बायकोही घरात देईल एंट्री फक्त इतकेच पेग प्या दारू, जाणून किती मद्य घेणं आहे फायदेशीर

भारतासारख्या देशात दारू हा लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. काहीजण आपलं रुबाब दिसावा म्हणून पितात तर काहीजण व्यसन म्हणून अन् काहीजण फक्त हौस म्हणून दारुचे सेवन करत असतात. परंतु या दारुमुळे अनेकांचे आयुष्य दारूमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे, हे आपल्या डोक्यात ठेवणं गरजेचं आहे.

How many pegs of alcohol is beneficial to drink, which will be given by the wife
किती पेग दारू पिणं आहे फायदेशीर, ज्याला बायकोही देईल परनवागी  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • कमी दारूमुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका टाळू शकतात.
  • एका वेळी फक्त दोन पेग घेतले तर ते रक्तातील चांगले एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढवते.
  • जास्त मद्यपान केल्याने कोलन आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोकाही वाढतो.

नवी दिल्ली : भारतासारख्या देशात दारू हा लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. काहीजण आपलं रुबाब दिसावा म्हणून पितात तर काहीजण व्यसन म्हणून अन् काहीजण फक्त हौस म्हणून दारुचे सेवन करत असतात. परंतु या दारुमुळे अनेकांचे आयुष्य दारूमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे, हे आपल्या डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. दारूचे आरोग्यावरही घातक परिणाम होतात. पण जर एका मर्यादेत दारू प्यायली तर ती तितकी जीवघेणी ठरत नाही, हे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण या लेखातून त्याविषयी माहिती घेणार आहोत.. 

कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून किती दारू प्यावी, पुरुषाने किती दारू प्यावी, स्त्रीने किती दारू प्यावी आणि कोणी तरुण वयात असेल तर त्याने किती प्यावे, हे तुम्हाला माहिती आहे का, नाही ना मग हा लेख वाचा अन् त्यानुसार दारुचं करा नियोजन. तुमच्या कमी पेगचं गणित पाहून दारू पिवून आल्यानंतर घरात न घेणारी पत्नीदेखील तुम्हाला घरात घेईल यात शंका नाही.  

एखाद्या व्यक्तीने किती दारू प्यावी

तुमच्यासाठी चांगली आणि आनंदाची बातमी म्हणजे, मर्यादेत मद्यपान केल्याने आरोग्यालाही फायदा होतो, असे अनेक प्रकारच्या संशोधनातून दिसून आले आहे. आता दारूला बायकोचा आणि संसाराचा मुद्दा बनवू नका. विज्ञानाच्या भाषेत समजून घ्या. विज्ञानाचा असा विश्वास आहे की, आपण कमी दारू पितो. त्यामुळे तुम्ही स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका टाळू शकतात.

अल्कोहोल पिण्याच्या फायद्यांवर विज्ञान तर्क 

जर तुम्ही थोडेसे अल्कोहोल प्यायले, म्हणजे एका वेळी फक्त दोन पेग घेतले तर ते रक्तातील चांगले एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढवते. फायब्रिनोजेनसारखे घटकही कमी होतात. माफक प्रमाणात अल्कोहोल पिण्याचा आणखी एक फायदा म्हणजे टाईप-2 मधुमेह आणि पित्ताशयातील दगडांचा धोका देखील कमी होतो. पण अल्कोहोल कमी प्रमाणात प्यायल्यावरच हा फायदा होतो. जास्त मद्यपान केल्याने कोलन आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोकाही वाढतो. एक विशेष गोष्ट अशी आहे की, जर महिलांनी फॉलिक अॅसिडचे सेवन केले तर महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोकाही कमी होऊ शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी