Xanthelasma : डोळ्यांवर का साचतं कोलेस्ट्रॉल? ही असतात लक्षणं

अनेकदा डोळ्यांवर फुटकुळ्या उठतात आणि काही दिवसात त्याच्या गाठी होतात. या गाठी कोलेस्ट्रॉलच्या असू शकतात. या गाठी दुखत नाहीत आणि खाजतही नाहीत.

Xanthelasma
डोळ्यांवर का साचतं कोलेस्ट्रॉल?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पापण्यांवरही साचतं कोलेस्ट्रॉल
  • उठतात पिवळ्या रंगाच्या फुटकुळ्या
  • गाठी असतात वेदनारहित

Xanthelasma : कोलेस्ट्रॉलच्या (Cholesterol) फायद्यातोट्यांविषयी (Benefits and side effects) आजवर तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील. मात्र हेच कोलेस्ट्रॉल कधी कधी डोळ्यांसाठीही त्रासदायक ठरू शकतं, हे तुम्हाला माहित आहे? गेल्या काही वर्षात अशा प्रकारे डोळ्यांवर कोलेस्ट्रॉल साचणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून डोळ्यांसाठी हा प्रकार धोकादायक ठरण्याची शक्यता असते. डोळ्यांवर (Eyes) साचणारं हे कोलेस्ट्रॉल पापण्यांवर किंवा डोळ्यांच्या खाली साचतं. डोळ्यांवर छोट्या छोट्या फुटकुळ्यांच्या रुपात याची सुरुवात होते. पापण्यांवर हळूहळू छोट्या फुटकळीप्रमाणे पिवळ्या रंगाचे डाग उठायला सुरुवात झाली, तर ते कोलेस्ट्रॉलचे असू शकतात. त्यानंतर हळूहळू या फुटकुळ्या वाढतात आणि कित्येक दिवस तशाच राहतात. त्या दुखत नसल्यामुळे अनेकांकडून दुर्लक्ष केलं जातं. वैद्यकीय परिभाषेत याला जैथिलास्मा असं म्हणतात. कोलेस्ट्रॉलचं वाढलेलं प्रमाण आणि लिव्हरशी संबंधित काही समस्यांमुळे हा त्रास उद्भवत असल्याचं आतापर्यंतच्या अभ्यासातून दिसून आलं आहे. जाणून घेऊया याच्या काही मूलभूत लक्षणांविषयी. 

ही आहेत लक्षणं

जैशिलास्मा या आजारात डोळ्यांच्या अवतीभवती, पापण्यांवर किंवा डोळ्यांखाली पिवळसर रंगाच्या छोट्या छोट्या फुटकुळ्या उठायला सुरुवात होते. या फुटकुळ्या सपाट आणि मऊ असतात. त्यानंतर काही महिन्यांत या फुटकुळ्यांचं रुपांतर गाठींमध्ये होऊ लागतं. या गाठी दुखत नाहीत किंवा त्यांना खाजही सुटत नाही. त्यामुळे एक प्रकारे या गाठी निरुपद्रवी असतात. 

हे आहे कारण

डोळ्यांवर कुठल्या कारणांमुळे कोलेस्ट्रॉल साठायला सुरुवात होते, याविषयीच्या अनेक कारणांची चर्चा आजवर झाली आहे. आतापर्यंतच्या वेगवेगळ्या अभ्यासातून वेगवेगळी कारणं समोर आली आहेत. त्यापैकी कुठल्याही एका ठोस कारणापर्यंत पोहोचणं अजून वैज्ञानिकांना आणि अभ्यासकांना शक्य झालेलं नाही. डोळ्यावर कोलेस्ट्रॉल साचण्याची कारणं प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकतात. काही तज्ज्ञांच्या मते लिव्हरच्या समस्येमुळे कोलेस्ट्रॉल डोळ्यांवर साचण्याची प्रक्रिया सुरू होते. काहींच्या मते जर शरीरात प्रमाणापेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल साचलं असेल, तर डोळ्यांवरही ते साचायला सुरुवात होते. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार पुरुषांपेक्षा महिलांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात आढळून येते. 

अधिक वाचा - Diet Tips : चाळीशी ओलांडत आहात? आहारात हे बदल नक्की करा! व्हाल दीर्घायुषी

लिपिडची बिघडलेली पातळी

रक्तात जर लिपिडची पातळी प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त असेल तरीही जैथिलास्मा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. बहुतांश वेळा ही समस्या असणाऱ्यांच्या रक्तात लिपिडची पातळी वाढल्याचंं दिसून आलं आहे. 

अधिक वाचा - Stomach Pain: पोटदुखीत चुकूनही करू नका या गोष्टींचे सेवन, पाहा सोपे घरगुती उपाय

आहार सुधारण्याची गरज

आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी आणि लिव्हरच्या समस्या हीच दोन कारणं समोर येत आहेत. त्यामुळे या आजारापासून दूर राहायचं असेल तर कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवणं आणि लिव्हरच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी आहारात योग्य ते बदल करण्याचा सल्ला दिला जातो. 

डिस्क्लेमर - वर उल्लेख केलेली जैथिलास्मा या आजाराची सामान्य लक्षणं आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर शारीरिक समस्या असतील,तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेण्याची गरज आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी