Uric Acid | शरीरात युरिक ॲसिडचं प्रमाण वाढण्याची अनेक कारणं असतात. बदलत्या जीवनशैलीपासून ताणतणावापर्यंतच्या अनेक शारीरिक आणि मानसिक कारणांमुळे शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढत असते. त्यावर अनेक वैद्यकीय उपचारही उपलब्ध असून वेगवेगळ्या औषधांनी शरीरातील युरिक ॲसिडची पातळी कमी करता येते. मात्र त्यासाठी काही घरगुती उपायदेखील आहेत, ज्यांच्या वापराने युरिक ॲसिडची पातळी कमी होऊ शकते. त्याबरोबत गुडघेदुखी आणि संधीवाताच्या समस्येवरदेखील हा उपाय रामबाण ठरत असल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. आपल्या रोजच्या वापरात असणारा आणि किचनमध्ये सतत दिसणारा हा मसाल्याचा पदार्थ युरिक ॲसिडचा नियंत्रणात ठेवण्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.
काळ्या मिरीचं तेल वापरून शरीरातील युरिक ॲसिडचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येत असल्याचं दिसून आलं आहे. या तेलाचा जर नियमित आणि योग्य प्रकारे वापर केला तर युरिक ॲसिडच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा निघू शकतो. संधीवात आणि गुडघेदुखी कमी कऱण्यासाठीदेखील या तेलाचा वापर होतो. त्याचप्रमाणं रक्ताभिसरण सुधारणे, वात कमी होणे आणि संधीवातापासून सुटका असे अनेक फायदे त्यापासून होतात.
काळ्या मिरीचं तेल सेवन केल्यामुळे घाम येण्याचं आणि लघवी होण्याचं प्रमाण वाढतं. घाम आणि लघवीवाटे शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर काढण्यासाठी काळी मिरी गुणकारी ठरते. शरीरातील अतिरिक्त पाणी आणि साठलेली चरबी काढून टाकण्यासाठीदेखील मिरीचा वापर होतो. त्याचप्रमाणं शरीरातील वेगवेगळ्या भागांना येणारी सूज कमी करण्यासाठी काळ्या मिरीचा वापर केला जातो.
अधिक वाचा - Smoking Addiction : स्मोकिंगचं व्यसन सहज सुटेल, रोजच्या आहारात खा या पाच गोष्टी
शरीरात युरिक ॲसिडचं प्रमाण वाढणं ही धोक्याची घंटा समजली जाते. युरिक ॲसिड हा रक्तातील सर्वात निरुपयोगी घटक आहे. प्युरिन नावाच्या रसायनामुळे हे आम्ल तयार होतं. बहुतांश युरिक ॲसिड हे रक्तात मिसळतं. हे युरिक ॲसिड किडणीतून प्रक्रिया होऊन मूत्रावाटे बाहेर पडतं. प्युरिन असणारे पदार्थ आणि पेयं यांचं अतिरिक्त सेवन केल्यामुळे शरीरात युरिक ॲसिडचं प्रमाण वाढतं.
अधिक वाचा - Long Hair Tips: लांब केसांची इच्छा होईल पूर्ण, फक्त या 3 गोष्टींची घ्या काळजी
काळ्या मिरीच्या तेलात शरीरातील कफ वितळवण्याचाही गुण असतो. ज्यांना सायनस आणि कफाचा त्रास असतो, त्यांना काळ्या मिरीचा फायदा होतो. श्वसनसंस्थेत असणारा कफ वेगाने वितळून शरीराला पटकन आराम देण्याचं काम काळी मिरी करते. याशिवाय काळ्या मिरीत असणारा पिपेरिन नावाचा घटक वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरपासून शरीराचा बचाव करण्यासाठी फायदेशीर असतो. पिपेरिनमुळे अन्नातील पोषक द्रव्ये शोषून घेण्याची आतड्यांची क्षमताही वाढते. हे पोषक घटकच कॅन्सरपासून शरीराचं रक्षण करतात.
अर्थात, हे सर्व घरगुती उपाय आहेत. तुम्हाला युरिक ॲसिडशी संबंधित काही गंभीर समस्या असेल तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्याची गरज आहे.