Tips to avoid pregnancy: अनेक महिलांना गरोदरपणा टाळण्यासाठी कायमचा असा उपाय हवा असतो. तर काही महिला फॅमिली प्लॅनिंग केल्यावर कायमचा मात्र, सुरक्षित गर्भनिरोधक पद्धत अवलंबू इच्छितात. अशा महिलांसाठी ट्यूबेक्टोमी (Tubectomy) हा एक पर्याय आहे. आयव्हीएफ एक्सपर्ट आणि स्त्रीरोग तज्ज्ञ यांनी ट्यूबक्टोमी म्हणजे काय आणि ही प्रक्रिया नेमकी कशी करता येते याबाबत सांगितले आहे. जाणून घेऊयात...
डॉक्टरांच्या मते, ट्यूबक्टोमी किंवा ट्यूबक्टोमी किंवा ट्यूबल लिगेशन ही भारतातील गर्भनिरोधक पद्धत आहे. ही पद्धत पूर्ण सुरक्षित आणि प्रभावी आहे. तसेच या उपायाने कायमस्वरूपी गर्भनिरोधक म्हणून काम करते. ट्यूबेक्टॉमी ही एक शस्त्रक्रिया आहे जी गरोदरपणा रोखण्याची एक अतिशय प्रभावी अशी पद्धत आहे.
हे पण वाचा : मखाना खा आणि लैंगिक क्षमता वाढवा
गरोदरपणा रोखण्यासाठी महिलेच्या फॅलोपियन ट्यूबला बांधतात किंवा ब्लॉक केले जाते. या प्रक्रियेचा मासिक पाळीवर कोणताही परिणाम होत नाही. यामुळे अंडाशयातील फॅलोपियन ट्यूबमधून अंड्यांना जाण्यापासून प्रतिबंधित करते.
हे पण वाचा : ... म्हणून डोळ्यातून वारंवार येतं पाणी
डॉक्टरांच्या मते, ज्या महिलांना कायमस्वरूपी गरोदरपणा टाळायचा असेल त्या महिलांसाठी हा पर्याय चांगला आहे. डिलिव्हरी झाल्यावर किंवा पोटाशी संबंधित इतर शस्त्रक्रियेनंतर सुद्धा केले जाऊ शकते. ही शस्त्रक्रिया झाल्यावर महिलेला त्याच दिवशी डिस्चार्ज सुद्धा देता येईल.
हे पण वाचा : ही लक्षणे दिसताच समजून जा प्रेमात होईल दगाफटका
तज्ज्ञांच्या मते, हा ऑपरेशनचाच एक प्रकार आहे. यामध्ये पोटाच्यावर वरील भागाला कट केले जाते. ही प्रक्रिया करताना महिलेला भूल दिली जाते. यामुळे मूत्राशय, गुदाशय किंवा प्रमुख रक्तवाहिन्यांना इजा होण्याची शक्यता असते. तसेच संसर्ग देखील होऊ शकतो.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी या वृत्ताला दुजोरा देत नाही. या संदर्भात तज्ज्ञांचा, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच हा उपाय करा)