Correct Weight : वयानुसार वजन किती असावे? तुमचा BMI जाणून घेण्यासाठी पहा चार्ट

तब्येत पाणी
Updated Mar 20, 2023 | 15:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Body Mass Index : आपण वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. पण वय आणि उंचीनुसार वजन किती महत्वाचे आहे हे अनेकांना माहीत नाही. वजन आणि उंची बद्दल आपल्याला माहित असेल परंतु आज आम्ही तुम्हाला वजन आणि वयाचे गणित सांगणार आहोत.

body mass index
बॉडी मास इंडेक्स  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • BMI म्हणजे काय?
  • बीएमआय मोजण्याची सोपी ट्रिक्स
  • विशिष्ट वयानंतर आरोग्याचा समस्या निर्माण होऊ शकते

What Should Be The Correct BMI: आजकाल लोक आपल्या आरोग्याबाबत सावध झाले आहेत. एवढेच नाही तर ते त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला स्वतःला फिट ठेवण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यास शिकवत आहे. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी लहानपणापासूनच मुलांना योग्य माहिती मिळाली, तर ते आयुष्यभर आपल्या आरोग्याबाबत जागृक राहायला शिकतात आणि आपले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. पण वय आणि उंचीनुसार वजन किती महत्वाचे आहे हे अनेकांना माहीत नाही. वजन आणि उंचीबद्दल आपल्याला माहित असेल परंतु आज आम्ही तुम्हाला वजन आणि वयाचे गणित सांगणार आहोत.

विज्ञान काय म्हणते

प्रत्येकाचे शरीर वेगळे असते आणि त्यांचे वजनदेखील वेगवेगळ्या घटकांद्वारे निर्धारित केले जाते. वय, उंची आणि लिंग याच्या आधारे हे घटक ठरवता येतात. संशोधकांचा असा विश्वास आहे की,  जर तुमचे वजन योग्य वयात नियंत्रित केले नाही तर ते भविष्यात आजारांचे कारण बनू शकते आणि एका विशिष्ट वयानंतर आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

अधिक वाचा:  Weight Loss Yoga Tips: योगा एक्सपर्टकडून जाणून घ्या वजन कमी करण्याच्या ट्रिक्स

बीएमआय मोजण्याची सोपी ट्रिक्स

जर तुम्हाला बॉडी मास इंडेक्स काढायचा असेल तर तुम्ही ऑनलाइन कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुमची उंची आणि वजन टाकून बीएमआय मिळवू शकता. याशिवाय बॉडी मास इंडेक्स जाणून घेण्यासाठी तुम्ही एक सोपा फॉर्म्युला वापरू शकता. (BMI = वजन / उंची किंवा BMI = वजन / (उंची X उंची) . हे बीएमआय कॅल्क्युलेटर कोणत्याही डॉक्टर किंवा जीवशास्त्रज्ञाने बनवलेले नाही तर गणितज्ञांनी बनवले आहे. यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत, म्हणूनच या प्रकारच्या कॅल्क्युलेटरपेक्षा फिटनेसवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या चार्टनुसार, खाली दिलेल्या माहितीनुसार तुम्ही नवजात बालकांपासून ते 60 वर्षांपर्यंतच्या लोकांची उंची आणि वजन जाणून घेऊ शकता.

नवजात मुलाचे वजन

मुलाचे वजन- 3.3 किलो
मुलीचे वजन- 3.3 किलो

2 ते 5 महिन्यांच्या बाळाचे वजन

मुलाचे वजन- 6 किलो
मुलीचे वजन- 5.4 किलो

6 ते 8 महिने बाळाचे वजन

मुलाचे वजन - 7.2 किलो
मुलीचे वजन - 6.5 किलो

अधिक वाचा:  Weight Loss Tips: सकाळी रिकाम्या पोटी प्या ओव्याचे पाणी, वाढत्या चरबीवर लागेल फुल स्टॉप

9 महिने ते 1 वर्ष बाळाचे वजन

मुलाचे वजन - 10 किलो
मुलीचे वजन - 9.50 किलो

2 ते 5 वर्षांच्या मुलांचे वजन

मुलाचे वजन - 12.5 किलो
मुलीचे वजन - 11.8 किलो

6 ते 8 वर्षांच्या मुलांचे वजन

मुलाचे वजन - 12 ते 18 किलो
मुलीचे वजन - 14 ते 17 किलो

9 ते 11 वर्षांच्या मुलांचे वजन

मुलाचे वजन - 28 ते 31 किलो
मुलीचे वजन - 28 ते 31 किलो

12 ते 14 वर्षांच्या मुलांचे वजन

मुलाचे वजन - 32 ते 38 किलो
मुलीचे वजन - 32 ते 36 किलो

अधिक वाचा: Weight loss Soup द्वारे लठ्ठपणा झटपट दूर करण्याचे हे आहेत टिप्स, बनवण्याची पद्धत जाणून घ्या

15 ते 20 वयोगटातील व्यक्तीचे वजन

मुलाचे वजन - 40 ते 50 किलो
मुलीचे वजन - 40 ते 45 किलो

21 ते 30 वयोगटातील व्यक्तीचे वजन

मुलाचे वजन - 60 ते 70 किलो
मुलीचे वजन - 50 ते 60 किलो

30 ते 40 वर्षे वयाच्या व्यक्तीचे वजन

मुलाचे वजन - 59 ते 75 किलो
मुलीचे वजन - 60 ते 65 किलो

वय 40 ते 50 वर्षे व्यक्तीचे वजन

मुलाचे वजन - 60 ते 70 किलो
मुलीचे वजन - 59 ते 65 किलो

वय 50 ते 60 वर्षे व्यक्तीचे वजन

मुलाचे वजन - 60 ते 70 किलो
मुलीचे वजन - 59 ते 65 किलो.
याशिवाय तुमचे वजन जास्त किंवा कमी असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी