Hair problems | तुमच्या केसांच्या सर्व प्रश्नांवर उत्तर म्हणजे जास्वंदाचे फूल, पाहा मोठे फायदे

Hibiscus Flower benefits | जास्वदांचे फूल व्हिटामिन सी चा मोठा स्त्रोत आहे. सर्दी, खोकला यासारख्या आजारात याचा चांगला उपयोग होतो. त्याचबरोबर जास्वदांचे फूल हे केसांसाठीदेखील (Hibiscus flower useful for hair) वरदानच असते. तज्ज्ञांनुसार जास्वदांचे फूल केसांसाठी कंडिशनरचे (hair conditioner)काम करते. याशिवाय केसांमधील कोरडेपणा (hair dryness),अकाली पांढरे होणे आणि केस गळती (hair loss)यासारख्या समस्यांवरदेखील जास्वदांचे फूल गुणकारी असते.

Hibiscus flower useful for hair
केसांच्या समस्यांवरील उपाय जास्वंदाचे फूल 
थोडं पण कामाचं
  • जास्वंदाच्या फूलाचे विविध फायदे
  • केस गळणे, कोरडेपणा, कोंडा होणे यासारख्या केसांच्या विविध समस्यांवर उपयुक्त
  • साध्या सोप्या उपायांनी मिळवा सुंदर, मुलायम आणि निरोगी केस

Hibiscus Flower | नवी दिल्ली : जास्वदांचे फूल दिसायला खूपच सुंदर असते. मात्र जास्वंदाच्या फुलामुळे (Hibiscus Flower)फक्त बागिच्याचे सौंदर्यच वाढत नाही तर हे फूल अत्यंत औषधी गुणांनी युक्त असते. जास्वदांचे फूल व्हिटामिन सी चा मोठा स्त्रोत आहे. सर्दी, खोकला यासारख्या आजारात याचा चांगला उपयोग होतो. त्याचबरोबर जास्वदांचे फूल हे केसांसाठीदेखील (Hibiscus flower useful for hair) वरदानच असते. तज्ज्ञांनुसार जास्वदांचे फूल केसांसाठी कंडिशनरचे (hair conditioner)काम करते. याशिवाय केसांमधील कोरडेपणा (hair dryness),अकाली पांढरे होणे आणि केस गळती (hair loss)यासारख्या समस्यांवरदेखील जास्वदांचे फूल गुणकारी असते. तुमच्या केसांच्या विविध समस्यांवर जास्वंदाचे फूल कसे उपयुक्त असते ते पाहूया. (Hair tips: how hibiscus flower is useful to hair, see the tips)

केसांचे पांढरे होणे थांबवा

केसांच्या फॉलिकल्समध्ये मेलानिन पिगमेंटचे प्रमाण कमी झाल्यामुळे केस अकाली पांढरे होतात. जास्वंदाच्या फुलात अनेक व्हिटामिन्स आणि अॅंटी ऑक्सिडेंट असतात. यातून मेलानिनची निर्मिती होते. यामुळे केसांचे अकाली पांढरे होणे थांबते. एक मोठा चमचा जास्वंदाच्या फूलाची पावडर, सोबत एक मोठा चमचा आवळा पावडर घेऊन अर्धा कप खोबरेल तेल त्यात मिसळावे. याला केसांच्या मूळाशी लावून जवळपास दोन तास राहू द्यावे. तुम्ही हवे तर याला रात्रभरदेखील ठेवू शकता. यानंतर केस धुवून टाकावेत. असे आठवड्यातून दोनदा केल्याने खूप फायदा होतो.

केसांचे कोरेडपणा जाऊन केस मुलायम होतात

जर तुमचे केस फारच कोरडे झाले असतील तर जास्वंदाच्या फूलाच्या पावडरचा वापर कोरफडच्या जेलमध्ये करावा. हे मिक्स करून यानंतर या पेस्टला केसांमध्ये लावून याला दोन तासांसाठी ठेवावे. यानंतर केस मुलायम होतात आणि केस मजबूतदेखील होतात.

केस गळती थांबते

जर तुमचे केस फारच गळत असतील तर जास्वंदाच्या फूलाची पावडर दह्यात मिक्स करून ती केसांना लावावी. याशिवाय तुम्ही ताज्या जास्वंदाच्या फुलांना आणि पानांना बारीक वाटून ती दह्यात मिसळूनदेखील लावू शकता. याला जवळपास एक ते दोन तास केसांना लावावे आणि नंतर केस धुवून टाकावेत. यामुळे केस गळणे कमी होते.

चांगला कंडिशनर

जर तुम्ही जास्वंदाच्या फूलांपासून बनलेल्या पावडरला अंड्याच्या पांढऱ्या बलकामध्ये मिक्स करून केसांना लावले तर हे फार चांगल्या कंडिशनरचे काम करते. याशिवाय जास्वंदाच्या फूलाची पावडर मेंदीमध्ये मिक्स करून केसांना लावता येते. यामुळे केसांना रंगदेखील चांगला येतो आणि केसांची कंडिशनिंग होते. शिवाय कोंड्याचा त्रासदेखील दूर होतो.

अशी बनवा जास्वंदाची पावडर

पावडर बनवण्यासाठी जास्वंदाच्या फूलांना आणि पानांना समान प्रमाणात घेऊन सुकवा. त्यानंतर याला बारीक वाटून घ्या आणि याची पावडर बनवा आणि मग ती बाटलीत भरून ठेवा. यानंतर ही पावडर तुम्ही केस आणि त्वचेसाठी वापरू शकता.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी