सावधान..! तुम्हीही भेसळयुक्त मध खात नाही ना?, 'या' 4 सोप्या पद्धतीनं तपासा घरबसल्या

तुम्ही निरोगी आरोग्यासाठी मधाला तुमच्या दैनंदिन आहाराचा एक भाग बनवण्याचा विचार करत असाल तर हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की, त्या मधाची शुद्धता कशी तपासायची. कारण ते तपासणं चांगले असेल.

Honey
मध शुद्ध आहे की भेसळयुक्त? 
थोडं पण कामाचं
  • आपल्यापैकी बरेच जण सारखेला निरोगी पर्याय म्हणून मधाचा वापर करत असतात.
  • मधात आरोग्यासाठी हवे असलेलं पोषक, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. मधात फ्रक्टोज हे प्रामुख्यानं आढळतं.
  • याव्यतिरिक्त मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि जंतुनाशक गुणधर्म असतात.

नवी दिल्ली:  How To Check Purity of Honey: आपल्यापैकी बरेच जण सारखेला निरोगी पर्याय म्हणून मधाचा वापर करत असतात. मध आरोग्यासाठी चांगलं असतं मध हे चरबी मुक्त, कोलेस्ट्रॉल आणि सोडिअम युक्त आहे. मधात आरोग्यदायी गुणधर्म असल्यामुळे याला निसर्गातील गोड अमृत असं म्हटलं जातं. गोड, घट्ट चिकट असलेला हा पदार्थ खरंच आपल्यासाठी अमृतापेक्षा कमी नाही आहे. जर तुम्ही निरोगी आरोग्यासाठी मधाला तुमच्या दैनंदिन आहाराचा एक भाग बनवण्याचा विचार करत असाल तर हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की, त्या मधाची शुद्धता कशी तपासायची. कारण ते तपासणं चांगले असेल. 

का म्हणतात मधाला अमृत? 

मधात आरोग्यासाठी हवे असलेलं पोषक, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. मधात फ्रक्टोज हे प्रामुख्यानं आढळतं. याशिवाय कार्बोहायड्रेट्स, रिबोफ्लेविन, नायसिन, व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन सी आणि अमिनो अॅसिडही मधात असतं. एक चमचे (21 ग्रॅम) मधामध्ये सुमारे 64 कॅलरीज आणि 17 ग्रॅम साखर (फ्रुक्टोज, ग्लुकोज, सुक्रोज आणि माल्टोज) असते. मधामध्ये फॅट, फायबर आणि प्रोटीन अजिबात नसते.

अधिक वाचा- डोंबिवलीत लिफ्टच्या खड्ड्यात पडून सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

औषधापेक्षा कमी नाही मध 

बऱ्याच रोगांवर उपचार करण्यासाठी मधाचा वापर केला जातो. मध हे दैनंदिन आरोग्यासाठी खूप उपयुक्त मानलं जातं. याच कारणामुळे मध हे प्राचीनकाळापासून औषध म्हणून मानलं जातं. मधाचा उपयोग त्वचा सुधारण्यासाठी, पचनक्रिया योग्य ठेवण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी ही केला जातो.

याव्यतिरिक्त मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि जंतुनाशक गुणधर्म असतात, ज्यामुळे मध जखमा भरून काढण्यासाठी किंवा दुखापतीपासून लवकर आराम मिळवून देण्यासाठी खूप प्रभावी ठरतं. मात्र मधाचे खरे फायदे मिळविण्यासाठी शुद्ध किंवा भेसळयुक्त मधामध्ये फरक कसा ओळखायचा हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. 

अधिक वाचा- Lalu Yadav Health : लालू यादव यांच्या तब्येतीला आराम पडावा म्हणून पीएम मोदींनी व्यक्त केल्या सदिच्छा

मधात भेसळ

ग्लुकोज सोल्यूशन्स, उच्च फ्रक्टोज कॉर्न सिरप आणि बरंच असं काही मधामध्ये अनेकदा मिसळण्यात येतं. ज्याबद्दल ग्राहकांना काहीच माहित नसते.  जर तुम्हाला चांगल्या खऱ्या मधाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर ते खूप सोपं आहे आणि तुम्ही ही तपासणी घरी देखील करू शकता. चला जाणून घेऊया कसे?

मधाची शुद्धता तपासण्याचे हे आहेत 4 सोपे मार्ग

1 थम्ब टेस्ट

तुमच्या अंगठ्यावर थोडासा मध टाका, ते इतर द्रवांप्रमाणे पसरत आहे का ते तपासा? तसं झाल्यास ते शुद्ध मध नाही. खऱ्या मधानं जाड तार तयार होईल. मध जाड असावा आणि पातळ असू नये.

2 वॉटर टेस्ट

एक ग्लास पाण्यात एक चमचा मध घाला. जर तुमचं मध पाण्यात विरघळत असेल तर ते बनावट मध आहे. शुद्ध मधामध्ये जाड पोत असते, जे कप किंवा काचेच्या तळाशी स्थिर होते.

3 व्हिनेगर टेस्ट 

व्हिनेगरच्या पाण्यात मधाचे काही थेंब टाका. जर मिश्रणाला फेस येऊ लागला तर तुमचं मध बनावट आहे.

4 हीट टेस्ट 

मध जळत नाही, म्हणजेच त्याला आग लागत नाही. उष्णतेची चाचणी घेण्यासाठी माचिसची काडी जाळून मधात बुडवा. जर ते जळत असेल तर तुमच्या मधात भेसळ आहे.

लक्षात ठेवा की शुद्ध मधाला एक वैशिष्ट्यपूर्ण गोड सुगंध असतो आणि जेव्हा तुम्ही कच्चा मध खाता तेव्हा तुम्हाला तुमच्या घशात संवेदना जाणवू शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी