप्स 

थोडं पण कामाचं

  • वेगाने वजन कमी कराये असल्यास करा मध आणि कॉफीचे सेवन
  • मधामध्ये अँटीऑक्सिडंट आणि कॅफेन असते.
  • लठ्ठपणा कमी करण्यासाठी मध आणि कॉफी फायदेशीर

मुंबई: सध्या वजन वाढण्याच्या(weight gain) समस्येने प्रत्येकाला ग्रासले आहे. वजन कमी करण्यासाठी एक्सरसाईजपासून(exercise) ते विविध उपाय केले जातात. वजन वाढल्यास(weight gain) अनेक आजारांना आमंत्रण मिळते. अशातच गरजेचे आहे की योग्य वेळेतच वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवले पाहिजे. वजन घटवण्यासाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये मध आणि कॉफीचे सेवन करू शकता. वेगाने वजन कमी करण्यासाठी कॉफी आणि मध फायदेशीर ठरू शकते. 

लोक अनेकदा वजन कमी करण्यासाठी घरगुती उपचार करतात.यासाठी औषधापासून ते विविध एक्सरसाईज ट्राय करतात. मात्र अनेकदा या हेल्दी रूटीनमुळे तुम्ही चरबी घटवू शकत नाही. अशातच तुमच्याकडे केवळ एकच उपाय उरतो तो म्हणजे घरगुती उपचार. वजन कमी करण्यासाठी असे घरगुती उपचार तुम्हाला सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही वेगाने वजन कमी करू शकता. मध आणि कॉफीच्या सेवनानेतुम्ही शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी करू शकता. 

वजन कमी करण्यासाठी मध आणि कॉफी फायदेशीर

  1. कॉफीला एनर्जी ड्रिंक म्हणून वापरले जाते. कॉफीमध्ये कॅफेन असते ज्यामुळे डोपामाईन नावाचे न्युरोट्रान्समीटर रिलीज होते. हेच कारण आहे दररोज कॉफी प्यायल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटते. 
  2. कॉफीमध्ये आढळणारे कॅफी एक फॅट बर्निंग सप्लिमेंट आहे जे वेट लॉस करण्यास खूप मदत करतात. रिसर्चनुसार कॉफी दोन पद्धतीने वजन कमी करतात. पहिली पद्धत म्हणजे फॅट वितळवून आणि दुसरी पद्धत म्हणजे मेटाबॉलिज्म वाढवून. 
  3. कॉफी आणि मध या दोन्हीमध्ये वजन कमी करण्याची क्षमता आहे. हे दोन्ही मिसळल्यास वेगाने वजन कमी होण्यास मदत होते.यासाठी तुम्ही हवे असल्यास कॉफीमध्ये मध टाकून पिऊ शकता. ज्यामुळे वेट लॉस होण्यास मदत होईल आणि याचा परिणामही शरीरावर दिसतो. 
  4. मधामध्ये अनेक औषधी गुण असतात जे आपल्याला विविध आजाराना दूर ठेवण्यास मदत ठेवतात. याशिवाय यात अनेक प्रकारचे व्हिटामिन्स असतात जसे मिनरल्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स. यातच मधाचे सेवन दररोज केल्यास कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. याशिवाय शरीरातून सोप्या पद्धतीने फॅट बाहेर निघण्यास मदत होते. 
  5. मधामध्ये अँटीऑक्सिडंट्सारखी तत्वे असतात आणि कॉफीमध्ये कॅफेन आढळते. दोन्हीही शरीराचे मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करतात. दोघांच्या सेवनाने तुम्ही सोप्या पद्धतीने वजन कमी होण्यास मदत होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी