सर्दी, ताप आणि रोगप्रतिकारशक्तीसाठीचे 5 घरगुती उपाय खरेच उपयुक्त असतात का, जाणून घ्या डॉक्टरांचे मत

आजही लोक सर्दी, खोकला, तापासारख्या आजारांसाठी रुग्णालयात न जाता घरगुती उपायांना प्राधान्य देतात. मात्र हे घरगुती उपाय आपल्यासाठी खरेच फायदेशीर असतात का? जाणून घ्या काय आहे यावर डॉक्टरांचे मत.

Garlic and ginger
सर्दी, ताप आणि रोगप्रतिकारशक्तीसाठीचे 5 घरगुती उपाय खरेच उपयुक्त असतात का, जाणून घ्या डॉक्टरांचे मत 

थोडं पण कामाचं

  • पांढऱ्या मिठापेक्षा चांगले असते सैंधव मीठ
  • हळदीचे दूध असते अनेक रोगांवरचा उपाय
  • मध आणि आल्याचे चमत्कारी गुण

कोरोनाच्या (Corona) या कठीण काळात लोक अनेक प्रकारचे घरगुती उपचार (home remedies) करत आहेत. कुणी काढा घेऊन गळा (throat) बरा करत आहे तर कुणी व्यायाम (exercise) आणि श्वसनाच्या व्यायामांद्वारे (breathing exercises). मात्र हे घरगुती उपचार खरोखरच प्रभावी (effective) आहेत का? डॉक्टरांच्या (doctors) म्हणण्यानुसार मध (honey), फळे (fruits), जडीबूटी आणि नैसर्गिक तेलांद्वारे (natural oils) आपला इलाज साध्या पद्धतीने करता येतो. याचे कोणतेही दुष्परिणामही (side effects) नसतात, मात्र याचा उपयोग करण्यासाठी योग्य माहिती (right information) असणे महत्वाचे आहे. आम्ही आपल्याला असे पाच घरगुती उपाय आणि त्यांच्यामागील विज्ञान (science) याबद्दल माहिती देणार आहोत.

पांढऱ्या मिठापेक्षा चांगले असते सैंधव मीठ

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सफेद म्हणजेच पांढऱ्या मिठाच्या तुलनेत खूप जास्त फायदेशीर असते. यात नैसर्गिक खनिजे असतात आणि सैंधव मिठामुळे पाचनक्रियेतही मदत होते.

सर्दी-खोकला झाल्यास चिकनचे सूप असते फायदेशीर

डॉक्टर सांगतात की चिकन सूपचा वापर घरगुती औषध म्हणून केला जाऊ शकतो. चिकनमुळे घशातील खवखव दूर होते आणि चोंदलेले नाक मोकळे होण्यासही मदत होते. या गरम सूपमुळे शरीराला ओलावा मिळतो आणि लवकर बरे होण्यास मदत होते.

हळदीचे दूध असते अनेक रोगांवरचा उपाय

दुधासोबत हळद उकळल्याने तयार होणारे हळदीचे दूध हे खूप परिणामकारक असते. दूध हा प्रथिनांचा खूप चांगला स्रोत आहे ज्यामुळे जखमा लवकर भरतात आणि हळदीमुळे सूज कमी होण्यास मदत होते.यामुळे शरीरात शिरणाऱ्या परजीवी गोष्टींशी लढण्याची ताकद शरीराला मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते.

मोहरीच्या तेलाने करावे लहान बाळांना मालिश

मोहरीचे तेल हे स्वाभाविकरित्या उष्ण असते. यामुळे आपल्या शरीरातील घामाच्या ग्रंथी मोकळ्या होतात आणि त्वचा कोमल होते. या तेलाने केलेल्या मालिशचे खूप फायदे आहेत. मोहरीच्या तेलाने मसाज केल्यामुळे शरीरात सर्वत्र रक्त पोहोचण्यास मदत होते.

मध आणि आल्याचे चमत्कारी गुण

आले पाण्यात उकळून त्यात मध घालून प्यायल्याने सर्दी आणि खराब घशावर उपचार होतात. याबद्दल डॉक्टर सांगतात की आले हे खोकल्यावर परिणामकारक असते, कारण हे एका अँटीऑक्सिडंटसारखे काम करते आणि आजारापासून लवकर सुटका देते. यासोबतच मधामुळे घसा सुजला असल्यास यातही आराम मिळतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी