Oral health tips: रोज ब्रश करताना किती टूथपेस्ट वापरावी? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

प्रमाणापेक्षा जास्त टूथपेस्ट वापरणं हे आरोग्यासाठी हानीकारक ठरत असल्याचं दिसून आलं आहे. दातांसोबतच ओरल हेल्थवरही त्याचा विपरित परिणाम होतो. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार केवळ फेस तयार करण्यासाठी आवश्यक तेवढीच टूथपेस्ट दररोज वापरायला हवी. चवीसाठी नाही.

Oral health tips
रोज ब्रश करताना किती टूथपेस्ट वापरावी?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जास्त प्रमाणात टूथपेस्ट वापरण्यामुळे दातांचं नुकसान
  • जाहीरातीत दाखवलं जाणारं टूथपेस्टचं प्रमाण ठरतं हानीकारक
  • कमी प्रमाणात टूथपेस्ट वापरल्यामुळेही होऊ शकतं नुकसान

Oral health tips: दात घासण्यासाठी टूथपेस्टचा (Toothpaste) वापर किती करावा, याबाबत अनेकांच्या मनात गोंधळाची परिस्थिती असते. जाहीरातींमध्ये दाखवलं जाणारं टूथपेस्ट वापऱण्याचं प्रमाण (Quantity of paste) आणि आरोग्यासाठी योग्य असणारं प्रमाण यामध्ये मोठी तफावत असते. मात्र अनेक सर्वसामान्यांना ही बाब माहित नसते. जास्त पेस्ट वापरली तर आपले दात जास्त साफ होतील, असंही काहीजणांना वाटत असतं. त्यामुळे टूथपेस्टचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र प्रमाणापेक्षा जास्त टूथपेस्ट वापरणं हे आरोग्यासाठी हानीकारक ठरत असल्याचं दिसून आलं आहे. दातांसोबतच ओरल हेल्थवरही त्याचा विपरित परिणाम होतो. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार केवळ फेस तयार करण्यासाठी आवश्यक तेवढीच टूथपेस्ट दररोज वापरायला हवी. चवीसाठी नाही. टूथपेस्टचा वापर लहान मुलं आणि प्रौढांसाठी एकसारखाच करायचा असतो, मात्र लहान मुलांच्या दातांवर या पेस्ट अधिक विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. जाणून घेऊया, किती टूथपेस्ट वापरणं आरोग्यासाठी योग्य असतं. 

किती टूथपेस्ट वापरणं योग्य?

दातांची चांगली सफाई आणि स्वच्छता करण्यासाठी टूथपेस्ट वापरणं गरजेचं असतंच. मात्र हेल्थ डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार टीव्ही जाहीरातीत दाखवलं जाणारं टूथपेस्ट वापरण्याचं प्रमाण हे दातांसाठी हानीकारक ठरतं. रोज एवढी पेस्ट वापरली तर ओरल हेल्थवरही त्याचा विपरित परिणाम होत असतो. प्रत्येक व्यक्तीला एका वेळी एका वाटाण्याच्या आकाराएवढीच टूथपेस्ट वापरणं आरोग्यदायक मानलं जातं. टूथपेस्टच्या पॅकेजिंगवरही हे प्रमाण लिहिलेलं असतं. मात्र ते अगदीच बारीक अक्षरात असल्यामुळे प्रत्येकाकडून वाचलं जात नाही. 

अधिक वाचा - Healthy drinks for winter : हिवाळ्यात ही पेये तुम्हाला ठेवतील निरोगी, शिवाय त्वचादेखील होईल चमकदार

मुलांसाठी हानीकारक

मुलांसाठी टूथपेस्टचा प्रमाणाबाहेर वापर हानीकारक ठरण्याची शक्यता असते. जास्त पेस्ट वापरल्यामुळे मुलांचे दुधाचे दात खराब होण्याची शक्यता असते. या पेस्टमध्ये फ्लोराईड असतं. ते अधिक प्रमाणात वापरलं गेल्यामुळे दात खराब होतात. मुलांचे दात अद्याप पूर्णतः मजबूत झालेले नसतात. त्याच्याशी फ्लोराईडचा संपर्क आल्यामुळे फ्लोरोसिस नामक कॉस्मेटिक स्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे दातांवर पिवळ्या आणि करड्या रंगाचे डाग उठायला सुरुवात होते. अनेकदा दातांत खड्डे पडायलाही सुरुवात होते. त्यामुळे लहान मुलांना एखाद्या वाटाण्याच्या आकारापेक्षा जास्त टूथपेस्ट न देण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जातो. 

अधिक वाचा - Excess water effects: जास्त पाणी पिल्याने झाला होता ‘ब्रूस ली’चा मृत्यू, किती पाणी पिणं योग्य?

कमी टूथपेस्टही हानीकारक

फारच कमी प्रमाणात टूथपेस्ट वापरल्यामुळेही समस्या निर्माण होऊ शकतात. कमी टूथपेस्टमुळे फेस आवश्यक त्या प्रमाणात तयार होऊ शकत नाही. त्यामुळे दातांची योग्य प्रकारे साफसफाई होत नाही. शिवाय दातांना आवश्यक असणारं फ्लोराईडही कमी प्रमाणात मिळतं. फ्लोराईडचा दातावर परिणाम व्हायला वेळ लागतो. त्यामुळे ब्रश करताना पाण्याचा वापर टाळण्याचा सल्ला दिला जातो. काही मिनिटे सलग ब्रश करून मगच पाण्याने चुळा भराव्यात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी