Amaxophobia किंवा ड्रायव्हिंगची भीती कशी टाळायची? जाणून घ्या लक्षणे आणि त्यावरील उपाय

तब्येत पाणी
Updated Apr 13, 2023 | 18:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Amaxophobia Symptoms: काही लोक कार किंवा दुचाकी चालवण्यास घाबरतात. गाडी चालवली तर अपघात होऊ शकतो, असे त्यांना वाटते. असे लोक ड्रायव्हरच्या सीटवर बसताच घाबरतात. ही परिस्थिती भीती नसून एक फोबिया असू शकते.

How to Avoid Amaxophobia Or Fear of Driving
Amaxophobia किंवा ड्रायव्हिंगची भीती कशी टाळायची?  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • कार किंवा दुचाकी चालवण्यास घाबरतात.
  • गाडी चालवली तर अपघात होऊ शकतो
  • अशा लोकांना गाडीत बसताच जीवाचा धोका जाणवतो

Fear of Driving : काही लोक कार किंवा दुचाकी चालवण्यास घाबरतात. गाडी चालवली तर अपघात होऊ शकतो, असे त्यांना वाटते. असे लोक ड्रायव्हरच्या सीटवर बसताच घाबरतात. ही परिस्थिती भीती नसून एक फोबिया असू शकते. काही लोकांना कार चालवण्याची भीती किंवा अ‍ॅमॅक्सोफोबिया असतो. या फोबियामुळे व्यक्ती कार, दुचाकी किंवा इतर कोणतेही वाहन चालवताना घाबरते. (How to Avoid Amaxophobia Or Fear of Driving)

अशा लोकांना गाडीत बसताच जीवाचा धोका जाणवतो. जीव धोक्यात आल्याचे त्यांना वाटते. अशा लोकांना गाडी चालवण्याची सक्ती करू नये, परंतु किमान त्यांच्या या समस्येवर उपचार केले पाहिजेत. अनेकवेळा या फोबियाने ग्रस्त असलेल्या लोकांना याची जाणीव नसते. गाडी चालवताना त्यांना फोबियाची लक्षणे जाणवतात. कधी कधी ते अपघाताचे कारणही बनते. म्हणूनच हा फोबिया समजून घेणे आवश्यक आहे. आज आपण अ‍ॅमॅक्सोफोबियाची लक्षणे आणि त्यावरील उपाय जाणून घेऊया.

अधिक वाचा: Pregnancy Tips: गरोदरपणात ऑफिसला जात असाल तर सुरक्षित मातृत्वासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

Amaxophobia ची लक्षणे

  • वाहनात बसल्यावर घाम येणे.  
  • वाहनात बसल्यावर हृदयाचे ठोके वाढणे.
  • गाडी चालवण्यापूर्वी घाबरणे किंवा रडणे.
  • वाहन चालवताना मानसिक संतुलन बिघडते. 

अधिक वाचा: Pregnancy Exercises: बॉडी वेट मेंटेन ठेवण्यासाठी गर्भधारणेदरम्यान करा या व्यायामांचा सराव

ड्रायव्हिंगची भीती कशी दूर करावी?

जर तुम्हाला बाईक किंवा कार चालवण्याची भीती वाटत असेल, तर तुम्ही हळूहळू या भीतीला फेस केलं पाहिजे.
दरम्यानच्या काळात कुटुंबाचा आधार कामी येतो. बाईक किंवा कार चालवण्याची भीती दूर करण्यासाठी, कुटुंबातील व्यक्तीची मदत घ्या.

  • तुमच्या कारमध्ये 5 मिनिट शांतपणे बसा.
  • हायवे किंवा मुख्य रस्त्यावर कार किंवा बाईक नेऊ नका, आधी तुमच्या कॉलनी किंवा कंपाउंडमध्ये प्रॅक्टिस करा.
  • तुमचा हात सेट झाल्यानंतर गाडी मुख्य रस्त्यावर आणा. पण गती कमी ठेवा. 
  • तुम्ही मंद गतीने आणि आरामात गाडी चालवा.
  • घाबरू नका, गाडी कशी चालवायची हे माहीत असलेल्या एखाद्याला सोबत घ्या.  
  • अ‍ॅमॅक्सोफोबियातून बाहेर येण्यासाठी, थेरपिस्ट किंवा समुपदेशकाची मदत घेतली जाऊ शकते.
  • थेरपीच्या माध्यमातून तुमच्या मनातील भीती दूर करून तुम्हाला नॉर्मल फिल केले जाते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी