Heat Wave Side Effects: एप्रिल महिना सुरू झाला असून संपूर्ण भारतात उन्हाळ्याने आपला प्रकोप दाखवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये उन्हाळ्याची चाहूल अशी आहे की, तापमान 35 अंशांच्या पुढे गेले आहे. उष्ण वाऱ्यामुळे लोकांनी घराबाहेर पडणेच बंद केले आहे. (How does heat wave affect body Know the symptoms and remedies)
या दिवसात घराबाहेर पडणारे लोक आजारी पडत आहेत. अनेक वेळा उन्हाळ्यात आजारी पडणाऱ्या लोकांना असे वाटते की शरीराला योग्य प्रकारे हायड्रेट न ठेवल्याने असे होते. मात्र असे हे 10 पैकी 4 प्रकरणांमध्येच घडते. उन्हाळ्यात आजारी पडण्याचे मुख्य कारण म्हणजे उष्णतेची लाट. उन्हाळा सुरू झाला असून उष्णतेच्या लाटेने देशभरातील नागरिक हैराण झाले आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. यामध्ये उष्माघातासारख्या गोष्टींचा समावेश होतो.
जे लोक दिवसातील 7 ते 8 तास कडक उन्हात घालवतात त्यांना उष्णतेमुळे थकवा येण्याची शक्यता असते. उष्णतेच्या थकव्याच्या लक्षणांमध्ये त्वचेचा भाग काळा पडणे, फिकट होणे, लालसरपणा येणे आणि त्वचा अचानक थंड होणे यांचा समावेश होतो. उन्हाळ्यात उष्णतेच्या थकव्याची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा. सैल, सुती कपडे घाला.
अधिक वाचा: Health care: ताप आल्यावर या गोष्टींपासून ठेवा अंतर, अन्यथा ताप आणखीन वाढू शकतो
सूर्याच्या थेट संपर्कात आल्यास उष्माघात होतो. उष्माघातामुळे अचानक चक्कर येणे, गोंधळणे, डोकेदुखी हावू शकते. उन्हाळ्यात यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब जवळच्या हॉस्पिटल किंवा डॉक्टरांशी संपर्क साधा.
उन्हाळ्यात योग्य प्रमाणात पाणी न पिल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. डिहायड्रेशनमुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब, मळमळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत तुमच्या नियमित आहारात पाण्यासोबतच तुम्हाला अशा काही गोष्टींचा समावेश करावा लागेल, ज्यामुळे तुम्ही आतून हायड्रेट राहू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात नारळपाणी, शिकंजी, उसाचा रस, संत्र्याचा रस यासारख्या गोष्टींचा समावेश करू शकता.
अधिक वाचा: Back Pain Home remedies: कमी वयातच होऊ लागली आहे पाठदुखीची समस्या? हे करा घरगुती उपाय
कधीकधी उष्णतेच्या लाटेचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो. त्यामुळे त्वचेच्या वेगवेगळ्या भागात पुरळ उठणे, त्वचा लाल होणे, खाज येणे यासारख्या समस्या उद्भवतात. तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास, तुम्ही उन्हात बाहेर जाताना तुमचे हात आणि पाय झाकलेले कपडे घाला. तसेच, सनस्क्रीन वापरा.