Excess water effects: जास्त पाणी पिल्याने झाला होता ‘ब्रूस ली’चा मृत्यू, किती पाणी पिणं योग्य?

प्रसिद्ध मार्शल आर्ट लिजंड ब्रूस ली याचा मृत्यूही प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिल्यामुळे झाल्याचं दिसून आलं होतं. पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं असल्याचं नेहमीच सांगितलं जातं. मात्र अतिरिक्त पाण्यामुळे जीवघेणे आजार झाल्याची आणि मृत्यू आल्याची उदाहरणंदेखील दिसून येतात.

Excess water effects
जास्त पाणी पिल्याने झाला होता ‘ब्रूस ली’चा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जास्त पाणी पिल्याने झाला होता ‘ब्रूस ली’चा मृत्यू
  • अतिरिक्त पाणी ठरतं आरोग्यासाठी घातक
  • योग्य प्रमाणात आणि विविध माध्यमातून पाण्याची गरज भागवणं योग्य

Excess water effects: वजन कमी (Weight Loss) करायचं असेल, तर पाणी पिण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. अनेकजण वजन कमी करण्यासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी अधिक प्रमाणात पाणी (Excess water )पिताना दिसतात. मात्र कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो, असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे पाण्याचा अतिरेकही वाईट आणि नुकसानदायक ठरू शकत असल्याचं दिसून आलं आहे. प्रसिद्ध मार्शल आर्ट लिजंड ब्रूस ली याचा मृत्यूही प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिल्यामुळे झाल्याचं दिसून आलं होतं. फिट राहण्यासाठी तो जास्तीत जास्त लिक्विड डाएट घेत असे. त्याचप्रमाणे तो काही अंमली पदार्थांचंही सेवन करत असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे त्याला सतत तहान लागत असे. ती भागवण्यासाठी तो अतिरिक्त पाणी प्यायचा. या सगळ्याचा त्याच्या किडणीवर विपरित परिणाम झाला आणि त्याच्या डोक्यात सूज आली. या आजारातच त्याचा मृत्यू झाला. 

पाण्याबाबत अनेक प्रश्न

पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं असल्याचं नेहमीच सांगितलं जातं. मात्र अतिरिक्त पाण्यामुळे जीवघेणे आजार झाल्याची आणि मृत्यू आल्याची उदाहरणंदेखील दिसून येतात. त्यामुळे जास्त पाणी पिण्याचा काय तोटा होतो, नेमकं किती पाणी पिणं योग्य आहे आणि पाणी कसं प्यावं, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. जाणून घेऊया, याच प्रश्नांची उत्तरं. 

अधिक वाचा - Avoid Skin Dryness: थंडीत चेहरा धुतल्यामुळे त्वचा होते ड्राय, करा हे घरगुती उपाय

जास्त पाण्यामुळे मृत्यू होतो?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे. जास्त पाणी पिण्यामुळे मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. जेव्हा शरीरात गरजेपेक्षा जास्त पाणी येतं, तेव्हा ते त्यातील सोडियम आणि अँझायमसह शरीराबाहेर फेकलं जातं. या प्रक्रियेचा किडणीवर अतिरिक्त ताण येतो. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिनेही याबाबतचा आपला अनुभव शेअर केला होता. वजन कमी करण्याच्या नादात जास्त पाणी पिल्यामुळे तिची तब्येत चांगलीच बिघडली होती. पाणी किती प्यावं, हे प्रत्येकाच्या तब्येतीवर अवलंबून असतं. मात्र जास्त पाणी पिणं हे नक्कीच धोकादायक ठरण्याची शक्यता असते. 

किती पाणी पिणं योग्य?

जास्त पाणी पिणं अयोग्य आहे, हे स्पष्ट झाल्यानंतर प्रश्न निर्माण होतो, तो किती पाणी योग्य आहे, हा. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जर तुम्हाला किडणी, लिव्हर, हार्ट यापैकी कुठलाही त्रास नसेल, तर पाण्याचं प्रमाण हे तुमच्या वजनावरून ठरवता येऊ शकतं. दर 15 किलो वजनामागे दररोज 1 लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणं शरीरात येणारं पाणी हे फळं, भाज्या, सॅलड, ज्यूस यासारख्या वेगवेगळ्या माध्यमातून येणं अधिक योग्य मानलं जातं. 

अधिक वाचा - Red wine benefits: रेड वाईनचे असंख्य फायदे, त्वचा होईल मुलायम

पाणी कसं प्यावं?

पाणी कसं प्यावं, हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असल्याचं डाएटिशन सांगतात. साधारणतः वेगवेगळ्या प्रकारे पाण्याचं सेवन करणं अधिक फायदेशीर असल्याचं सांगण्यात येतं. लिंबू सरबत, फळांचा रस, नारळपाणी, भाज्या आणि सॅलडमधून जाणारं पाणी आणि प्रत्यक्ष पाणी अशा वेगवेगळ्या माध्यमातून शरीराला मिळणारं पाणी अधिक फायदेशीर मानलं जातं. 

डिस्क्लेमर - अति पाण्याच्या दुष्परिणामांबाबत सामान्यज्ञानाच्या आधारे देण्यात आलेल्या या काही टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असेल, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी