Hot Water Bath Effects: सावधान! थंडीमध्ये गरम पाण्याने आंघोळीचे क्षणिक सुख, तुमच्या शरीराचे करते इतके मोठे नुकसान...

Health Tips : थंडीच्या दिवसातील सर्वात परीक्षा पाहणारी वेळ म्हणजे सकाळी उठून तयारी करून ऑफिसला जाणे. थंडीमुळे बहुतांश लोक आंघोळीसाठी गरम पाण्याचा (Hot water bath)वापर करतात. यामुळे आपल्याला थोडा आराम नक्कीच मिळतो. मात्र गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे तुम्हाला इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. याचा तुमच्या शरीरावर अनेक पातळ्यांवर विपरित परिणाम होत असतो.

Hot water bath
थंडीतील गरम पाण्याची आंघोळ 
थोडं पण कामाचं
  • हिवाळा सुरू होताच गरम पाण्याने आंघोळ सुरू होते
  • गरम पाण्याच्या आंघोळीमुळे शरीराचे मोठे नुकसान
  • पाहा कोणकोणत्या समस्या उद्भवतात

Negative effects of hot water bath : नवी दिल्ली : हिवाळ्यात (Winter)जसजशी थंडी वाढू लागते तसतसे आपल्या दिनचर्येत बदल होऊ लागतात. आपल्या दिनचर्येच्या, खाण्यापिण्याच्या, उठण्या, झोपण्याच्या केंद्रस्थानी थंडी येऊ लागते. थंडीच्या दिवसातील सर्वात परीक्षा पाहणारी वेळ म्हणजे सकाळी उठून तयारी करून ऑफिसला जाणे. थंडीमुळे बहुतांश लोक आंघोळीसाठी गरम पाण्याचा (Hot water bath)वापर करतात. यामुळे आपल्याला थोडा आराम नक्कीच मिळतो. थंडीच्या दिवसात गरम पाण्याची आंघोळ सुखकारक वाटते. मात्र गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे तुम्हाला इतर अनेक समस्यांना (Side effects of hot water bath) तोंड द्यावे लागू शकते. याचा तुमच्या शरीरावर अनेक पातळ्यांवर विपरित परिणाम होत असतो. थंडीच्या दिवसात गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या जाणून घेऊया. (Hot water bath in winter causes many health problems read in Marathi)

अधिक वाचा -  FIFA Wolrd Cup 2022 : फुटबॉल वर्ल्डकपवरून केरळमध्ये हाणामारी

गरम पाण्याच्या आंघोळीमुळे तुमच्या शरीराचे होणारे नुकसान- (Health damage by hot water bath)

प्रजननक्षमतेवरील परिणाम 
होय, तुम्ही कधी स्वप्नातदेखील विचार केला नसेल मात्र थंडीच्या दिवसात तुम्ही जेव्हा गरम पाण्याने जास्त वेळ आंघोळ करता तेव्हा त्याचा तुमच्या प्रजनन क्षमतेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ केल्यास तुमच्या प्रजनन क्षमतेवर त्याचा प्रभाव पडतो. त्यामुळे तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करताना ती कमीत कमी वेळात करण्याची काळजी घेतली पाहिजे.

केसांची होते हानी
गरम पाण्याचा आपल्या केसांना मोठा फटका बसतो. कारण त्यामुळे केसांमधील आर्द्रता कमी होते. तुम्हीदेखील हा अनुभव घेतला असेल की हिवाळ्यात आपले केस कोरडे होतात. आपल्या डोक्यावरील त्वचा कोरडी पडते. परिणामी केसांमध्ये कोंडा होण्याचे प्रमाण वाढते. शिवाय केस रुक्ष झाल्यामुळे केस गळण्याचेही प्रमाण वाढते.

अधिक वाचा - कधी आहे आहे दर्श अमावस्या 'या' दिवशी काय केल्याने होईल फायदा

त्वचेसाठी हानिकारक
हिवाळ्यात त्वचेच्या समस्या सर्वांनाच उद्भवतात. त्वचा कोरडी पडणे, फुटणे, खाज येणे यासारख्या समस्यांना आपण दर हिवाळ्यात तोंड देत असतो. त्यात तुम्ही जर गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर त्याचा फटका तुमच्या त्वचेला बसतो. परिणामी तुमच्या त्वचेचे आणखी नुकसान होते. कारण गरम पाण्यामुळे त्वचेची आर्द्रता आणि मुलायमपणा कमी होतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. त्याचसोबत मुरुम होणे, खाज येणे यासारख्या समस्यादेखील उद्भवतात. तुमच्या त्वचेचा तजेलदारपणा देखील यामुळे कमी होतो.

डोळे कमजोर होतात
गरम पाण्याच्या आंघोळीमुळे दृष्टीवरदेखील विपरित परिणाम होतो. डोळ्यातील ओलावा कमी होतो. परिणामी डोळे लाल होतात, डोळे चुळचुळतात. डोळ्यातून सारखे पाणी येते. डोळ्याच्या अवतीभोवती सुरकुत्या येतात. 

अधिक वाचा - Suryakumar Yadav: सूर्याला कधी मिळणार कसोटी खेळण्याची संधी? खुद्द क्रिकेटरने दिले याचे उत्तर

नखांची समस्या 
तुम्ही जर रोज गरम पाण्याने आंघोळ केली तर त्याचा तुमच्या नखांवर देखील विपरित परिणाम होतो. गरम पाण्यामुळे नखे जास्त मऊ होतात. त्यामुळे ती सारखी तुटू लागतात. त्यातील नैसर्गिक तेलदेखील कमी होते आणि ती कोरडी होतात. आपल्या नखांचे आरोग्य कमी होते. त्यांचे सौंदर्यदेखील कमी होते. 

शरीरात आळसावते
थंडीच्या दिवसात जर तुम्ही दररोज गरम पाण्याने आंघोळ केली तर तुमचे शरीर सुस्तावते. त्यामागचे कारण असे आहे की गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे तुमच्या शरीराला, स्नायूंना चांगला शेक बसतो. त्यामुळे शरीर रिलॅक्स होते. यातून आपल्याला झोप येते किंवा शरीर सुस्तावते. दिवसभर शरीरात ऊर्जेची कमतरता जाणवते.

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी