कोरोना व्हायरसपासून कसे वाचाल? पाहा या जीवघेण्या आजाराची लक्षणं काय-काय 

कोरोना विषाणूबद्दल लोकांच्या मनात खूप भीती आहे आणि हा रोग काय आहे आणि त्याचे लक्षणे कशी आहेत आणि आपण त्यापासून बचाव कसा करू शकतो हे लोक जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

how to avoid corona virus a look at the symptoms of the disease
कोरोना व्हायरसपासून कसे वाचाल? पाहा या जीवघेण्या आजाराची लक्षणं काय-काय   |  फोटो सौजन्य: Representative Image

मुंबई: कोरोना व्हायरसमुळे (Corona virus) चीनमध्ये अक्षरश: हाहाकार उडाला आहे. मात्र आता हाच जीवघेणा व्हायरस भारतातही येऊन ठेपला आहे. देशाची राजधानी दिल्लीतील पियाझ्झा रेस्टॉरंटमध्ये जेवण घेतलेल्या व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

भारतात तब्बल २८ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भारत सरकार अलर्ट झालं असून आरोग्य मंत्रालय आणि नागरी उड्डाण मंत्रालयानेही या सुरक्षेच्या दृष्टीने अनेक पावले उचलली आहेत. चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ३ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनपासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरस आता जगातील अनेक देशांना पसरलं असल्याचं समोर आलं आहे.

कोरोना व्हायरस (सीओव्ही) हा अशा व्हायरस प्रकारातील आहे की, ज्यांच्या संक्रमणामुले सर्दीपासून सुरुवात होऊन श्वास घेण्यारपर्यंत त्रास होऊ शकतो. या व्हायरसचा पहिला रु्ग्ण हा डिसेंबरमध्ये चीनच्या वुहानमध्ये आढळला होता. 

कोरोना व्हायरसची लक्षणे अशी असतात-

 1. ताप, खोकला, श्वास लागणे ही त्याची लक्षणे आहेत.
 2. या व्हायरसमुळे सतत खोकला होतो.
 3. यामध्ये अचानक ताप, नाक वाहणं, श्वास घेण्यात अडचण आणि घसा खवखवणे सुरु होतं.
 4. त्याची लक्षणे सुरुवातीला सामान्य तापासारखीच असतात.
 5. तीव्र डोकेदुखी, न्यूमोनिया, ब्राँकायटिस आणि घसा खवखवणे हे संसर्ग तीव्र झाल्यानंतर न्यूमोनिया आणि मूत्रपिंडासंबंधी रोग होतात.
 6. जर सामान्य सर्दीपेक्षा अधिक सर्दी जाणवत असेल तर  चांगल्या डॉक्टरांकडे तात्काळ जा. 
 7. कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून संरक्षण शक्य आहे. परंतु जर एखाद्यास त्याचा संसर्ग झाला तर त्यावर अद्याप तरी लस उपलब्ध नाही. त्यामुळे उपचार होऊ शकत नाही. म्हणूनच प्रतिबंध करणे हा एक उत्तम मार्ग आहे.

कोरोनापासून वाचण्यासाठी या गोष्टी केल्या पाहिजे-

 1. आपल्या आसपासच्या लोकांसह कमीतकमी ३ फूट अंतर राखणे चांगले आहे. जेणेकरून आपण संसर्ग टाळू शकाल.
 2. नियमितपणे हात धुवा, म्हणजे किमान 20-30 सेकंद  हात धुवा
 3. हात स्वच्छ करण्यासाठी एक चांगला सॅनिटायझर वापरा 
 4. खोकला किंवा सर्दी असलेल्या लोकांपासून अंतर ठेवणे चांगले
 5. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार हात लावू नका
 6. हा आजार टाळण्यासाठी, कच्चे किंवा अर्ध शिजलेलं मांस खाणं टाळा.
 7. खोकला आणि शिंकताना आपले तोंड आणि नाक झाकून ठेवा. 
 8. श्वसोश्वास घेण्यास त्रास होत असलेल्या रुग्णाजवळ जाणं टाळा. 
 9. संसर्ग टाळण्यासाठी चांगले मास्क आणि हातमोजे वापरा
 10. खोकला असल्यास प्रवास करणे टाळा
 11. आठवड्यातून एकदा स्मार्टफोनची स्क्रीन देखील स्वच्छ करा
 12. कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी सरकार सर्व शक्य ती पावले उचलत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...