Skin Care Tips: घरच्याघरी अवघ्या १० मिनीटांत बनवा एलोव्हेरा फेस मिस्ट, डार्क स्पॉट होतील दूर

तब्येत पाणी
Updated Jan 10, 2020 | 17:31 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Aloe Vera spray for face: स्वच्छ आणि सुंदर त्वचा हवी असेल तर आपण घरच्याघरी अवघ्या १० मिनीटांमध्येच एलो फेस मिस्ट बनवून त्याचा वापर करू शकता. याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. तर मग जाणून घ्या कसा बनवायचं ते...

Easy DIY Aloe Vera Face Mists
घरच्याघरी अवघ्या १० मिनीटांत बनवा एलोव्हेरा फेस मिस्ट  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

 • एलोव्हेरा त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्याचं काम करतं
 • चेहऱ्यावरील डाग, मुरुम सर्व दूर करण्याचं काम एलोव्हेरा करतं.
 • घरच्याघरी एलोव्हेरा फेस मिस्ट सोबतच एलोव्हेरा क्लिअर स्किन फेस टोनर सुद्धा आपण बनवू शकतो.

मुंबई: ज्या तरुणी आपल्या त्वचेची विशेष म्हणजे चेहऱ्याची काळजी घेतात, त्यांना फेशिअल मिस्टचा वापर करणं किती फायदेशीर आहे हे माहिती असतं. चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या, डाग दूर करण्याचं काम फेस मिस्ट करतं. फेस मिस्टचा वापर आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. जर आपल्याला बाजारातून अशाप्रकारे कुठलाही फेस मिस्ट विकत घ्यायचा नसेल, तर काळजी करू नका आपण घरच्याघरी असा फेस मिस्ट बनवू शकता.

एलोव्हेरा फेस मिस्ट बनविण्यासाठी आपल्याला फक्त एलोव्हेरा जेल आणि इतर लहान-मोठ्या वस्तू लागणार आहेत. जाणून घ्या आपल्या त्वचेची काळजी घेणारं एलोव्हेरा फेस मिस्ट घरच्याघरी कसं बनवायचं ते...

एलोव्हेरा फेस मिस्ट बनवायला लागणारं साहित्य-

 • अर्धा चमचा शुद्ध एलोव्हेरा जेल

 • २ मोठे चमचे विच हेजल
 • ५ चमचे थंड पाणी
 • स्पे बॉटल
 • पर्यायी – आवडत्या तेलाचे ५ थेंब
 • एलोव्हेरा फेस मिस्ट तयार करण्याची पद्धत-

 • एका बाऊलमध्ये बरोबरीच्या मात्रेत एलोव्हेरा जेल आणि पाणी मिसळा.

 • यात असलेल्या सर्व गाठी चमच्याच्या मदतीनं विरून टाका.
 • त्यानंतर या एक-एक वस्तू मिसळा आणि बॉटलमध्ये हे मिस्ट भरा.
 • आपलं एलोव्हेरा फेस मिस्ट वापरासाठी तयार असेल.
 • चेहऱ्यासाठी किती फायदेशीर आहे एलोव्हेरा जेल पाहा

एलोव्हेरा चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा ग्रीसी लूक न देता मॉइश्चराईज करतो. चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्यांसाठी एलोव्हेरा अगदी अँटी एजिंग एलिमेंटसारखं काम करतं. याशिवाय क्रोनिक स्किनचे आजार बरे करण्यासाठीही याचा फायदा होतो. सोरायसिस, एग्जीमा आणि मुरूम, पुरळं दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच स्किन पिगमेंटेशन दूर करण्याचं कामही एलोव्हेरा फेस मिस्ट करतं. विशेष म्हणजे एलोव्हेरा जेलचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. त्यामुळे याचा वापर खूप फायदेशीर ठरतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी